Friday, May 19, 2017

हल्ली माझे एक type चे पेशंट म्हणजे नवीन लग्न झालेल्या आणि तंत्र बिघडलेल्या मुली . 

ह्या सगळ्यांमध्ये काही कॉमन फॅक्टर्स असतात :-

शिकलेल्या , हुशार , नोकरी करणाऱ्या 
आईवडिलांच्या लाडोबा 
दिसायला गोड 
घरकाम काही येत नाही . 
ह्यांना आईने जेवू घातलेलं असतं , सकाळचा चहा , नाश्ता , डबा  दिलेला असतो . 

त्याना आयत्या वेळी उठायची सवय , आईने काही केले तरी " काय ग आई , रोज रोज काय उपमा करतेस , किंवा हि काय भाजी केलीस , मला नको " असे म्हणायची सवय . मग आईने " अगं खा ग " करत मागे लागायचं 

तर अशा ह्या मुली , ह्यांना भूक लागलेली पण कळत  नाही . 

तर सकाळी उठल्या कि सासूचे सगळे आवरून झालेले असते , हिच्या समोर चहा , नाश्ता येतो , मग ओशाळल्या सारखे होते , डब्बा पण तयार असतो . 
आईकडे कुरकुर करायची सवय असते , इथे बोलता येत नाही कि मला हे आवडत नाही , ते आवडत नाही . मुकाट्याने खावे लागते . 
सासू करते बरेच दिवस मग तिच्याही बोलण्यात येऊ लागते कि सगळं मी करते , मी करते . हिला डब्बा देताना पण मी केलाय मी केलाय असं बोललं जातं . 

मग इथेच पहिले ठिणगी पडते , पोरीला पण मानपान असतं , मग ती म्हणते " काही नको तुमचा डबा , मी खाईन बाहेर ". 

मग सासूला वाईट वाटतं कि माझं जेवण हिला नको . 

मुलगी ऑफिसला डब्बा न घेता जाते , तिकडे गेल्यावर भूक लागते मग हे खा , ते खा होतं , त्याने पोट भरत नाही आणि बाहेरचं खाऊन खाऊन ऍसिडिटी होते , पोट दुखतं , बिघडतं . 

मग हि पोरगी ट्रीटमेंट साठी येते . 

बरोबर नवरा असतो , तो पण कच्चा , काही कळत नाही . काहीतरी बिघडतंय एवढं कळतं पण काय करावे के उमजत नाही . 

मुलींचं काय होतं , ऑफिस मध्ये पण त्या जुनिअर असतात , तिकडे पण बोलणी खावी लागतात आणि घरी आल्यावर सासरी पण . हे दोन्हीकडून त्रास झाल्यावर त्या सहन न होऊन त्या पळून जातात . 



*************************************************************************

माझी  सगळ्या सासूबाईंना request आहे कि सुनेला आपल्याला काही काम करायचे आहे हे लक्षात यायला वर्ष लागेल , त्यांच्या कडून काही अपेक्षा करू ना आणि काही बोलू नका , बाकीच्यांना जेवायला घालता त्यात अजून हि एक . 

मुली होतात शहाण्या पण जरा टाइम लागतो . धीर धरा , don't  give  up . 

********************************************************************************














No comments:

Post a Comment