मध्ये आमच्याकडे अचानक पाहुणे आले ते पण प्रतिष्ठित . आता काय करावे ? मग भजी केली . काय केलं एकIच पिठात लांब चिरलेले कांदे , बटाटयाच्या चकत्या , हिरव्या लवंगी तिखट मिरच्या बारीक चिरून आणि केळ्याचे काप असं एकत्र केलं , बाकी नेहेमीचं तिखट , मीठ थोडा ओवा आणि केली भजी .
ते म्हणाले अशी कुठे भजी असतात काय ? कांद्याची वेगळी , बटाट्याची , मिरचीची वेगळी वेगळी करायची आणि हे केळ्याचं भजं काय प्रकार आहे ? असं कुठे भजं असतं काय ?
म्हटलं आधी खाऊन तर बघा , मग बोला .
असली फक्कड झाली होती भजी ,,, कांदा , मग मधेच कुरकुरीत बटाटा , मग एकदम मिरचीचा झटका आणि मग केळ्याचा गोडवा .
एकदा चालू केल्यावर , आवाज न करता संपली .
मग फक्कड चहा .
पाहुणे खुश.
No comments:
Post a Comment