Friday, May 19, 2017

बहिणी बहिणी :--
माझी एक बहीण आहे , माझ्यापेक्षा बरीच मोठी ( सख्खी नाही , I don't have सख्खी बहीण) , एकदा मी तिच्याशी भांडले होते , व्यवस्थित उखाळ्यापाखाळ्या काढून , चांगली जोरदार . झालं .
मग मला वाटलं आता झालं घराने कि दुश्मनी , बदले कि आग वगैरे .
म्हणजे आता एकमेकांशी बोलायचं नाही , कुठे भेटलो तर ओळख दाखवायची नाही , तोंड फिरवायचं वगैरे .
काही नाही , एक दिवस तिचा काही तरी निरोप द्यायचा message आला , मग एकदा जुजबी फोन आला . मग कुठे तरी समारंभात भेटलो , तर माझ्याशी पाहिल्यासारखीच प्रेमाने वागली , इव्हडूसI खाऊ द्यायची तो दिला , नेहेमीसारखाच , जास्त पण नाही .
मला वाटलं मी एवढी भांडले तरी ही कशी काय बोलते , मी विचारलं पण तिला . तर म्हणाली " तुला दोन वर्षाची असल्यापासून सांभाळली आहे , तुझं बोलणं काय मनावर घ्यायचं ?"
मला जरा खजील झाल्यासारखेच झाले , म्हणलं आपण स्वतःला एवढे शहाणे समजतो पण ही आपल्याला दोन वर्षीचीच समजते आहे
म्हणजे एवढं सोप्पं असतं माफ करणं , म्हणजे मनावरचं घ्यायचं नाही ?
हे बहिणी बहिणीचं काहीतरी वेगळंच असतं
आमच्याकडे ४ बहिणी , ५ बहिणी plenty , माहेरी आणि सासरी both .
ह्या बहिणी सगळ्या खमक्या , संसाराला पक्क्या , सुग्रण , जाम बोलणाऱ्या आणि सगळीकडे बारीक लक्ष असलेल्या .
एकमेकींच्या मदतीला धावून जाणाऱ्या आणि बाळंतपणं करणारा . बहिणीचं एकमेकींचं एवढं करायच्या कि त्या आईवर काही पडायचंच नाही .
आमच्याकडे एवढी बाळंतपणं व्हायची , जंगी , कमीत कमी महिनाभर , त्यात ती मालिश करणारी बाई , धुरी , अळिवाचे , डिंकाचे मेथीचे लाडू , सगळं असायचं .
हल्ली फार पटपट उरकतात , कोणाला वेळच नाय
त्या बहिणी पुन्हा कलाकार , गायच्या , वेगवेगळे पदार्थ एकमिकांना शिकवायच्या . लग्नात मंगलाष्टकं (self composed ) म्हणायला पुढे .
हल्ली बऱ्याच माता दुःखी असतात फक्त मुली आहेत म्हणून . Don't worry , त्या मुली जाम जीव लावतील एकमेकींना आणि सांभाळून घेतील .
मी पण माझ्या त्या बहिणीकडून काहीतरी शिकले , काहीतरी जाणवलं समजलं .
मला धाकटी बहीण नाही पण एक मैत्रीण आहे , थोडी चिडचिड करते , भांडते रुसते , कधी लाडात येते . ती पण एकदा माझ्याशी भांडली , पुन्हा भेटली तर मी बोलले , मला विचारलं तिने " मी एवढी भांडले तरी माझ्याशी कशी बोललीस ?
मी पण म्हणाले " अगं तुझं बोलणं मनावरचं नाही घेतलं "
तिला पण काहीतरी कळलं .
I hope I have passed on the baton .



No comments:

Post a Comment