Wednesday, May 31, 2017

आतले आणि बाहेरचे :==

बऱ्याच वर्षांपूर्वी एक कथा आली होती 'आतले आणि बाहेरचे '

एका ट्रेन मध्ये एका माणसाला चढायचं असतं , ट्रेन मधली माणसं त्याला आत येऊ देत नाहीत , दार आतून बंद करतात , कसाबसा हा चढतो .

मग अजून माणसे येतात मग हा पण त्या लोकांना चढू देत नाही , कारण हा आता आतला झालेला असतो आणि आता बाहेरचे त्याला नको असतात .

****************************************************************

आपल्या दैनंदिन जीवनात पण आपण system च्या आतले आहोत का बाहेरचे ह्यावर आपला दृष्टिकोन असतो .

एखाद्या कंपनीचा मालक कंपनीचे प्रॉफिट वाढवायला कामगारांकडून कमीतकमी पैशात जास्तीत जास्त काम काढून घेईल , कामगार लोक जास्तीतजास्त पगार व बेनेफिट मिळवायचे प्रयत्न करतील . दोघांचे equation एकमेकांना पटले तर कंपनी चालेल नाहीतर बंद पडेल .
मालकाने कमी पगार दिला तर कामगार सोडून जातील आणि कामगारांनी फारच त्रास दिला तर मालक कंपनी बंद करेल .

समजा मी कस्टमर आहे , तर मला जास्तीत जास्त सुविधा किंवा वस्तू कमीत कमी पैशात हव्या असतात पण देणार्याला त्या किमतीत परवडत नसलं तर तो quality खराब करेल , त्याने दोघांना त्रास होईल .

समजा कोणाला लोकांना जेवण द्यायचे आहे , तो काँट्रॅक्टरला पैसे अजून कमी करा , अजून कमी करा सांगतो , मग कॉन्ट्रॅक्टर पण बेक्कार जेवण देतो .

समजा मी कुठल्या कंपनीचे shares घेतले आहेत तर माझी अपेक्षा असणार कि त्या कंपनीने मला प्रॉफिट काढून द्यावा पण त्यांच्या गिऱ्हाईकांची म्हणणे असेल कि स्वस्तात माल मिळावा .

शेतकऱ्यांना वाटते कि आपल्या मालाला जास्तीतजास्त भाव मिळावा पण लोकांना वाटतं कि धान्य , भाजीपाला दूध स्वस्त मिळावे . हे महाग झाले कि ते कमी जेवतात किंवा शिळं खातील .

सासूला वाटते कि सुनेनी जास्तीतजास्त काम करावे , सुनेला तसे आजिबात वाटत नाही , समजून नाही घेतलं कि आहेच पुढचं .

हे अगदीच सोप्पं झालं . प्रत्येक गोष्टीची link , chain असते .

कोणी एकाने जास्त हिसकावलं किंवा अडवून धरलं तर सगळी लिंक खराब होऊ शकते .

कुठल्याही व्यायसायाची किंवा बिझनेस ची ताकत नुसत्या प्रॉफिट वर नसते तर तो वर्षानुवर्षे , पिढ्यानपिढ्या चालू राहिला पाहिजे .

जुन्या मुंबईत वालधुनी , Princes street , मंगलदास मार्केट , हिंदमाता मार्केट कितीतरी पिढ्या चालू आहेत . जुने गिर्हाईक कुठून कुठून येतात , तेच नवीन कस्टमर घेऊन येतात . फार माफक भाव असतो .

काही वर्षांपूर्वी आपल्याला फायदा आहे म्हणून जवळच्या ओळखीच्या लोकांना , मित्रांना चुकीच्या ठिकाणी investment चे सल्ले दिले गेले , त्या व्यक्तीला तेंव्हा प्रॉफिट झालं पण सगळ्यांचे संबंध तुटले आणि नाव पण खराब झाले .

फार तुटेपर्यंत ताणू नये , जरा समजुतीने घ्यावे .

तो अमिताभ बच्चन एकदम शहाणा आहे , कुठल्याही जाहिरातीत दिसतो . एकदा म्हणाला होता ' Any transaction should be affordable ' . परवडलं आणि पटलं तरच व्यवहार होतात . तो पैशासाठी अडवत नसेल , त्रास देत नसेल आणि वर cooperate पण करत असेल , मग सगळ्यात जास्त busy तोच असणार .


No comments:

Post a Comment