31-3-17
वेगळी वाट :---
आता आमच्या ओळखीचे बिल्डर खूपच आहेत .
बहुतेक जण बिल्डिंग बांधतात , वेगवेगळ्या आकाराचे फ्लॅट्स काढतात , खाली दुकानांना गाळे किंवा पार्किंगला जागा असं करतात . सगळं विकलं जाईपर्यंत टेन्शन मध्ये असतात
सगळं एकदा विकलं गेलं कि नवीन जागेत पैसे गुंतवतात आणि परत हेच करतात .
कल्याणला एक बिल्डर होते , ते फारच छान quality चे बांधकाम करायचे , पण दिवसेंदिवस वाढत चाललेले 'व्याप ' बघून ह्या धंद्यातून बाहेर पडले
त्यांनी एक चांगला लग्नाचा हॉल बांधला आणि तिथेच असतात आणि management करतात . स्वतः बारीक लक्ष देत असल्याकारणाने service एकदम firstclass असते..
He created a recurring source of income .
स्वतः management केली तर खूपच उत्पन्न होऊ शकते . माणसं सांभाळायची , त्यांना समजून घ्यायचं हे मात्र करावे लागते .
छोटे छोटे कार्यक्रम पण बरेच असतात , छान चालतं .
एखादा व्यवसाय चांगला चालू लागला कि त्यामुळे अजून बऱ्याच छोट्या मोठ्या व्यवसायांना संधी मिळते .
असंच जरा वेगळा विचार केला तर छोटे नाट्यगृह , सिनेमा थेटर , club house , आर्ट गॅलरी , असं आणि अजून बराच काही करता येऊ शकतं .
लोकांना एकत्र यायला ठिकाणं मिळू शकतात .
Low maintainance cost असं करायचं . आजच्या तरुणाईला खूप करायचं आहे पण outlet नाही . त्यांचा विचार केलाच पाहिजे .
Human interaction , activity , discussing new ideas and thoughts is a must.
No comments:
Post a Comment