Friday, May 19, 2017

एवढ्या क्रिकेटच्या मॅचेस होतायेत तर कंमेंटेटर म्हणून लोक लागत असतीलंच , फक्त नॉनस्टॉप बोलता आलं  पाहिजे , क्रिकेटचं ज्ञान असलेले बरे .

कुठंही कंमेंटरी करायची प्रॅक्टिस करता येईल . उदाः :---


एक क्लिनिक :--

आपण आता एका क्लिनिक समोर बसलो आहोत . पेशंट कोणी दिसत नाहीये . डॉक्टर मोबाईल वर बोटं फिरवताना दिसत आहेत , बहुतेक नवीन गेम डाउनलोड  केला असेल . त्यांचा स्टाफ पण माना टाकून बसलेला दिसतोय .

आली आली एक पेशंट आली , ती पोट धरून येत आहे , बहुतेक दुखत असावे . डॉक्टरांच्या व स्टाफच्या चेहऱ्यावर हुरूप . तपासले तर आधीच अँपेंडिक्सचे ऑपेरेशन झालेले दिसले . आलेला हुरूप गेलेला दिसतोय . पेशंटला एका इंजेकशन मधेच बरे वाटले . हसत बाहेर पडली .

एक तरुण व त्याच्या मागे एक तरुणी बिचकत बिचकत येत आहेत . त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला कोणी बघत नाही ना असे भाव आहेत . बहुतेक गडबड केलेली दिसते . क्लीनिक मध्ये टेस्ट मध्ये काही नाही असे वाटते . दोघांच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव . बचे है तो और भी लडेंगे करत बाहेत पडताना दिसत आहेत .


आत्तापर्यंत तरी काही स्कोर झाला नाही . डॉक्टर परत मोबाइलला वर busy .

आला आला एक वयस्कर पेशंट आला . छातीत दुखतंय वाटतं , पण हे त्यांचे नेहेमीचेच पेशंट आहेत . असेच येतात पण ऍसिडिटीच असते . ECG नॉर्मल असतो . एखादे वेळेस लांडगा आला रे सारखी परिस्थिती व्हायची .

पुन्हा शांतता . दूरवर कोणी दिसत नाहीये . रस्त्यावर आंब्याची खूप दुकाने आहेत पण तिथे पण गर्दी नाहीये . एवढ्या उन्हात कोण बाहेर पडणार ?


आला आलI एक माणूस ज्याला चार जणांनी धरले आहे असा आला . बहुतेक ऍडमिट करतील असे वाटते . चला अकाउंट ओपन झाले .

******************************************************************

असं कुठेही बोलण्याची प्रॅक्टिस करावी . थोड्या म्हणी वगैरे पेराव्यात .मजा येते


उन्हाळ्यातला timepass !!










No comments:

Post a Comment