Friday, May 19, 2017

बऱ्याच वर्षIपूर्वी माझ्या डोक्यात मुलींची शाळा काढायचा विचार आला होता . Only girls . आधी छोटी शाळा काढू मग वाढेल तसे बघू .
ह्याचं कारण म्हणजे छोट्या मुलांचे observation केले तर मुलं दांडगोबा असतात , मुलींना धक्काबुक्की करतात . ग्राऊन्डवर पण कब्जा करतात .
मुलींची तब्येत आणि स्पीड कमी असतो . त्यांना पण खेळायचं असतं पण थोडं जपून , थोडं नाजूक नाजूक .
...
मुलंमुली दोघं खेळले कि चांगली भूल लागते मग जेवण चांगलं जातं , वाढ छान होते .
दुसरं म्हणजे , मुली खेळताना सेफ्टी आणि privacy हवी . कोणीही येऊन बघतायेत असे बरे नाही वाटत .
हल्ली बातम्यांमध्ये पण एकटी मुलगी बाहेर गेली आणि पळवले , अत्याचार झाले असे असतेच . बातम्या ऐकून माता आपल्या मुलींना काही जायचं नाही बाहेर , बस घरात करतात .मग त्या मुली टीव्ही बघ , मोबाईल खेळात बस हेच करतात . मग त्या बश्या आणि बोजड होतात . किंवा अशक्त आणि हाडकुळ्या . छान तब्येतीच्या होतंच नाहीत .
पुढे जाऊन मुली काही काम करत नाहीत , त्यांना काही येत नाही याचे मूळ इथे आहे .
माझी एक मौत्रिण शिक्षण डिपार्टमेंट मध्ये आहे , तिला सांगितलं . ती म्हणाली तू आजिबात ह्यात पडू नकोस , इतके व्याप आहेत कि सांगता येणार नाही . प्रत्येक ठिकाणी अडवतील , वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकतंच नाही .
त्यांना तुम्ही चांगल्या हेतूने करताय असे काही नसते , आम्हाला काय हेच .. मग शाळा काढणारे पुढे वाट्टेल तशी फी घेतात .
आता तर शाळा काढायची म्हणजे एवढ्या अटी , सोयी पुरवायच्या कि ते भयंकर महागडं प्रकरण होऊन बसलं आहे .
साधं सोप्पं काही राहिलंच नाही .

No comments:

Post a Comment