Saturday, May 20, 2017

30-5-14


ह्याचा अर्थ सांगा  !!
अरिकुल वहनाचे वहन आणित होते .
शशिधर वहनाने मार्गी ताडन केले 
समुद्र रिपुजाचा तात भंगोनी गेला 
रविसुत महिसंगे फार दुख्खीत झाला . 

*************************************************************************************
अरिकुल म्हणजे कुंभाराचे कुळ --त्याचे वहन म्हणजे गाढव --त्याचे वहन म्हणजे मडके 
शशिधर म्हणजे शंकर , त्याचे वहन म्हणजे नंदी ,म्हणजे बैल ,ताडन म्हणजे धिंगाणा 
बैलाने रस्त्यात धिंगाणा घटला 
समुद्राचा रिपुज म्हणजे शत्रू म्हणजे अगस्ती ऋषी---त्यांनी समुद्र पिऊन टाकला होता ,त्यांचा
तात ,म्हणजे वडील  --म्हणजे मडके --त्यांचा जन्म मडक्यात  झाला होता 
मडके  फुटले . 
रवि म्हणजे सूर्य ,त्याचा सुत म्हणजे मुलगा ,म्हणजे कर्ण म्हणजे कान ,महिसंगे  म्हणजे माझा . 
माझा कान दुखावला 
मी मडके आणत होते . 
बैलाने रस्त्यात धिंगाणा घातला 
मडके  फुटले . 
माझा कान दुखावला 

No comments:

Post a Comment