Saturday, May 20, 2017

एक पेशंट आली होती १८-१९ वय असेल , तिची आई सोबत होती . 

एवढा उन्हाळा आहे पण  synthetic material चा टॉप आणि जीन्स घातले होते . 

काय होतंय ?

तर तिला बऱ्यापैकी skin infection झालं होतं . खूपच होतं . 

मी तिला Dermatologist कडे जायला सांगितलं , आणि एकाच बोलले एवढ्या उन्हाळ्यात synthetic घट्ट कपडे घातले तर स्किन इन्फेकशन होणारच , या दिवसात घाम येतो आणि शोषला नाही गेला तर उबल्या सारखा होतं . सुती  सैल कपडे घाल . तिच्या आईला काय वाटलं कोण जाणे ? म्हणाली  स्त्रियांनी कुठले कपडे घालावे हे ठरवण्याचा त्यांना हक्क आहे . तिला वाटलं कि मी तिच्या  स्त्री स्वातंत्र्यावर घाला घातला . 

तिच्या आईला माझा राग आला होता . 

मी काय म्हणते आहे हे तिला कळलंच नव्हतं 

******************************************************************************************************

मागे मी मॅटर्निटी प्रॅक्टिस करत होते ( आता बंद ) 

नॉर्मल डिलिव्हरी व्हायचं प्रमाण कमी कमी होत चाललं होतं . सगळं व्यवस्थित असणाऱ्या पण डिलिव्हर होता होत नव्हत्या . आपल्याकडे मागे उठबस खूप व्हायची , बायकांना कंबरेला व्यायाम भरपूर होता . आता ते खुचीवर , सोफ्यावर , ऑफिस मधे  एका जागी खुर्चीवर बसून व्यायाम होत नाही आणि डेलिव्हरीला त्रास होतो 

तेंव्हा ANC exercise नावाचा प्रकार सुरु करून बघितला होता , आजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही . Additional  खर्च कोण करेल ? एक नवरा तर म्हणाला होता , हीचI  खर्च माहेरचेच करणार आहेत , झालं सीझर तर झालं , त्यांनाच खर्च पडेल .
मला काय ?

एका पेशंटला सांगितलं होतं कि तू जेवायला खाली जमिनीवर बसत जा आणि दुसरं कोणी जमिनीवर बसलं तर वाकून वाढत जा . हा व्यायाम आहे . तर ती म्हणाली " आमच्या कडे डाईनिंग टेबल आहे . 

पुन्हा Dead End  !!

बऱ्याच पेशंटच्या माता म्हणतात , आमची एकुलती एक मुलगी आहे , आणि होऊन होऊन  किती  बाळंतपणं होणार आहेत , का म्हणून तिने कळI  सोसायचा ? सीझर करा . 


मला एका collegue ने सांगितलं -- तुझा हा practical common sense कुणाला नकोय . . 

ठीक आहे  Times have changed.

जो तुमको हो पसंद वही बात करेंगे !! 















No comments:

Post a Comment