Friday, May 19, 2017

आमचं हॉस्पिटल नवीनच चालू केलं होतं , छोटंच आहे . तर त्या आधी प्रॅक्टिस होती पण हॉस्पिटल चालवण्याचा अनुभव नव्हता . 

नर्सिंग स्टाफ मिळाला आणि आयाबाई  जवळपास राहणाऱ्या घेतल्या . त्यांना पण काही अनुभव नव्हता . 

सामान पण थोडं थोडंच भरलं होतं . म्हणजे IV sets , emergency injections , IV fluids , ड्रेससिंगचे सामान वगैरे . म्हंटलं लागेल तसं आणू . 

तर त्यात एक cotton bundle होतं . तसं बरंच मोठं असतं ते . एक दिवस ते गायब झालं . एवढं मोठं बंडल  कुठे गेलं ? मग चौकशी केली , आरडा ओरडा केला तेंव्हा एका आयाबाईंनी सांगितलं कि मी घरी नेलं . 

घरी ? कशाला ? आणि लागणारी वस्तू अशी न्यायची ? घरी जाऊन काय करणार ? वाती फुलवाती ? समजा एक असिसिडेंटचा पेशंट आला तर १० मिनिटात ते बंडल संपेल . आणि आता आला आणि हॉस्पिटल मध्ये कॉटन नाही ? शोभतं का हे ?

तुम्हाला काय कमी आहे , आणा दुसरं 

काय कमी आहे काय ? आमच्या डोक्यावर किती कर्ज आहे ते माहिती आहे काय / 

आमच्याकडे लाईटचे बिल १०० चे  १५० झालं तर सासूबाई ठणाणा करतात , आणि तुमचं २०००/- आलं तरी तुम्ही सहज भरलं . काय कमी आहे तुम्हाला ? नेला कापूस तर काय झालं ?

माझीच बोलती बंद . 

बाय माझे  लाईट चे बिल भरले नाही तर connection तोडून टाकतील , अंधारात चालवायचे का ? 

विचार केला , हिने आधी एवढं पहिलाच नसेल , जाऊ दे . म्हटलं हॉस्पिटलचे सामान घरी न्यायचे नाही . काही हवे असेल तर मला मागा . 

पण तिचा attitude बदलला नाही .रोज फक्त आज काय घरी नेता येईल हेच डोक्यात , कामाच्या नावाने ठणाणा . 

म्हटलं हे काही आपल्याला परवडायचे  नाही . तिला निरोप दिला . एका सडक्या आंब्याने सगळे खराब व्हायचे . 

असो  !

****************************************************************************

कुठल्याही system मध्ये पैसे येतो . जेवढी मोठी सिस्टिम तेवढा जास्त . पैसे बघू इथे काम करणाऱ्या लोकांची नियत फिरू शकते . एवढा आहे तर थोडं पळवलं तर काय बिघडलं असं वाटत राहतं . एकाने पळवलं आणि पचलं तर दुसरा करतो आणि अमाऊंट पण वाढत जाते . मग ती सवयच होते . मग आमदनी पेक्षा वरकमाई जास्त . 


मग system weak होत जाते . जो पैसा  येतो तो सिस्टिमलाच लागतो . काही दिवस plus मध्ये दिसतात मग maintainance  सुरु होतो . नवीन मशीनरी घ्यावी लागते , upgradation करावे लागते . नवीन प्रोजेक्ट्स येतात . आपले बरेच लोक self employed आहेत . त्यांना हे अनुभव असतीलच . काही दिवस income कमी असतं किंवा एकदम मोठा खर्च येतो . समजा system weak  असेल तर खर्च टाळला जातो आणि मग मागे मागे पडत जाते . 




आपली सगळ्यात मोठी सिस्टिम म्हणजे सरकार , या सिस्टिम मधून किती पैसे उचलला गेला याला सीमाच नाही . किती तरी गोष्टी करता आल्या असत्या पण नाही झाल्या .ह्याचे कारण तेच , सारखं ह्यातला किती पैसा घरी नेता येईल हे डोक्यात . वरचे करतायेत म्हटलं कि खालच्यांनी काय पाप केलंय ? तुम्ही पण न्या . 

आणि या पैशाने काय करणार ? बंगले , जमिनी , फॉरेन  टूर्स , शॉपिंग , सोनं ,दागिने , इंटिरियर decoration वगैरे वगैरे . मग जो पैसे देईल त्याचीच कामे करायची आणि पैसे मिळत असेल तर नियम पण धाब्यावर बसवायचे . 


हे सगळे लिहिण्याचा उद्देश कि या वर्षी पाण्याचं आणि इलेकट्रीसिटीचे नियोजन चांगले झाले आहे . उन्हाळा असून पण दोन्ही आहे . मागे फार हाल झाले . गेल्या वर्षी ते जलयुक्त शिवार भरपूर झाले . काम झाले पाहिजे आणि ते पण चांगले झाले पाहिजे हि attitude बऱ्याच लोकांना नवीन आहे . त्यांना त्रास होणारच . पण आता हा मार्ग सोडू नये त्यातच सर्वांचे भले आहे . 













No comments:

Post a Comment