Friday, May 19, 2017

Trying to copy the US doesn't always work .

अमेरिकेला कॉपी करायचं आणि त्यांच्या आयडिया उचलून भारतात लागू करायच्या  हे बऱ्याच वेळेला होतं पण इथे त्या आयडिया फसतात . 

मोठे मोठे मॉल ---त्यातले बरेच बंद पडत आहेत 

मोठया इंटरनॅशनल schools --एकतर त्या लांब गावाबाहेर असतात , मुलं जाऊन येऊन थकतात आणि पहिलीला असलेल्या मुलांची फी १ लाख म्हणजे जरा जास्तंच वाटते . आई वडील तोंडाला फेस आला तरी फी भरत राहतात.

Multiplex ---no  wonder  सिनेमे बघायला मजा येते पण पांढरे हत्ती झाले आहेत . एखादा चांगला चालणार सिनेमा सगळे तोटे cover-up  करतो ..

कॉर्पोरेट हॉस्पिटल्स ------ आत खूप मोठ्या मोठ्या surgeries  होतात  त्याला हे हॉस्पिटल योग्यच आहेत , पण maintainance  कॉस्ट खूप आहे . बिलं खूप होतात . 

परदेशात सगळ्यांचा इन्शुरन्स असतो , कधीही काहीही झालं तरी इन्शुरन्स coverup करतो . पेशंटला पैसे भरावे लागत नाहीत . इथे तसे नाही . सगळ्यांचा इन्शुरन्स नसतो आणि असला तरी आधी पेशंटला आधी पैसे भरावे लागतात आणि मग ते insurance company  कडून recover करावे लागतात . त्यात लोकांची चिडचिड होते . 

आता कॅशलेस इन्शुरन्स आला आहे पण सगळ्या हॉस्पिटल मध्ये ती सोय  नसते मग जिथे आहे तिथेच पेशंटना जावे लागते . 

इन्शुरन्स  काढला तर पेशंटना फायदा  आहे , खूप कमी खर्चात किंवा जवळजवळ फुकट त्यांची ट्रीटमेंट होऊ शकते. पण इन्शुरन्स कंपन्या सहजासहजी पैसे देत नाहीत .  How not to pay a claim हे त्यांचे डेपटमेन्ट जाम स्ट्रॉंग  असतं . ते काही दानधर्म करायला बसलेले नाहीत , बिझनेस करायला बसलेत . 

सगळे क्लेम खोटेच आहेत असे समजूनच ते काम करतात आणि आता त्यांनी अटी  अजून जाचक केल्या आहेत आणि प्रेमीमची रक्कम पण वाढवली  आहे . 
डॉक्टरलोकांचे पण व्याप वाढले आहेत , paperwork जबरदस्त झाले आहे . 
परदेशात दिवसाला किती पेशंट बघतात ? आणि हॉस्पिटल मध्ये स्टाफ किती असतो ? मग paperwork  हवे तेव्ह्डे करता येते . 

इथे बदबद पेशंट , धड बोलायला फुरसत नसते आणि paperwork मध्ये त्रुटी आढळल्या तर लगेच foul , कोर्ट केसेस , आणि अजून बरेच . 



परदेशात appointment  घेऊन पेशंट येतात , इथे कधीही येतात . काहीजण तर या बाजूला आलो होतो , म्हटलं तुम्हाला दाखवून जाऊ म्हणून आलो असं म्हणतात आणि फाईल  आणली नाही बरका हे अजून त्यावर . 



आता इन्शुरन्स कंपन्यांनी फक्त जेनेरिक औषधे असतील तरच बिलं पास करू  असं फर्मान काढलंय . ठीक आहे . त्यांना पण कमीतकमी पैसे refund  करायचे असतात . 


इन्शुरन्स companies will control  medical  practice now on . 

















No comments:

Post a Comment