Friday, May 19, 2017

रोज नवीन संकट !!


आपल्या कंट्री मध्ये जे लोक batting करतायेत , कुठले का असेनात , काही का करेनात , एका बाबतीत सगळ्यांचे म्हणजे अगदी सगळ्यांचे एकमत होईल . इथे रोज नवीन संकट असते . म्हणजे कालचे आज नाही , आजचे उद्या नाही , रोज नवीन !

समजा वाटलं कि आता आपल्याला सगळं manage करता येतं , तर तसं नसतं . असं काही होतं  जे आधी झालेलंच  नसतं . पुन्हा डोकं वापरा , पुन्हा solution काढा .

Latest problem :--

अजून   एक झालंय , दुसऱ्या कोणाची बातमी ऐकली तरी घाबरल्या सारखं  होतं  . अरे बापरे !

आमच्या एका दोस्तने नवीन गाडी घेतली , महिनाभर चांगली फिरवली  आणि एक दिवशी पेट्रोल भरलं आणि घरी आणून पार्क केली . दुसऱ्या दिवशी चालूच होईना ..  कंपनीला कळवलं , त्यांनाच माणूस आला आणि diagnosis केलं , तुम्ही पेट्रोल गाडीत diesel भरलंय .
मग चालली कशी गाडी ?

आधीचं पेट्रोल होतं त्यावर चालली ,, आता सिस्टिम मध्ये diesel गेलंय म्हणून बंद पडली .

मग आता ?

काही नाही tow करून गाडी न्यावी लागेल workshop ला !!

**************************
दुसरा एक गप्प होता , मग बोलला  कि आमचा पेट्रोल पम्प  होता त्यातल्या पेट्रोलच्या टाकीत टँकरवाल्याने diesel ओतले होते . लक्षात उशिरा आले . खूप गाड्यांची वाट लागली होती .

*******************************

तिसरा म्हणाला आम्ही युरोपला गेलो होतो स्वतःच , तिथे गाडी भाड्याने घेतली , छान फिरलो . तिकडे पेट्रोलला गॅस म्हणतात . पेट्रोल पम्पावर गॅस भरून घेतला , हॉटेलवर गेलो आणि दुसृया दिवशी गाडी चालू होईना . कळलंच नाही काय झालंय  ते . कंपनीला फोन केला त्यांनी दुसरी गाडी पाठवली . परत दुसऱ्या दिवशी तेच . रात्रीपर्यंय गाडी चांगली होती दुसऱ्या दिवशी बंद .

पुन्हा कंपनीला कळवले , पुन्हा नवीन गाडी .

मग लक्षात आले काय गडबड होत आहे ते .

गॅस म्हणताना पेट्रोल म्हणायचं नाहीतर ते diesel  भरतात .








No comments:

Post a Comment