Friday, May 19, 2017

आमच्या ओळखीचे एक जोडपे आहे , ६५ +. त्यांची गंमत  म्हणजे ते एकदम फ्रेश असतात आणि सारखे कुठे कुठे जात असतात आणि सारखी मजा करत असतात .

त्यांचा जरा स्टडी केला कि हे असे कसे ? बाकीचे तर कंटाळून गेले आहेत , तर संशोधनानंतर हा निष्कर्ष आला कि ते दोघे आजिबात भांडत नाहीत . कुणी एकाने काही म्हटले कि दुसरा लगेच हो म्हणतो आणि तसे करतात . No वादावादी , आजिबात नाही , त्यामुळे त्यांची energy waste होत नाही .

आम्ही बाकीचे लोक उखाळ्या पाखाळ्या काढणे , हमरी तुमरीवर  येणे regularly करतो . त्यात एक भाग असा असतो कि आपला partner योग्य आणि बरोबर जरी बोलत असेल तरी विरोध करायचा म्हणून करायचा . काहीतरी खडूस बोलायचं . म्हणजे ह्याचं एकदा ऐकलं कि नेहेमी ऐकायला लागेल आणि पार्टनर सारखा म्हणत राहील कि हे माझ्यामुळे झालं , ते माझ्यामुळे झालं .

हे दोघे असं आजिबात करत नाहीत आणि फार गोड  आवाजात एकमेकांशी बोलत असतात . त्यांचं बोलणं ऐकलं तरी आम्हा उर्वरित जणांना कसं तरीच होतं  . हिडीसफिडीस करणे , वसवस करणे , चुका काढणे , हे आमचे आवडते उपक्रम असतात .


आजकाल जे नवरा बायको बहुतेक divorce घेणार नाहीत तेच एकमेकांना हिडीस फिडीस करू शकतात .

बाकी कोणाला नाही .

आपल्या कामवाल्यांना नाही , मुलांना नाही , रिक्षावाल्यांना नाही , माथाडी कामगारांना नाही ,( शेतकऱ्यांना तर आजिबात नाही)

तर आता सौजन्याने वागावे लागणार.



No comments:

Post a Comment