Friday, May 19, 2017

एक माझी जुनी मैत्रीण भेटली होती , सरकारी दवाखान्यात डॉक्टर . Family planning डिपार्टमेंटला होती . 

म्हणाली आजकाल TL म्हणजे tubal ligation म्हणजे स्त्रियांचे फॅमिली प्लांनिंग ऑपरेशन्स कमी झालेत . त्यात टार्गेट असतं . 

मी म्हटलं आजकाल एकतर लग्न होत नाहीत ,
झIली तर उशिरा होतात . 
त्यात कितीतरी लग्न टिकत  नाहीत. 
टिकलं  तर pregnancy होत नाही .
झाली तर कसं बसं ते बाळ होतं. 

त्या एका बाळाचं करून सगळे हैराण होतात . 

मग दुसरं बाळ होणार कधी आणि ते मोठं झाल्यावर बाईचे ऑपेरेशन . 

तिथपर्यंत पोचायला तर हवे ?

हे दोन मुले आणि मग ऑपेरेशन हा फॉर्मुला आम्ही शिकत असताना होता म्हणजे '८० साली , तेंव्हापासून पूलI खालून केव्हढे पाणी वाहून गेले आहे ?

सरकाने बदलत्या काळानुसार आपले निकष बदलायला हवेत . थोडा वेगळा विचार करावा . फक्त आकड्यात गुंतून न राहता ओव्हरऑल फॅमिली health चा विचार करावा . 


No comments:

Post a Comment