Friday, May 19, 2017

आपल्याकडे हवे तेंव्हा अमेरिकन आणि हवे तेंव्हा भारतीय व्हायची सोय आहे .
कायद्यावर बोट ठेऊन हक्क मागतात , प्रॉपर्टीवर हक्क सांगतात , आम्ही हवे तसे वागू , हवे तसे कपडे घालू ह्या बाबतीत जागरूक असतात .
तर त्याच कायद्यावर बोट ठेऊन १८ वर्षानंतर मुलामुलींनी आपला स्वयंपाक आपण करायचा , आपले कपडे , भांडी , घरातला पसारा आपण आवरायचा .
...
आपण राहतोय ते घर आईवडिलांचे आहे , त्या घराचे नियम पाळायचे . ठराविक वेळेला जेवण मिळेल , वाट्टेल तेंव्हा नाही .
मला वाटतं या वयानंतर मुलामुलींनी हॉस्टेल किंवा वेगळं राहायला हवे . जबाबदारीची जाणीव होते पण अशी paying गेस्ट म्हणून राहायची सोय हवी .
घरी राहायलं कि आईवडील करतंच राहतात . बाहेर राहायलं तर जेवणाखाण्याचा प्रॉब्लेम होईल , तब्यतीची हेळसांड होईल , वाईट संगत लागेल , करिअर खराब होईल म्हणून आईवडील बाहेर जाऊ देत नाहीत . खर्च पण आटोक्याबाहेर जातात . ह्या सगळ्या प्रकारात पोरं parasite mentality चे होतात .
यावर काय उपाय आहे ?

No comments:

Post a Comment