Sunday, May 21, 2017


2-7-14

Prime Minister Narsimha Rao १९९१----१९९६ मध्ये सत्तेवर होते . Manmohan Singh तेंव्हा Finance minister होते . त्यांनी economy open up केली तेंव्हा पासून आपला देश बदलून गेला . 
Lifestyle बदलली , computers आले , It parks आले , fast foods आले ,प्रचंड पैसा आला आणि सगळे जग open झाले . 
आपल्या पद्धतींना कंटाळलेल्या लोकांनी पटापट दुसऱ्या देशातल्या पद्धती उचलल्या . आपला देश म्हणजे बावळट , इथे काही scope नाही ,कमवायचे ते dollar मध्ये ,. खूप लोक परदेशात जॉब्स साठी गेले . ते जेंव्हा परत यायचे तेंव्हा "तिकडे असं असतं ,तिकडे तसं असतं " खूप कहाण्या सांगायचे . इथे "India मध्ये काही सुधारणा नाही ……. वगैरे वगैरे ".  इथे राहिलेल्या लोकांना तिकडे २४ तास light आणि पाणी असतं आणि रस्ते चांगले असतात ह्याचंच कौतुक . 

Foreign च्या गोष्टी घेताना सगळ्या वरवरच्या घेतल्या  pizza burger घेतला , jeans and T - shirt , perfumes ,chocolates ,cars  हां आणि  दारू पिणं घेतलं . हल्ली  तर कुठल्याही २ माणसांना दारू प्यायल्या शिवाय बोलताच येत नाही . 
आहार shastra , दिनचर्या ,ऋतुचर्या काही राहिलंच नाही . 
मागे patient लोकांचे जगणे सोपे होते व आजार पण बहुतेक सोपे होते , फार औषधं लागायची नाहीत आणि खर्च पण यायचा नाही . 
आता बहुतेक patient लोकांना diabetes . BP , cholesterol , kidney , acidity ,constipation problems असतात , psychiatry ,skin , dental ,homeopathy , आयुर्वेद हे  side by side चालूच असतं . घरातली tensions असतात आणि वेळ पण नसतो . त्यातून त्यांना बरं करायचं असतं . त्यातून ते पथ्य पाळत नाहीत , औषधं नीट घेत नाहीत , papers सांभाळत नाहीत . सारखे doctor बदलतात  आणि पुढच्या डॉक्टरला आधी काय झालंय हे सांगत नाहीत . आजकाल practice करायची म्हणजे पोटात गोळाच येतो . 
एक उदाहरण सांगते --एक २० वर्षाची ८०kg  वजनाची मुलगी आली होती , घट्ट synthetic material चा top आणि घट्ट jeans , आई वडील दोघं खूप कमावणारे ,दोघांच्या बोलण्यात माज , तोच माज मुलीच्या बोलण्यात . त्या मुलीला सबंध अंगावर खूपच skin infection झालं होतं , तिला सांगितलं treatment देते पण जरा सैल cottonचे कपडे घाल , उन्हाळा प्रचंड आहे आणि मसाल्याचे आणि तेलकट पदार्थ खाऊ नको . ती म्हणाली महागाची औषध देना म्हणजे हे करायला नको . 
Patient बरोबर communication करता आलं तर कितीतरी operations सहज पार पडतात आणि नाही झालं तर छोट्या छोट्या गोष्टी पण बऱ्या होत नाहीत . 

आजकाल बहुतेक मुलींना स्वयंपाक येत  नाही , शिकण्याचा कंटाळा , सासूशी पटवून घ्यायचा नाही . लग्न होतात ,मुलं होतात पण त्यांना काय खाऊ घालायचं ,कसं सांभाळायचं माहीत नसतं , मग  ती मुलं सारखी आजारी पडतात ,किरकिर करतात , शांत झोपत नाहीत , वाढ नीट होत नाही मग  सारखं  डॉक्टर कडे न्यायचं  आणि  बिलं भरायची . 
डॉक्टर ना दोष देणं ही पद्धतच पण त्यांची बाजू पण आहे. 

No comments:

Post a Comment