दुपारी जेवणं होतात , संद्याकाळी चहा होतो पण रात्रीच्या जेवणाला वेळ असतो . संध्याकाळी भूक लागते .
काहीतरी तळकट खाल्लं कि ऍसिडिटी होते , नाही खाल्लं तर चिडचिड होते .
तर बेस्ट म्हणजे भेळ , भेळवाल्याला शोधंत कुठं हिंडायचं तर घरीच करायची .
कुरमुरे , फरसाण किंवा भेळेचा चिवडा किंवा तत्सम , कांदा , मिरची कोथिंबीर बारीक चिरून , कैरी असेल तर मजा येते , बारीक चिरून , तसेच टोमॅटो हवे असतील तर .
ती चिंचगूळाची चटणी , पुदिन्याची चटणी पण करून ठेवता येते , टिकते फिजमध्ये .
करायची भेळ आणि खायची , मस्त वाटतं .
मुलांना पण कुरमुरे , बारीक शेव , थोडे चणे दाणे मिक्स करून ६ वाजता वगैरे दिले कि ते आठ सIडेआठ पर्यंत बरे राहतात .
आपल्याकडे कुठलाही पदार्थ करायचा असेल तर खूपच आयटम लागतात , पण भेळेला थोडं आगे पीछे चालतं .
हा आयटम पुरुष वर्ग पण सहज करू शकतो , त्यांना पण म्हणता येतं हे मी केलंय बरंका !!
No comments:
Post a Comment