Thursday, May 25, 2017

फक्त अभ्यास ?:---



आमचे एक दूरचे नातेवाईक , त्यांना एकुलता एक मुलगा . तर त्याचे किती करू नि किती नको  आणि सारखा अभ्यास कर , अभ्यास कर .
कोठे जाऊ द्यायचं नाही , कोणा मित्राला घरी येऊ द्यायचं नाही , नातेवाईकांकडे जाण्याचा तर प्रश्नच नाही , कोणी नातेवाईक आले तर त्याला दार लावून खोलीत बसवायचं . बोलू द्यायचं नाही आणि मिसळू द्यायचं नाही .


जणू काही हलला तर १-२ मार्क कमी पडतील .

आणि त्याची सगळी कामं करायची
" आई माझे कपडे कुठे आहेत ?"  " हे घे "

" आई माझे जर्नल कुठे आहे " " थांब शोधून देते "

" आई मला कॉफी करून दे ना "  " करते हं  बाळा "


त्याला कुठलं हि काम करू द्यायचं नाही .

घरात काही ठरवायचं असेल तर भाग घेऊ द्यायचा नाही , म्हणजे रंग द्यायचा , बिलं भरायची , काही नवीन घ्यायचं . बँकेची कामे  नाहीच .

बघता बघता वर्ष जातात , आईवडील थकतात , ह्याने थोडं तरी करावं म्हणून अपेक्षा करतात , पण आत्तापर्यंत काही केलंच नाही तर आपणहून पुढे होऊन जबाबदारी कशाला घेईल ?

बऱ्याच मुलांना तर बोलता पण येत नाही , काही वेगळा प्रसंग आला तर निभावून नेता येत नाही .

अजून एक पहिले आहे .

तो फार आईवर अवलंबून असतो , दुसऱ्या मुलीशी त्याला relationship करता येत नाही , आई पण हक्क सोडत नाही . बऱ्याच ठिकाणी हेच कारण असतं लग्न मोडायचं .

समजा आईचं आणि बायकोचं नाही पटलं तर हिम्मत करून वेगळा राहण्याची धमकच  नसते कारण त्याच्या पंखात बळ येऊच दिलेलं नसतं .

*****************************************************************************

हेच मुलींबरोबर घडत आहे . एकुलतं एक अपत्य असलं कि 'let go ' होताच नाही . आपल्यापासून दूर जाऊच देत नाहीत . मग काय येतात परत

माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते , तिची पस्तिशी उलटलेली मुलगी संसार मोडून परत आली होती .
ती मुलगी आपल्या खोलीत बसून असायची , घरात कशात भाग घ्यायची नाही . खोली पण सुनीसुनी .

कारण ते घर तिचं नव्हतं . काय जेवायला करायचंय , काय संपलंय काय आणायचं  तिची आईच ठरवत होती .

ती पण हक्क सोडत नसेल .

काहीतरीच वाटलं ते बघून .


पस्तिशीच्या बायका म्हणजे काय खमक्या असतात , जाम ताकत असते , सगळीकडे चौफेर नजर असते , संसाराची सूत्रे हळूहळू हातात आलेली असतात .

They are in the prime of their life .

Life has to be enjoyed by participating not by staying away .


































No comments:

Post a Comment