Saturday, May 20, 2017

हे एक नवीन European घराचे design . त्यांच्याकडे उजेड कमी असतो आणि धूळ पण नसते त्यामुळे मोठ्या खिडक्या , संपूर्ण काचेची दारं , फ्रेंच विंडोज ह्याला नव्या design मध्ये महत्व आहे . आपल्याकडे पण हल्ली खूप घरात असे असते . द्पारी समुद्रावर जाऊन sunbathing करायचं ,tan व्हायचं ह्याचे कौतुक
पण आपल्याकडे उन्हाळा खूप , अगदी कडक, काय हळ्या मारतात , धूळ पण खूप येते . खूप उजेड पण नको वाटतो . सकाळी उन्हं व्हायच्या आत आणि संध्याकाळ झाल्यावरच बाहेर पडावे .
आमच्या ओळखीचे एक कुटुंब आत्ता अलि...बागला जाऊन स्वतःचे हालहाल करून, समुद्रावर जाऊन उन्हात करपून आलेत . काय बोलणार ?
मागे अजून एक कुटुंब उन्हाळ्यात मान्डूगडला गेले होते . तिथले लोक म्हणाले " अहो जाऊ नका हो , आम्ही पण जात नाही, पण हे गेले आणि जबरदस्त heat stroke ने आजारी पडले .
आपण कितीही थोर असलो तरी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या निसर्गाशी जूळवून घ्यावेच लागते आगदी मनाला येईल तसे नाही वागता येत .

No comments:

Post a Comment