Friday, May 19, 2017

व्याप :
समजा unmarried मुलगी , गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल विचारायला आली तर काय करावे ?
तिला फक्त गोळ्या सांगायच्या का समुपदेशन करायचे ?
...
आमच्या डॉक्टरलोकात पण ह्यावर एकमत नाही . काहीजण म्हणतात ती मुलगी १८ पेक्षा जास्त असेल तर तिचे निर्णय घ्यायला ती समर्थ आहे . काही शिकवत बसू नका , कोणाला तुमचे सल्ले नको आहेत . जेवढा विचारलंय तेवढा सांगा .
माझ्या बरोबरीच्या एक डॉक्टर म्हणाल्या असं कसं , तिला हे तर सांगायला हवे कि pregnancy होऊ शकते , infection , दुखापत होऊ शकते . हे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत . पण सामाजिक , मानसिक प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात.
सगळ्यात महत्वाचे मुली कशाही वागू शकतात पण कायद्याने विवाहित व अविवाहित मुलींना वेगळे rules आहेत .
डॉक्टर लोक आता आपण कशात अडकणार नाहीत एवढेच बघतील .

No comments:

Post a Comment