Saturday, May 20, 2017

बायकांचे पॉलिटिक्स :---

आमचं नवीन लग्न झालं होतं , ५-६ महिनेच झाले असतील , सासूबाईंची मोठी बहीण आली होती . 
माझ्या नवऱ्याला काहीतरी काम सांगितलं होता आणि त्याने केलं नव्हतं का विसरला होतI , आता आठवत नाही . 
सासूबाईंना भयंकर राग आला आणि त्यांनी जो तोंडाचा पट्टा  सोडला :--- काही कामाचा नाही , एक काम करत नाही , अशी कशी विसरता कामं , काही जबाबदारीची जाणीव नाही .. ठण ठण ठण . 

खरं म्हणजे मला जरा बरंच वाटलं होतं कारण माझी  आई पण अशीच बोलायची , म्हणजे हे लोक आपल्यासारखेच आहेत तर . 

सासूबाईंची मोठी बहीण त्यांना म्हणाली " अगं आपला मुलगा कितीही धांदरट असला , एक नंबरचा ठोंब्या असला तरी सुनेसमोर त्याला असं वाट्टेल तसं बोलू नये , तिला वाटेल  त्याच्याशी असंच बोलायचं असतं . 

1 comment:

  1. 1XBet
    Betting sol.edu.kg in India. It can be great to find the most popular brands, especially ones that offer betting on sports gri-go.com such as football, tennis,  1xbet login Rating: 1/10 · ‎Review by Riku VihreasaariWhere can I find worrione 1xbet?Where can I find 1xbet betting?

    ReplyDelete