Friday, May 19, 2017

आज एक आयडिया आली .

आमचे बरेच पेशंट हॉस्पिटलला येताना आपले पेपर्स आणत नाहीत , फाईल करून दिली तरी विसरलो, हरवली असे सांगतात किंवा आणायला संकोच वाटत असेल .

आणि काय होतं डॉक्टरलोकाना काही आठवत नाही म्हणजे जुजबी आठवतं पण बारीक बारीक डिटेल्स , पॉईंट्स लिहिलेले आठवत नाहीत .

पुढे काय करायचं आहे किंवा काय शंका आहेत हे लिहून ठेवलेलं असतं  तो डेटा मिळत नाही मग समजा डोक्यात गोंधळ झालI आणि दुसरीच ट्रीटमेंट लिहून दिली तर प्रॉब्लेम होऊ शकतो .


तर पेशंट लोकांनी आपल्या सगळ्या फाईलचे आपल्या मोबाईल कॅमेरात फोटो काढून ठेवले तर बरे होईल . डॉक्टरांच्या सगळ्या नोट्स , रिपोर्ट्स आणि prescription सगळ्याचे फोटो काढायचे आणि documents  मध्ये save करायचे .

समजा दुसऱ्या गावाला गेलात आणि तिकडे डॉक्टरकडे जावे लागले तरी तुमची हिस्टरी आणि सगळं त्या डॉक्टरना मिळेल आणि उपचार सुलभ होतील .



No comments:

Post a Comment