Sunday, May 28, 2017

आमचं लग्न झालं तेंव्हा मला २ आयटम येत होते , दूध तापवणे व कुकर लावणे . That's all !!


त्यात लग्नानंतर २-३ महिन्यांनी आमच्या सासूबाई २ दिवसांसाठी गावाला गेल्या . 


मग आता ! 


खूप विचार करून आमटी भात करायचे ठरवले .  कुकर  लावून झाला 


सासर्यांनी मला आमटी करायला शिकवले . अशी फोडणी करायची , डाळ रवीने एकसारखी करून घ्यायची , मग घालायची , मग कोमट पाणी घालायचे . उकळी आल्यावर गुळ  , कोकम , गोडा मसाला , तिखट , मीठ हळद ( not in this order ) . मग चव घ्याची , adjustment करायची ,शेवटी खोबरं कोथिंबीर घालायची . 


मी त्यांना विचारलं , तुम्हाला कसं काय येतं , तर ते म्हणाले , मी लहानपणापासून स्वयंपाक करतोय .


त्यांची मला वेळोवेळी खूप मदत झाली आहे . 


***********************************************


मध्ये एकदा मी नवऱ्याला काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले आपल्याला पण सून येईल काही वर्षांनी , तुला पण तिला  मदत करता आली पाहिजे . 


तर तेंव्हा काही बोलला नाही , पण तेंव्हापासून स्वयंपाकात खूपच इंटरेस्ट घेतोय . 

आज ही  भाजी करा , दाण्याचे कूट घाला , आमटीत गूळ कमी पडतोय , उद्या इडली सांबार करा , सांबारात शेवग्यIच्या  शेंगा हव्यात . नारळाची चटणी फार तिखट नाकी . असं बरंच काही . 


मग एक दिवशी " मी prawns आणतो " आणि आणले कि त्याने एकदम firstclass , ते पण नवीन शहाड जवळ एक मार्केट शोधून . 


असं करत राहिला तर एकदम export quality सासरा होईल !!

ई का हुई गवा !!!









No comments:

Post a Comment