8-4-17
ऊन आहे, ऊन आहे, किती ऊन आहे !! खूप म्हणून झाले , आता एप्रिल मध्ये ऊन असणारच .
One should take advantage of the ऊन .
मी घातले पांघरुणं , ब्लॅंकेट सगळे उन्हात ठेवले ४-५ तास , मस्त कडक झालेत . ऊन is the best disinfectant . काही वास वगैरे असतात ते पण जातात .
हॉस्पिटलच्या पण गाद्या , चादरी , ब्लॅंकेट उन्हात घातले .
आमच्या सासूबाई तर उन्हाळ्यात काय काय करायच्या ! , त्यांचा तर timetable असायचा . बटाटयाचा कीस , पापड्या , पापड, आणि अजून बरंच काही . हल्ली सगळं मिळत बाजारात म्हणून घरोघरी करणं कमी झालंय , पण मजा यायची दिवसभर . ते उन्हात घालायचं , मग संध्याकाळी आत आणायचं . राखण करायची .
अंबाजोगाईला तर प्रचंड आंबे , शेकड्याने . तिकडे रस काढून आटवून , त्याच्या पोळ्या करून उन्हात वाळवून ठेवायचे .
कुरडया ,पापड्या , सांडगे , भरल्या मिरच्या काय काय करायचे .
उन्हाळ्यात कधी करमलं नाही असे झालेच नाही .
No comments:
Post a Comment