Saturday, May 20, 2017

डॉक्टर लोकांच्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक --MR ..medical representative .
एक उमदा उत्साही तरुण MR येतो--
एखाद्या product बद्दल खूप खूप बोलतो --
...
"हे product कृपया वापरा , available नाही अजून मार्केट मध्ये पण तुम्ही लिहिलं तर होईल "
परत काही दिवसांनी येतो

"अरे बाळा लिहिलं तुझं product पण कुठेच मिळत नाही "
"हो हो कळलं मला , बघतो मी , करतो available "
मग product available होतं , थोडे दिवस बरे जातात .
थोड्या दिवसांनी परत येतो --" अरे बाळा चांगलं आहे हं तुझं product , पेशंट खुश आहेत "
" Madam त्या productचे आता नाव बदलले आहे , आता हे लिहा "
थोड्या दिवसांनी.....
"अहो madam आता नका लिहू ते "
"का?"
"ते आता दुसऱ्या division मध्ये गेलं --आता हि नवीन products लिहा "
"पण कंपनी तर तुमचीच आहे न ?"
"नाही आता नका लिहू "
परत थोड्या दिवसांनी येतो "मी आता कंपनी बदलली आहे , तिकडे मला चांगले package मिळाले , आता हि products लिहा "
एक २० वर्ष पूर्वीचा MR येतो , थोडा पिकलेला पण ओळखणेबळ ---त्याला बघून त्याची सगळी products आठवतात . "वा madam memory चांगली आहे तुमची , पण आता मीच नवीन कंपनी काढली आहे , अजून products बाजारात नाहीत , पण तुम्ही लिहिलं तर होतील "
ह्या pharma industry चा aim-in-life काय आहे देव जाणे , to छळ the doctors हाच असावा .
सारखी उलथापालथ त्यामुळे काही लक्षात रहात नाही , शेवटी मी मला हव तेच लिहिते !!
Stability नावाची काही चीज आहे का नही ?

No comments:

Post a Comment