Wednesday, May 31, 2017


1-4-17

काही असे पेशंट येतात , BP वाढलंय , Bl sugar  वाढलीय  , का ? तर गोळ्या घेतल्या नाहीत . का ? तर संपल्या , मग आणल्या का नाहीत ? विसरलो , कंटाळा केला , पैसे नव्हते , वाटलं नाही घेतल्या तर काय होईल ? काही नाही होणार .
मग जे काही होतं ते एवढं महाग पडतं कि गोळ्या  घेतल्या असत्या तर बरं झालं असतं  असं वाटतं . चांगलाच पश्चाताप होतो .
कधी कधी epilepsy चे पेशंट पण मनानेच अशाच कारणाने गोळ्या बंद करतात . मग त्यांना कुठेही आकडी convulsion येतं . त्यावेळी ते कुठेही असू शकतात .
रस्त्यात , गॅस जवळ , काही काम करताना, कुठेही . त्यांना त्या वेळी ट्रीटमेंट मिळेल असे नाही . त्यांच्या किंवा त्यांच्यामुळे दुसऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा इजा होऊ शकते .
ह्या लोकांना जर घरपोच दर महिन्याला किंवा १५ दिवसांनी ही औषधे मिळाली तर खूपच प्रॉब्लेम व complications कमी होतील .
समजा त्यांनी एखाद्या website किंवा NGO कडे नोंदणी केली तर ते हि जबाबदारी घेऊ शकतात .
खूप सिनियर citizens  हल्ली एकटेच राहतात , त्यांना पण हि सुविधा उपयुक्त ठरू शकेल .पैसे असतात पण आणून द्यायला कोणी नसतं ..
ज्या NGO लोकांना काम करायचे असेल त्यांना हे जमेल


4-4-17

अशा खूप पोस्ट येतात:----

शहरातल्या लोकांना  खेड्यातले जीवन कळत नाही ,
शेतकरी लोकांचे हाल AC मध्ये  बसणार्यांना कळत नाहीत ,
जज्ज लोकांना आरोपींचे दुःखच कळत नाही .

डॉक्टर लोकांना पेशंटचे व्याप कळत नाहीत ,

मुलीच्या बापाचे दुःख कोणाला कळत नाही

विदर्भाच्या समस्या उर्वरित महाराष्ट्राला कळत नाहीत .

नोकरी करणाऱ्या बाईचे हाल घरी बसणाऱ्या बायकांना कळत नाहीत .

शिक्षक , छोटे दुकानदार , LIC agent , पोलीस , सीमेवरचे सैनिक , पत्रकार , कोणीही . कुणी त्यांना समजूनच घेत नाही .
(डॉक्टर लोकांना पण कुणी  समजून घेत नाही) .

तर काय बरं करावे ?

मला वाटतं सामाजिक churning झालं पाहिजे . म्हणजे   AC मध्ये बसणार्यांनी बाहेरचे  जग बघावे , उन्हातान्हात फिरणार्यांनी  ऑफिस मध्ये एका जागी बसून दाखवावे .

मला पण डॉक्टरकीचा कंटाळा आला आहे . Actually I think I am a good doctor and proud of it too , but I would like to do something different .


मला शेतकऱ्यांची पत्रकार व्हायला आवडेल . कसं आहे नेमकं यांचं जीवन  समजून घ्यायला आवडेल .

बघू जमतंय का ?

नुसता वाद घालण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्यावे नाही का ?












शहरातल्या लोकांना शेतीतलं काही कळत नाही , खरं आहे ते , शहरातल्या लोकांची शेती म्हणजे बाल्कनीतल्या कुंड्यांना  आठवणीने पाणी घालणे . तेवढं केलं तरी खूप .
आता काही जणांचे बंगले , बागI आहेत पण आता फार कमी .

आता हे शेतकरी आणि कर्जमाफी आपला विषय नाही , मान्य !! पण सारखं सगळ्या चॅनेल वर हीच चर्चा , कानावर पडतंच .  आणि सरकार का नाही म्हणत आहे हे पण समजत नाही .

१) सरकारला नगद पैशापेक्षा . सुविधा निर्माण करायच्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यालाच फायदा होईल .

२) शेतकऱ्याला Income tax  माफ आहे , बरोबर आहे पण मग एक विवरणपत्र किंवा वर्षाचा खर्चाचा अहवाल सादर करू शकतात . टॅक्स नका भरू .

३) शेतकऱ्याला सांभाळून घ्यायचं असेल आणि तो सारखा सारखा संकटात सापडत असेल तर काय चुकतंय ते बघायला नको का ?

४) हल्ली बँकI कशा 'Relationship manager ' एकेकI  क्लायंटला   allot करतात तास एक accounts  and auditor type चा माणूस शेतकऱ्याला allot करावा . त्याने ते कुठे खर्च करतात काय चुकतंय हे सरकारच्या लक्षात  आणून द्यावे म्हणजे उपाययोजना करता येतील .
ते regular saving करतात का ?  शेतकऱ्याला एकदम पैसI मिळतो  तेंव्हा वेडावाकडा उडवला जाऊ शकतो का ?

शहरातल्या लोकांचा महिन्याचा पगार असतो ,त्यात ते आपलं बजेट बरोबर बसवतात .


५) ३३००० कोटी हि काही लहान रक्कम नाही , हि रक्कम tax payer च्या खिशातलीच जाणार आहे , तेंव्हा taxpayer ला अधिकार आहेत प्रश्न विचारायचे .

६) दारूच्या व्यसनIपायी  हे प्रकार होत असतील तर व्यसनमुक्ती केंद्रे उभारावीत .

७) लग्नात अफाट खर्च करत असतील तर सामाजिक समुपदेशन व्हावे , लग्न करून मुलगी आणायची आणि कर्जापायी तिच्या बापाने आत्महत्या करायची हे आजच्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या तरुणाला शोभत नाही .

८) मूळ प्रॉब्लेम कुठे आहे हे मोकळेपणाने सांगितले तर उपाय शोधता येतिल .

९)  रावसाहेब दानवेंच्या मुलाचे लग्न झाले त्यावर गदारोळ झाला , तेंव्हा टीव्ही वरच्या चर्चेत सतत हेच सांगितले कि खर्च मुलीकडच्यांनी केला , ते सधन शेतकरी आहेत .

१०) गेल्यावर्षी तूर डाळीचा तुटवडा होता , या वर्षी अफाट पीक आले आहे , मग निर्यातीची परवानगी का मिळत नाही ? हे decision पटपट घेता आले पाहिजेत

११) कुठलीही मोठ्या कामाचा जसा project report असतो तसI महाराष्ट्रातल्या शेतीचा हवा . कोण कुठलं पीक घेतो आहे , उत्पन्न साधारण किती असेल , किती किंमत येईल  . हे सगळं computerize करता येऊ शकतं .

१२) करायचं असेल तर खूप करता येईल , logical and data based  चर्चा असतील तर , emotional नकोत.















8-4-16

मध्ये आमच्या एका ग्रुप चे get- together झाले . सगळे साधारण  ६० वयाचे .
सुरुवात झाली तेंव्हा सगळे सारखेच होते साधारण ३५-४० वर्षांपूर्वी पण मग सगळ्यांच्या वाट बदलल्या .

१) काही भारतातच राहून छोटे मोठे व्यवसाय करणारे

२) Government servant

३) कॉर्पोरेट जगात वावरणारे

४) परदेशी स्थायिक


सगळ्यांचा mindset वेगळा वेगळा झालाय .
Approach  to various things in life  फार बदलला आहे .

Basically पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे .

'Doing very well in life ' ची व्याख्या पण वेगवेगळी आहे .

जे भारतातच राहिले आणि आपापले उद्योगधंदे सुरु केले , त्यांचे सुरुवातीला फार हाल झाले आहेत . They were looked down upon.  पण आता बघितलं तर एवढी काही वाईट कंडिशन नाहीये असे वाटते

स्वतःचा व्यवसाय करणारे फार forthright आणि स्पष्ट बोलणारे वाटले . Corporate जगातले फार सांभाळून बोलतात , अगदी cautious .

सरकारी नोकर काहीच बोलत नाहीत .

परदेशात राहणारे पण मोजून मापून बोलतात .

एक observation .








आतले आणि बाहेरचे :==

बऱ्याच वर्षांपूर्वी एक कथा आली होती 'आतले आणि बाहेरचे '

एका ट्रेन मध्ये एका माणसाला चढायचं असतं , ट्रेन मधली माणसं त्याला आत येऊ देत नाहीत , दार आतून बंद करतात , कसाबसा हा चढतो .

मग अजून माणसे येतात मग हा पण त्या लोकांना चढू देत नाही , कारण हा आता आतला झालेला असतो आणि आता बाहेरचे त्याला नको असतात .

****************************************************************

आपल्या दैनंदिन जीवनात पण आपण system च्या आतले आहोत का बाहेरचे ह्यावर आपला दृष्टिकोन असतो .

एखाद्या कंपनीचा मालक कंपनीचे प्रॉफिट वाढवायला कामगारांकडून कमीतकमी पैशात जास्तीत जास्त काम काढून घेईल , कामगार लोक जास्तीतजास्त पगार व बेनेफिट मिळवायचे प्रयत्न करतील . दोघांचे equation एकमेकांना पटले तर कंपनी चालेल नाहीतर बंद पडेल .
मालकाने कमी पगार दिला तर कामगार सोडून जातील आणि कामगारांनी फारच त्रास दिला तर मालक कंपनी बंद करेल .

समजा मी कस्टमर आहे , तर मला जास्तीत जास्त सुविधा किंवा वस्तू कमीत कमी पैशात हव्या असतात पण देणार्याला त्या किमतीत परवडत नसलं तर तो quality खराब करेल , त्याने दोघांना त्रास होईल .

समजा कोणाला लोकांना जेवण द्यायचे आहे , तो काँट्रॅक्टरला पैसे अजून कमी करा , अजून कमी करा सांगतो , मग कॉन्ट्रॅक्टर पण बेक्कार जेवण देतो .

समजा मी कुठल्या कंपनीचे shares घेतले आहेत तर माझी अपेक्षा असणार कि त्या कंपनीने मला प्रॉफिट काढून द्यावा पण त्यांच्या गिऱ्हाईकांची म्हणणे असेल कि स्वस्तात माल मिळावा .

शेतकऱ्यांना वाटते कि आपल्या मालाला जास्तीतजास्त भाव मिळावा पण लोकांना वाटतं कि धान्य , भाजीपाला दूध स्वस्त मिळावे . हे महाग झाले कि ते कमी जेवतात किंवा शिळं खातील .

सासूला वाटते कि सुनेनी जास्तीतजास्त काम करावे , सुनेला तसे आजिबात वाटत नाही , समजून नाही घेतलं कि आहेच पुढचं .

हे अगदीच सोप्पं झालं . प्रत्येक गोष्टीची link , chain असते .

कोणी एकाने जास्त हिसकावलं किंवा अडवून धरलं तर सगळी लिंक खराब होऊ शकते .

कुठल्याही व्यायसायाची किंवा बिझनेस ची ताकत नुसत्या प्रॉफिट वर नसते तर तो वर्षानुवर्षे , पिढ्यानपिढ्या चालू राहिला पाहिजे .

जुन्या मुंबईत वालधुनी , Princes street , मंगलदास मार्केट , हिंदमाता मार्केट कितीतरी पिढ्या चालू आहेत . जुने गिर्हाईक कुठून कुठून येतात , तेच नवीन कस्टमर घेऊन येतात . फार माफक भाव असतो .

काही वर्षांपूर्वी आपल्याला फायदा आहे म्हणून जवळच्या ओळखीच्या लोकांना , मित्रांना चुकीच्या ठिकाणी investment चे सल्ले दिले गेले , त्या व्यक्तीला तेंव्हा प्रॉफिट झालं पण सगळ्यांचे संबंध तुटले आणि नाव पण खराब झाले .

फार तुटेपर्यंत ताणू नये , जरा समजुतीने घ्यावे .

तो अमिताभ बच्चन एकदम शहाणा आहे , कुठल्याही जाहिरातीत दिसतो . एकदा म्हणाला होता ' Any transaction should be affordable ' . परवडलं आणि पटलं तरच व्यवहार होतात . तो पैशासाठी अडवत नसेल , त्रास देत नसेल आणि वर cooperate पण करत असेल , मग सगळ्यात जास्त busy तोच असणार .


रात्री जागणारे * सकाळी उठून बसणारे
दुपारी झोपणारे * दुपारी फ्रेश असणारे व कामे करणारे
सकाळी फ्रेश * संध्याकाळी फ्रेश
veg * nonveg
झोपताना AC , पंख लागणारे * आजिबात काही नको असलेले
गरम चहा पिणारे * चहा गार झाल्यावर पिणारे
अशा लोकांचे एकमेकांशी आजिबात पटत नाही पण उप्परवाला अशाच जोड्या जमवतो

Tuesday, May 30, 2017

8-4-17

ऊन आहे, ऊन आहे, किती ऊन आहे  !! खूप म्हणून झाले , आता एप्रिल मध्ये ऊन असणारच .

One should take advantage of the  ऊन .

मी घातले पांघरुणं , ब्लॅंकेट  सगळे उन्हात ठेवले ४-५ तास , मस्त कडक झालेत . ऊन is the best disinfectant . काही वास वगैरे असतात ते पण जातात .

हॉस्पिटलच्या पण गाद्या , चादरी , ब्लॅंकेट  उन्हात घातले .


आमच्या सासूबाई तर उन्हाळ्यात काय काय करायच्या ! , त्यांचा तर timetable असायचा . बटाटयाचा कीस , पापड्या , पापड, आणि अजून बरंच काही . हल्ली सगळं मिळत बाजारात म्हणून घरोघरी करणं कमी झालंय , पण मजा यायची दिवसभर . ते उन्हात घालायचं , मग संध्याकाळी आत आणायचं . राखण करायची .

अंबाजोगाईला तर प्रचंड आंबे , शेकड्याने . तिकडे रस काढून आटवून , त्याच्या पोळ्या करून उन्हात वाळवून ठेवायचे .

कुरडया ,पापड्या , सांडगे , भरल्या मिरच्या  काय काय करायचे .

उन्हाळ्यात कधी करमलं  नाही असे झालेच नाही .






आम्ही आता semi- म्हातारे झाल्यापासून सेमी म्हातारे असल्याचा फायदा घेत आहोत .

म्हणजे आपणहून संध्याकाळी क्लिनिक मध्ये जात नाही ,कोणी आलं तर जातो . म्हणजे तयार होऊन बसतो घरात टीव्ही बघत . कॉल आला कि जातो . समोरच आहे . ट्रॅव्हलिंग टाइम २ mins म्ह्णून जमतंय .

तर असेच एकेदिवशी बसलो होतो आणि एकाच वेळी दोघांकडे पेशंट आले , लगेच उठून निघालो .
तर नवरा म्हणतो डेपो मधून ड्रायव्हर कंडक्टर बाहेर पडले .

म्हटलं हे काय , पण पटलं ,तसंच वाटलं ते . ते ST स्टॅन्ड वर पासिंजर लोक मIनI टाकून बसलेले असतात आणि एकदम डेपो मधून ड्रायव्हर कंडक्टर बाहेर येतात कि त्या पासिंजर लोकांच्या जीवात जीव येतो , मग ते ड्रायव्हर कंडक्टर सगळ्या लोकांवर वसवस करत , " चला आता बसा गाडीत " करत , बऱ्यापैकी हिडीसफिडीस करत गाडी चालू करतात .

नवऱ्याला म्हटलं ते पायलट co-pilot तरी म्हणायचं , ते दोघं असे handsome handsome आले तरी पण त्या departure lounge मध्ये बसलेल्या लोकांना हायसं वाटतं . त्याच्या आधी त्या सुंदऱ्या टॉकटॉक करत गेलेल्या असतात .

पण मग वाटलं आपल्याला ड्रायव्हर कंडक्टरच बरोबर आहे .


5-4-17


ते सरकार , शेतकरी आणि कर्जमाफी हे काय गणित आहे कळतंच नाही .

ते UP वाल्यांची आल्या आल्या कर्जमाफी करून टाकली , महाराष्ट्रात काय वेगळं आहे .

१)  ४०३ पैकी ३१२ BJP ला सीट्स मिळाल्या आहेत , जनतेनी प्रचंड विश्वास दाखवला आहे .

२) तिथे धरणं बंद , जलयुक्त शिवार कर असल्या गोष्टी करायच्या नाहीयेत , भरपूर पाणी आहे . तो पैसI वाचला

३) महाराष्ट्रात युती करावी लागली , एकहाती सत्ता नाही , महारष्ट्रातून फारच दूषणे दिली गेली , वाईट शब्द वापरले . तरीपण युती केली .

नाही म्हटलं तरी मन नाराज होणारच , त्यात हे विरोधी पक्ष काय राजकारण करत आहेत कळतंच नाही .

या सगळ्या प्रकारात महाराष्ट्र नावडता झाला असेल .

इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्र खूप पुढे आहे , केंद्र सरकारला  Panoramic view असतो . जे मागे आहेत , तिथे लक्ष द्यावे असे वाटते . सध्या North East  मध्ये बरेच काम चालू आहे .

जरा सबुरीने घ्यावे , सारखे उखाळ्या पाखाळ्या काढणे बरे नव्हे .

समजा एखाद्या माणसाला vision असेल , मला हे करायचंय ते करायचंय , काहीही, शाळा काढायची आहे , बाग बनवायची आहे , फॅक्टरी काढायची आहे , हॉस्पिटल काढायचे आहे .

ती व्यक्ती एकटी तर काही करू शकणार नाही , मदत तर लागणारच .मग मदतीला येणारे आधी हेच म्हणणार " तुमची vision असू द्या हो त्यात आम्हाला काय ? का म्हणून आम्ही तुम्हाला मदत  करावी ?


प्रत्येक ठिकाणी वाटI काढायचा झाला तर काम बेक्कार होणारच.



आपलीकडे असे काम बेस्ट झाले पाहिजे हा funda नाहीच आहे , ह्यात वाटI किती काढणार हे बोला ?  मग खर्च वाढवायचा आणि करायचं . ह्यात कामं पांचट होत जातात .


आपल्यापैकी बरच जण Europe ला गेले असतील . तिथले रस्ते आणि बांधकामं बघून अचंबित व्हायला होतं , एवढ्या जुन्या वIस्तू आणि अजून छान ?

म्हणजे बनवतानाच classy बनवलेल्या असतात .


Maintainance पण आहे.


आता पैसेI खूप फिरतो आहे पण तो जातो कुठे तेच कळत नाही.


System मधला पैसे काढला आणि वैयक्तिक खिशIत  गेला  तर त्याला यश नाही . System ला खिळखिळी करून वैयक्तिक स्वार्थ साधून समाधान पण नाही .



ही  मानसिकता बदलणे हेच योग्य आहे


हे ब्रिटिश जेंव्हा राज्य करत होते तेंव्हा तर त्यांनी आख्खा भारत  देश लुटला , ती लूट सरकार जमा झाली का भ्रष्टIचार  झाला ? बहुतेक झाला नसावा , असता तर एवढे  वर्ष राज्य करणे जमलेच नसते .


ब्रिटिशांनी केलेली बांधकामे अजून चांगली आहेत आणि उपयुक्त पण आहेत .


करतानाच काम छान करायचे ही प्रवृत्तीच जोपासली पाहिजे .





Monday, May 29, 2017

एका वेळेला चार बाळं गेली , सगळ्यांच्या अंगावर लाल चट्टे होते .
काय झालं होतं बाळांना ? Diagnosis काय होतं ? प्रत्येकाचे वेगवेगळे होते का एकंच होते ?
त्यांना एकंच इंजेकशन दिले का ? एकाच कंपनीचे ? कुठले इंजेकशन ?
...
इंजेकशन पेशंटनी आणले होते का हॉस्पिटल तर्फे दिले गेले होते ?
ते औषध हॉस्पिटल तर्फे दिले गेले असेल तर टेंडर भरून सगळ्यात स्वस्तातले घेतले होते का ?
बाहेरून आणले असेल तर कुठल्या दुकानातून , कुठल्या कंपनीचे होते ?
बाळांना incubator मध्ये ठेवले होते का / त्यात काही प्रॉब्लेम झाला का ?
पत्रकार लोकांनी आता वरवर बातम्या द्यायचे बंद करावे .
या बातमीनंतर डॉक्टरना मारहाण झाली . संपलं का ?.
शोध पत्रकारिता पुढे चालू ठेवणे .
*******************************************************
मागे एकदा अशाच एका वेळी फॅमिली प्लॅनिन्ग ऑपेरेशन नंतर खूप बायका दगावला होत्या .
नंतर कळलं कि त्यांना दिला गेलेले इंजेकशन एका डबड्या कंपनीतून वशिल्याच्या माणसाकडून घेतले होते .
ती बातमी आली होती .. पुढे काय झाले माहित नाही .
************************************************************
हे सरकारी हॉस्पिटल मध्ये औषधे आणणे वगैरे वेगळे लोक करतात . सगळ्याला जबाबदार डॉक्टरला धरून त्यांनीच मार खायचा हे योग्य नाही .
*********************************************************
माझा त्या डॉक्टरांची बाजू घ्यायचा प्रयत्न नाही पण मूळ कारण शोधून काढावे नाहीतर अजून अशा दुर्घटना होऊ नयेत .


http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/relatives-attacks-doctor-after-infant-deaths-in-amravati/articleshow/58892973.cms

Sunday, May 28, 2017

अजून एका हॉस्पिटलची ठाण्यात तोडफोड झाली .

टीबी व दारू पिऊन लिव्हर खराब झालेला माणूस कसं तरी करतोय म्हणून हॉस्पिटल मध्ये आणला तर तो गेला होता . असा कसा गेला म्हणून तोडफोड आणि मारहाण.
म्हणजे ट्रीटमेंट करून गेला तरी मारहाण , काही केलं नाही तरी मारहाण .

...

हे private हॉस्पिटल मध्ये किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये , कुठेही

हे ठरवून होत आहे का ?

आणि आलेल्या पोलिसांना सुद्धा मारलं .

सरकार अशा लोकांना नेहेमी पाठीशी घालत आलेलं आहे पण हे समाजकंटक Frankenstein सारखे डोईजड होतील . आपण काही केलं तरी आपल्याला काही शिक्षा होणार नाही हि खात्री असावी .

असेच लोक सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करतात , तेजस एक्सप्रेसचे उदाहरण आहेच . आता तर पोलिसांना पण मारू लागले आहेत . पोलीस म्हणजे सरकारच आहे .

भावनेचा उद्रेक म्हणजे दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची नासधूस करायची .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला accident झाला तरी किती द्वेषाने भरलेल्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या .

लोकांच्या मनात जाम खदखद आहे . ती अशी बाहेर पडते ,या भावनेला पोसणारे पण खूप आहेत .

यावर मोठ्या प्रमाणावर सामाजिक विचार झाला पाहिजे .


http://www.hindustantimes.com/mumbai-news/patient-s-relatives-assault-two-doctors-injure-four-cops-with-stones-in-thane/story-hKqsUuA6WTSPCYy7SwURhN.html


आमचं लग्न झालं तेंव्हा मला २ आयटम येत होते , दूध तापवणे व कुकर लावणे . That's all !!


त्यात लग्नानंतर २-३ महिन्यांनी आमच्या सासूबाई २ दिवसांसाठी गावाला गेल्या . 


मग आता ! 


खूप विचार करून आमटी भात करायचे ठरवले .  कुकर  लावून झाला 


सासर्यांनी मला आमटी करायला शिकवले . अशी फोडणी करायची , डाळ रवीने एकसारखी करून घ्यायची , मग घालायची , मग कोमट पाणी घालायचे . उकळी आल्यावर गुळ  , कोकम , गोडा मसाला , तिखट , मीठ हळद ( not in this order ) . मग चव घ्याची , adjustment करायची ,शेवटी खोबरं कोथिंबीर घालायची . 


मी त्यांना विचारलं , तुम्हाला कसं काय येतं , तर ते म्हणाले , मी लहानपणापासून स्वयंपाक करतोय .


त्यांची मला वेळोवेळी खूप मदत झाली आहे . 


***********************************************


मध्ये एकदा मी नवऱ्याला काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले आपल्याला पण सून येईल काही वर्षांनी , तुला पण तिला  मदत करता आली पाहिजे . 


तर तेंव्हा काही बोलला नाही , पण तेंव्हापासून स्वयंपाकात खूपच इंटरेस्ट घेतोय . 

आज ही  भाजी करा , दाण्याचे कूट घाला , आमटीत गूळ कमी पडतोय , उद्या इडली सांबार करा , सांबारात शेवग्यIच्या  शेंगा हव्यात . नारळाची चटणी फार तिखट नाकी . असं बरंच काही . 


मग एक दिवशी " मी prawns आणतो " आणि आणले कि त्याने एकदम firstclass , ते पण नवीन शहाड जवळ एक मार्केट शोधून . 


असं करत राहिला तर एकदम export quality सासरा होईल !!

ई का हुई गवा !!!









Saturday, May 27, 2017

काल आम्ही एक पराक्रम केला तो म्हणजे एका दिवसात दोन सिनेमे पहिले . चि व चि सौ का आणि हिंदी medium .
दोन्ही सिनेमे मस्त .
चि व चि सौ का म्हणजे मागे दूरदर्शनवर गजरा कार्यक्रम व्हायचा , सई परांजपे , दया डोंगरे , अरुण जोगळेकर , श्रीकांत मोघे अशी मातब्बर मंडळी असायची . तसाच वाटला हा सिनेमा . चटकदार खुसखुशीत dialogue , घरगुती मराठी वातावरण .
हिरो , हेरॉईन मस्त , समस्त कलाकार मस्त , आणि contemporary विषय पण आहेत . स्मार्ट आहे picture . लेखिका , दिग्दर्शक यांचे कौतुक . सिनेमाचा एडिटर हुशार आहे .
दुसरा हिंदी मिडीयम , तो मात्र जरा विचार करायला लावणारा आहे , बघितल्यावरच कळेल . आम्ही इरफान खान साठी गेलो . एकतर त्याचा सिनेमाचा चॉईस हटके असतो आणि तो overacting करून त्रास देत नाही , बघा मी कशी acting करतो बघा . नॉर्मल वागतो .
आपल्याकडे शिक्षणाचा प्रकार बदलत चाललाय , त्यावर आहे सिनेमा

Friday, May 26, 2017

मध्ये आमच्याकडे अचानक पाहुणे आले ते पण प्रतिष्ठित . आता काय करावे ? मग भजी केली . काय केलं एकIच पिठात  लांब चिरलेले कांदे , बटाटयाच्या चकत्या , हिरव्या लवंगी तिखट मिरच्या बारीक चिरून आणि केळ्याचे काप असं एकत्र केलं , बाकी नेहेमीचं तिखट , मीठ थोडा ओवा आणि केली भजी .


ते म्हणाले अशी कुठे भजी असतात काय ? कांद्याची वेगळी , बटाट्याची , मिरचीची वेगळी वेगळी करायची आणि हे केळ्याचं भजं काय प्रकार आहे ? असं कुठे भजं असतं काय ?


म्हटलं आधी खाऊन  तर बघा , मग बोला .


असली फक्कड झाली होती भजी ,,, कांदा , मग मधेच कुरकुरीत बटाटा , मग एकदम मिरचीचा झटका आणि मग केळ्याचा गोडवा .


एकदा चालू केल्यावर , आवाज न करता संपली .


मग फक्कड चहा .


पाहुणे खुश.


हा थोडा sensitive topic आहे , पण विचार व्हावा :---


एक सिनेमा आला होता , खूप जुना , मागच्या शतकातला १९४९ मध्ये ---'अंदाज ' . त्यात नर्गिस , राज कपूर आणि दिलीपकुमार होते . त्यात असं होता कि नर्गिसचं लग्न राजकपूर बरोबर ठरलेलं असतं , पण तो दूरदेशी असतो . तेंव्हा तिला दिलीपकुमार भेटतो , ते चांगले दोस्त होतात व हसून खेळून बोलू लागतात . तिचे वडील तेंव्हा तिला सांगतात कि तू ह्याच्याशी जास्त बोलत जाऊ नकोस , तुझं लग्न राजशी ठरलंय त्याला हे आवडणार नाही , पण ती ऐकत  नाही म्हणते कि तसं काही नाही , तो फक्त माझा दोस्त आहे . मग व्हाच तेच होते , हिचे मोकळेपणाने वावरणे , राजचा संशय , भांडणे वगैरे वगैरे .



आतापण माझ्या ओळखीच्या कितीतरी जणांची लग्ने मोडली आहेत , बऱ्याच ठिकाणी विचारलं तर मुलगा फार संशय घेतो , तू त्याच्याशी बोललीसच का ? , तू त्याच्याकडे बघून हसलीसच का ? तू त्याच्या बरोबर स्कूटरवर का गेलीस ? तू त्याचबरोबर कॅन्टीन मध्ये का गेलीस ? असा संशय घेतघेत शेवटी लग्न मोडतात .


त्या मुलींच्या डोक्यात काही नसेल पण , त्यांना मोकळेपणाने वागायची सवय असते तशा वागतात , नवरा , बॉयफ्रेंडला कधी राग येईल सांगता येत नाही ..


मजा म्हणजे आदल्या दिवशी पर्यंत चांगला मित्र असलेला नवरा झाला कि एकदम बदलतो . मुलींना काय झाले कळतंच नाही . लगेच नियम सुरु होतात , हे करायचे नाही , ते करायचे नाही .


मला वाटतं मुलांना लग्न झालं कि एक मालकी हक्काची जाणीव होते , हि आता माझी बायको , हिने मी सांगितल्या प्रमाणेच वागलं पाहिजे , दुसर्याशी बोलली तरी राग येतो . सगळे नवरे असे नसतात पण काही जरूर असतात .

बघता बघता situation बिघडते आणि सगळं बिघडून जातं .


आम्ही मेडिकलला शिकत असताना काही मुलींना सवय होती लाडे लाडे बोलायची ,सरांकडे जाऊन difficulty विचारायची .

आमचे एक म्हातारे सर होते , त्यांनी एकदा वर्गात सांगितलं " तुम्ही मुली हे लाडात येऊन बोलता , हातवारे करता , हसता , बघता त्यात समोरच्याला काय वाटत असेल ह्याचा विचार जरा करत जा . सगळ्या पुरुषांना वाटतं कि माझ्यावर खुश आहे आणि त्यांच्या मनात धुमारे फुटू लागतात . And this is across all strata of society and across all age groups..


थोडा commonsense वापरात जा , जरा alert राहा . उगीच नाही ते होऊन बसायचं . तुम्ही अजून अल्लड आहात , तुम्हाला career करायचे आहे थोडं   सांभाळून .



आजकाल ते IT सेंटर्स. मोठ्यामोठ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नोकरी भरती होते . ते security लोक तर गावाकडून आलेले , तगडे आणि एकटे राहणारे असतात. त्यांना ह्या मुली बघून मनात वरखाली होत असेलच , मग ते मुलींवर attack करतात . मुली लाख म्हणू देत कि आम्ही काही बेताल वागलो नव्हतो पण ह्या प्रकारात जीव त्यांचाच जातो .


मुली पण फार बारीक बारीक , कमी जेवणाऱ्या आणि आपल्याच तंद्रीत असतात . एकटं राहायचं असेल तर स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्यावी .


बऱ्याच वर्षपूर्वी आम्ही राजस्थानला गेलो होतो , तिथे आम्हाला एका हॉटेलमध्ये चहा प्यायला नेलं  होतं . एक्दम साधं हॉटेल होतं . तिथे खेड्यातले गाववाले राजस्थानी आले होते . त्याच्या बायका घुंगट मधे . आमच्या ग्रुप मध्ये सगळ्या बायकांनी जीन्स टॉप्स घातले होते . आम्हाला बघून ते राजस्थानी हसू लागले , मोठ्याने बोलू लागले , त्यांनी असे कपडे घातलेल्या बायका पहिल्याच नसतील . इथे शहरात काही वाटत नाही पण तिकडे ते लोक हसताना पाहून कसलं तरीच झालं .



म्हणजे महिला स्वातंत्र्य बरोबरच आहे पण त्याला जरा सारासार विचाराची सोबत असेल तर जास्त बरे.  



आमच्याकडे कल्याणला गेल्या काही वर्षात खूपच ladies designer wear आणि साड्यांची दुकाने झाली आहेत . सगळीकडे ४०%, ५०% सेल चालू आहेत .

ज्या साड्या २-३ वर्षांपूर्वी २५०००/ वगैरेला होत्या त्या आता १००००/- च्या आत मिळत आहेत .

हे फारच झालं

पण सगळी दुकाने ओस पडली आहेत .

म्हटलं जरा online जाऊन बघावे तर तिथे अजूनच स्वस्त आहेत साड्या आणि ड्रेस .

ये क्या हो रहा है ?

का आपल्याकडे production खूपच झालंय आणि सगळं माल बाहेर काढलाय ?

जास्त  स्वस्त झालं तरी शंकाच येते .

ज्यांच्याकडे लग्न कार्य असतील किंवा ज्यांना हौस असेल त्यांनी आत्ता घेऊन ठेवाव्या काय ?

पण त्या एवढ्या जरीच्या  आणि भारी साड्या वापरल्या पण जात नाहीत .

काय करावे ? What to do ?

Thursday, May 25, 2017

नैसर्गिक ओढ v/s Socio-economic pressures.

वागायचं कसं ---काही केलं तरी काहीतरी बरोबर असतं आणि काहीतरी चुकलेलं असतं .
सैराटच्या निमित्ताने एक प्रश्न :--ते जे वय दाखवलंय समजा १७-२० समजू , त्या वयात निसर्ग थैमान घालतो आणि प्रेमात पडतातच . या वयात गर्भधारणा पटकन होते आणि साधारण २३-२४ पर्यंत मुलीची delivery पण सोप्पी असते .
...
पण शिक्षण अपुरे असते आणि मूल झाले तर अपुरे राहण्याची शक्यता जास्त . मग उत्पन्न पण कमी राहते .
लवकर लग्न करून , बाळ होऊ देऊन ,शिक्षण पूर्ण करणारे क्वचित असतील .
उशिरा पर्यंत शिकत बसले , किंवा लवकर लग्न करून आत्ता मुल नको करत बसले आणि मग झालंच नाही तरी प्रोब्लेम कारण आपल्या समाजात तुम्ही काहीही असा मुल असलंच पाहिजे , नाहीतर आयुष्याला अर्थ नाही . पण आता लोकांनी काळजी करू नये . त्या department मध्ये खूपच medical advances झाले आहेत .
फार उशिरा मुलं झाली तरी प्रोब्लेम असतात .
पण आता समाजाची गरज काय आहे ? मुलामुलींनी स्वतःला घडवणं जास्त गरजेचं आहे का ? मुल लवकर झाले तर trap झाल्यासारखे होईल का ? तो मुलगा किंवा मुलगी जेवढे achieve करू शकले असते त्या पेक्षा कमी पातळीवर राहतील का ? मग आयुष्यभर खंत करत राहतील का ?
थोडा संयम ठेवला तर योग्य नाही का ?
बऱ्याच मुलींनी मुलांवर बलात्काराच्या cases टाकल्या आहेत . कालपर्यंत जे प्रेम वाटत होतं ते एकदम बलात्कारा पर्यंत कसं गेलं हे मुलांना कळलंच नाही . त्यात पोलिस , कोर्ट , आणि समाजात मानहानी आणि पैसे पण खूप दिले जातात . मुलांकडून आईवडिलांची आर्थिक मदतीची अपेक्षा असते , हे झेंगट मागे लागलं तर सगळं कुटुंब खचतं .
आजकाल जग खूप इंटरेस्टिंग झालंय , कितीतरी शिकण्या सारखं आहे , करण्या सारखं आहे . आता तरुण पिढीला खूप उज्ज्वल भवितव्य आहे पण ते त्यांनी आपलं आयुष्य संयमाने हाताळलं तर .
Sairat coffee .
One nut and the rest coconuts !!!!




बायकांनी तिशी ओलांडली कि त्यांचे वजन वाढायला सुरुवात होते . थोडे संसारात स्वास्थ्य आलेले असते . बाळांतपणं झालेली असतात , सुगरण पणा सुद्धा develop झालेला असतो . हे करून खा , ते करून खा चालू असतं . काम पण प्रचंड वाढलेली असतात . चौफेर लक्ष ठेवावे लागते . आई वडील ,सासू सासरे थकत चाललेले असतात . जिम्मेदार्या वाढतात आणि प्रचंड भूक लागते . जेवण जर जास्तच जातं आणि अंगी पण जास्तच लागतं .

मग एक दिवशी आपला गोल गरगरीत फोटो किंवा आरशातले दर्शन किंवा कोणी तरी मारलेला टोमणा ऐकून खूप वाईट ...वाटतं . मागे मी येव्हाडी heroine होते आणि आता हे माझे काय झाले ?

मग त्या तिरमिरीत एका gym ची membership घेतली जाते आणि सगळ्यात महागडं package . Gym चा ड्रेस , bag सगळं तय्यार केलं जातं .

पहिल्या दिवशी जबरदस्त व्यायाम केला जातो . दुसऱ्या दिवशी अंग इतकं दुखतं कि उठवत नाही . तिसऱ्या दिवसा पासून गाडी रुळावर येते . महिना भर मध्ये मध्ये दांड्या मारून व्यायाम होतो .

मग एक दिवशी gym मधे जास्तच गर्दी असते , डोकं काही कारणाने आधीच फिरलेलं असतं , कुणाशीतरी खटके उडतात किंवा measurements घेतले जातात आणि वजन होतं तितकच आणि मापं hardly एखाद्या इंचाने कमी झालेले . मग काय " काय उपयोग किती व्यायाम केला , किती पैसा खर्च केला तरी काही फायदा नाही " असं म्हणून gym बंद !!!

पण असा व्यायाम एकदम बंद केला तर परत शरीर वाढतं आणि ते काहीतरी विचित्रच वाढतं . Dance करणाऱ्या लोकांनी पण एकदम dance बंद केला तरी पण वेगळंच काहीतरी वाढतं .

व्यायाम हा lifelong आहे , सुरु पण हळूहळू करायचा आणि एकदम बंद करायचा नाही , आठवड्यातून दोनदा -तीनदा केला तरी पुरे .

रोजचं regular life आणि आहार नियंत्रण केलं तरी पुरे .

मानसिक स्वास्थ्य हेच चांगल्या आरोग्याचे कारण आहे . Irregular life , insecure life invite trouble .

हल्ली 'Depression ' खूपच लोकांना असतं , म्हणजे बघायला गेलं तर तसे बरे असतात पण depressed . सदा मरगळलेले , उत्साह नाही , काही करायचं म्हटलं कि नको . कारण पण कळत नाही .
मग ह्याला ट्रीटमेंट वगैरे .
काय असतील कारणं ?
...
लोकंच एकमेकांना डिप्रेस करत असतील काय ?
म्हणजे प्रत्येकाकडे काही असतं काही नसतं , मग जे नाही त्यावर बोट ठेवायचं . सहज किंवा मुद्दाम , तर vulnerable होणारच depressed .
म्हणजे " एवढा पैसा आहे पण मूल नाही " , एवढा शिकलेला आहे पण नोकरी नाही , एवढी दिसायला चांगली आहे पण लग्न नाही, असं काहीतरी निघणारच . मग जे आहे ते बघावं , नाही ते सोडून द्यावं .
हल्ली पेशंट पण फार डिप्रेशन मध्ये असतात .
त्या डोकेफिरू सिरीयल बघतात आणि बातम्या म्हणजे आपल्याकडे फक्त वाईटच घडते आहे असे वाटते .
अजून एक मला वाटतं कि टीव्ही वर सतत अतिसुंदर मॉडेल्स , एकदम फिट पुरुष बघून सर्वसाधारण माणसाला आपण तसं कधी होऊच शकत नाही असे वाटत असेल का ?
पॉश घरं , सुंदर परिसर , हे आपल्या वाट्याला येणारच नाही . परदेशात जाऊन आलं कि तर फारच होतं . सगळं जग छान झालंय , आपल्याकडेच हा बकालपणा का ?
सारख्या परीक्षा द्यायच्या , लग्न झालेच पाहिजे , मूल झालेच पाहिजे , घरात अमुक अमुक वस्तू असल्याचं पाहिजेत .
रोजच्या जगण्यातली दगदग करून आल्यावर कोणीतरी दिलासा द्यावासा वाटत असेलच नं , तो कुठेच मिळत नाही .
आम जनतेला खूप काही नको असतं , आहेत त्यात आनंद मIनू शकतात पण तसं होऊच दिलं जात नसेल .
मन खंबीर ठेवणे हाच उपाय आहे . Negative emotionsना थाराच द्यायचा नाही . झेपेल तेव्हडं जगावं , बाकी को मार गोली
पण फारच असेल तर ट्रीटमेंट जरूर घ्यावी .

कचऱ्याचा प्रश्न सगळीकडेच खूप झाला आहे . 

हे एक sink grinder आहे , electricity वर चालते . बेसिनच्या outlet pipe ला बसवायचे . त्यात ओला कचरा टाकला तर तो ग्राईंडरने बारीक होऊन पण पाणी सोडल्यास वाहून जातो  . 

ओल्या कचऱ्याचाच प्रश्न जास्त आहे , वास येतो व जंतू पसरू  शकतात . 

ह्याबद्दल बरीच माहिती इंटरनेट वर आहे . 

त्याचे पुढचे प्रॉब्लेम्स , maintainance , किंमत , कुठे मिळत वगैरे काही माहित नाही . 

ह्याचे मोठे version काढलेलं जिथे खूप स्वयंपाक होतो  तिथे बरे पडेल . 

विचार केला तर बरेच उपाय सापडू शकतात . 

हे production आपल्याकडे झाले तर बऱ्यापैकी स्वस्त पडेल आणि एक industry पण होईल 






फक्त अभ्यास ?:---



आमचे एक दूरचे नातेवाईक , त्यांना एकुलता एक मुलगा . तर त्याचे किती करू नि किती नको  आणि सारखा अभ्यास कर , अभ्यास कर .
कोठे जाऊ द्यायचं नाही , कोणा मित्राला घरी येऊ द्यायचं नाही , नातेवाईकांकडे जाण्याचा तर प्रश्नच नाही , कोणी नातेवाईक आले तर त्याला दार लावून खोलीत बसवायचं . बोलू द्यायचं नाही आणि मिसळू द्यायचं नाही .


जणू काही हलला तर १-२ मार्क कमी पडतील .

आणि त्याची सगळी कामं करायची
" आई माझे कपडे कुठे आहेत ?"  " हे घे "

" आई माझे जर्नल कुठे आहे " " थांब शोधून देते "

" आई मला कॉफी करून दे ना "  " करते हं  बाळा "


त्याला कुठलं हि काम करू द्यायचं नाही .

घरात काही ठरवायचं असेल तर भाग घेऊ द्यायचा नाही , म्हणजे रंग द्यायचा , बिलं भरायची , काही नवीन घ्यायचं . बँकेची कामे  नाहीच .

बघता बघता वर्ष जातात , आईवडील थकतात , ह्याने थोडं तरी करावं म्हणून अपेक्षा करतात , पण आत्तापर्यंत काही केलंच नाही तर आपणहून पुढे होऊन जबाबदारी कशाला घेईल ?

बऱ्याच मुलांना तर बोलता पण येत नाही , काही वेगळा प्रसंग आला तर निभावून नेता येत नाही .

अजून एक पहिले आहे .

तो फार आईवर अवलंबून असतो , दुसऱ्या मुलीशी त्याला relationship करता येत नाही , आई पण हक्क सोडत नाही . बऱ्याच ठिकाणी हेच कारण असतं लग्न मोडायचं .

समजा आईचं आणि बायकोचं नाही पटलं तर हिम्मत करून वेगळा राहण्याची धमकच  नसते कारण त्याच्या पंखात बळ येऊच दिलेलं नसतं .

*****************************************************************************

हेच मुलींबरोबर घडत आहे . एकुलतं एक अपत्य असलं कि 'let go ' होताच नाही . आपल्यापासून दूर जाऊच देत नाहीत . मग काय येतात परत

माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते , तिची पस्तिशी उलटलेली मुलगी संसार मोडून परत आली होती .
ती मुलगी आपल्या खोलीत बसून असायची , घरात कशात भाग घ्यायची नाही . खोली पण सुनीसुनी .

कारण ते घर तिचं नव्हतं . काय जेवायला करायचंय , काय संपलंय काय आणायचं  तिची आईच ठरवत होती .

ती पण हक्क सोडत नसेल .

काहीतरीच वाटलं ते बघून .


पस्तिशीच्या बायका म्हणजे काय खमक्या असतात , जाम ताकत असते , सगळीकडे चौफेर नजर असते , संसाराची सूत्रे हळूहळू हातात आलेली असतात .

They are in the prime of their life .

Life has to be enjoyed by participating not by staying away .


































29-3-17


रोज मरे त्याला कोण रडे ?

डॉक्टरांवरचे हल्ले चालूच आहेत .

पुण्याच्या रुबी हॉस्पिटल मध्ये झाले ,

ठाणे सिविल मध्ये झाले . ठाणे सिव्हिलचे पोलीस मारामारी झाली तेंव्हा जागेवर नव्हते . मारामारी करणारे दारू पिऊन आले होते

आता तर Lady  doctors  वर पण हल्ले होत आहेत.

सरकार आमच्या बाजूने नाही , कोर्टाने तर दमच दिला आहे कि लोक तुम्हाला   मरणारच , म्हणजे डॉक्टरांवर हल्ले करणार्यांना पाठीशी घातले आहे .

ठीक आहे . आता आपला नंबर कधी येतो याची वाट पाहायची . बचेंगे तो और लढेंगे .

पण डिलिव्हरी रूम मध्ये घुसून मारामारी हे अतीच झाले !!

अजून काय काय होऊ शकेल ?

BTW , डॉक्टरांवर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तोंडसुख घेणाऱ्या निरगुडकरांचे सासरे एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत , त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत आहे.

त्यांना एवढंच सांगायचंय कि तुम्ही कसेही वागलात तरी आम्ही आमचे  कर्तव्य पाळतो !!









मैं रोज सुबह जल्दी उठनेकी  कोशिश करता हूं , लेकिन dawn  को पकडना मुश्किल हि नही नामूमकिन है!!

30-3-17

Analysing the heat in Gujrati :--


गर्मी बहुत होवे छे ..

Temperature  बढे छे तो गर्मी  होवे छे

Temperature पण बढयु  ने सेन्सेक्स पण बढयु , एटला माटे गर्मी होवेछे ...

काय पण वात करे छे , पागल ( There is a more precise word in Gujrati but it may be unparliamentarily in other languages )


मने तो लागे फेसबुक मा बहू झगडI होवे छे एटलामाटे  गर्मी होवे छे ...

तIरI आ बात माने चोक्कस लागे छे ...

तो फेसबुक बंद करवIनु   ?

ना ना फेसबुक बंद करयु तो पछी सूं  करयु  ??



31-3-17

वेगळी वाट :---


आता आमच्या ओळखीचे बिल्डर खूपच आहेत .

बहुतेक जण बिल्डिंग बांधतात , वेगवेगळ्या आकाराचे फ्लॅट्स काढतात , खाली दुकानांना गाळे किंवा पार्किंगला जागा असं करतात . सगळं विकलं जाईपर्यंत टेन्शन मध्ये असतात

सगळं एकदा विकलं गेलं कि नवीन जागेत पैसे गुंतवतात आणि परत हेच करतात .

कल्याणला एक बिल्डर होते , ते फारच छान quality चे  बांधकाम करायचे , पण दिवसेंदिवस  वाढत चाललेले 'व्याप ' बघून ह्या धंद्यातून बाहेर पडले

त्यांनी एक चांगला लग्नाचा हॉल बांधला आणि तिथेच असतात आणि management करतात . स्वतः बारीक लक्ष देत असल्याकारणाने service एकदम firstclass असते..

He created a recurring source of income .

स्वतः management केली तर खूपच उत्पन्न होऊ शकते . माणसं सांभाळायची , त्यांना समजून घ्यायचं हे मात्र करावे लागते .

छोटे छोटे कार्यक्रम पण बरेच असतात , छान चालतं .


एखादा व्यवसाय चांगला चालू लागला कि त्यामुळे अजून बऱ्याच छोट्या मोठ्या व्यवसायांना संधी मिळते .


असंच जरा वेगळा विचार केला तर छोटे नाट्यगृह , सिनेमा थेटर , club house , आर्ट गॅलरी , असं आणि अजून बराच काही करता येऊ शकतं .

लोकांना एकत्र यायला ठिकाणं मिळू शकतात .

Low maintainance  cost  असं करायचं . आजच्या तरुणाईला खूप करायचं आहे पण outlet नाही . त्यांचा विचार केलाच पाहिजे .

Human interaction , activity , discussing new ideas and thoughts is a must.
















31-3-17

काही माणसे प्रत्यक्षात खूप छान दिसतात पण त्यांचे फोटो एवढे छान येत नाहीत , काही दिसतात साधारण पण फोटो फार छान येतात .

Photogenic चेहरा म्हणजे काहीतरी वेगळंच .असतं ..

तसाच screen presence , काही जण असतात दिसायला साधेच पण स्क्रीन वर फार उठून येतात.

आणि stage presence , जे लोक screen वर चांगले दिसतात ते स्टेज वर चांगले दिसतील असं नाही , ते पण वेगळंच आहे .
श्रीकांत मागे बऱ्याच नाटकातून कामे करायचा , बऱ्याच कॉम्पेटिशन मध्ये बक्षिसं पण मिळवले आहेत  .

कल्याणला तो नाटक लिहायचा  बसवायचा आणि काम पण करायचा .

त्या रिहर्सल आमच्या घरीच चालायच्या , त्या बघून बघून मला बराच कळू लागलं . असं का असं का नाही , मग असं केलं  तर अजून चांगलं होईल का ? असं विचारमंथन आणि प्रयोग चालतात .

ते नाटकवाल्यांचा वेगळंच जग असतं .

Projection of personality , voice training  अजून बरंच असतं . ह्याचे workshops बरच जण घेतात .

Personality development मध्ये खप उपयोग होतो .

बोलायचं कसं , वागायचं कसं , आपली छाप कशी पाडायची , हळूहळू उमजत जातं . भाषा , उच्चार , शब्दांची फेक असं  सगळं करून घेतात .


आपण स्वतः काही केलं कि जाम मजा येते , एकतर विचारांना चालना मिळते , काही दिशा मिळते. आणि त्या दृष्टीने आपण दुसर्यांना observe करू लागतो .


हल्ली सारखे स्टेज उभारून कार्यक्रम होत असतात , त्यात बोलावं लागतं . काही जण छान बोलतात , काहींना जमतच नाही , पण ही पण एक कला आहे ,





Tuesday, May 23, 2017

आमच्या  surgery conferences मध्ये live demos असतात , टॉप सर्जन ऑपेरेशन करतात आणि कॅमेराने ते एका कॉन्फरेन्स हॉल मध्ये पडदयावर दाखवतात . बराच ऑडियन्स असतो . त्यात एका वेळेला खूप जणांना ऑपरेशन्स बघायला मिळतात . आणि magnified असल्यामुळे छान दिसतं आणि बारकावे शिकायला मिळतात .

तर अशाच एका कॉन्फरेन्सला Dr. Tehemton Udwadia हे gall bladder laproscopic surgery दाखवणार होते . हे २५ वर्षापूर्वीचे आहे . त्यांनी surgery सुरु केली आणि इकडे स्क्रीनवर दिसू लागले . Laproscopic म्हण...जे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया . त्यांनी दुर्बीण आत घातली आणि सगळं ऑडियन्स घाबरला . सगळं चिकटलेलं होता , काहीच दिसत नव्हतं , नुसतं पांढरं पांढरं , एकही पोटातला अवयव दिसत नव्हता . आता कसं होणार ?

तर त्यांनी , न घाबरता सुरु केले , अलगद अलगद , एकेक पापुद्रा काढल्या सारखा करत पुढे पुढे सरकत गेले . सावकाश , काही घाई नाही , कुठे ब्लीडिंग नाही , स्वच्छ . ऑपेरेशनची delicacy म्हणतात ते बघायला मिळालं . ते पट्टीचे गायक कसे ख्याल म्हणताना एकेक सूर उलगडून दाखवतात तसं .

मग ते gallbladder दिसू लागलं आणि त्यांनी ते इतकं अलगद , मायेने काढलं . बहोत नजाकत ठी उनकी कारिगरी में . अबतक याद है.

तेंव्हाच ते ५०+ होते . Laproscopic surgery भारतात आणण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले . आताचे डॉक्टर तर खूपच पराक्रम करत आहेत

आता ते ८०+ असतील , अजूनही काम करतात . आतI burnout होणाऱ्या जुनिअर लोकांसाठी ते आदर्श आहेत .

त्यांना या वर्षी पद्मभूषण देऊन सन्मानित केलं गेलं .

***********************************************************************

आपल्यापेक्षा वयाने , अनुभवाने , ज्ञानाने खूप पुढे असलेल्या लोकांना काम करताना बघावे , म्हणजे अजून किती पुढे जायचे आहे हे कळते , हुरूप येतो . आपली पण प्रगती होते .





http://www.indiamedicaltimes.com/2017/03/31/dr-tehemton-udwadia-honoured-with-padma-bhushan-for-his-contributions-to-indian-medicine/
आमच्या कल्याण मध्ये बऱ्याच सुधारणा होत आहेत . एकतर कल्याण डोंबिविली हा नवी रस्ता झाला आहे , खूपंच छान आहे .. दुसरा पत्रीपूल ते दुर्गाडी पूल रास्ता मोकळा झालाय , गावातलं ट्रॅफिक एकदम कमी झालंय .
आता कल्याण पूर्व , डोंबिविली च्या लोकांना ठाण्याला जायचं असेल तर परस्पर जातI येईल , कल्याण शहरातून जायला नको .

आत करतच आहेत तर एक कोन bypass ब्रिज करा . कल्याणातून बाहेर पडताना , त्या कोन मधून जावं लागतं , तो रस्ता आहे तो त्यांचा बाजाराचा रस्ता आहे , फार ट्रॅफिक जॅम होतो , त्यांन...ा पण त्रास होतो .
कल्याणची अजून एक शान म्हणजे दूधनाक्याचे दूध . फारच छान असते . आज एक तिथे राहणारI यंग मॅन भेटला होता , म्हणाला ते ६००-७०० वर्षांपासून ते चालू आहे . हजारोंच्या संख्येने गाईम्हशीं आहेत , त्यांची बडदास्त फार छान ठेवली जाते. स्वच्छता खूपच पाळली जाते . तिथलं दूध अफलातून आहे . सक्काळी लोक मलईपाव खायला जातात ( मी पण गेले होते ) भाकरी सारखी साय निघते .
मी त्या यंग मॅन ला म्हटलं या दूधनाक्याच्या बिझनेसवर एक फिल्म , documentary बनवा . येऊ देत लोकांपुढे , कशी कामं चालतात ते .
आपलं शहर आहे पिटकं पण तश्या मजा मजा पण खूप आहेत .

एक जुनी ओळखीची बाई भेटली होती , तिचं छोटं दुकान आहे , काय काय वेगवेगळं ठेवून विकत असते . आज म्हणाली जास्त फायदा होत नाही .

मी तिला म्हटलं जे लोकांना लागतं ते विकावं , आणि दुसरीकडून माल आणून विकला तर तुला फक्त commission च मिळेल , स्वतःचे प्रॉडक्ट्स विकले तर फायदा आहे .
आता उन्हाळा आहे , तर छोटा फ्रीज घे , लिंबू सरबत , पन्ह , थंड पाणी ठेव , लोक येतीलच घ्यायला आणि चव चांगली असेल तर गिर्हाईक वाढत जाईल .

...

आता काही दिवसांनी पावसाळा सुरु होईल , तेंव्हा चहा ठेवायचा . आता घेतलेला फ्रीज तेंव्हा दूध ठेवायला कIमIला येईल .
आणि हल्ली ती induction शेगडी येते , गॅस किंवा स्टोव्ह नको , पेटाबिटायची भीती नाही .

कर आणि कमव .

इकडे काही काही लोक पक्के शहाणे आहेत , season प्रमाणे बिझनेस करतात .

आता उन्हाळ्यात आंब्याचा ,पावसाळा आला कि छत्र्या , शाळा सुरु होतील तशा वह्या व शाळेचे सामान , आपल्या जशा गरजI बदलतात तसे हे धंदा बदलतात .

नोकरी नाही नोकरी नाही म्हणून हातपाय गIळायचे नाहीत , विचार केला , डोकं चालवलं कि बरोबर काहीतरी सुचतं .

Monday, May 22, 2017

19-5-16

जरा आता 50+ लोकांवर पण picture काढा कि !!

40+चे नवरा बायको बेस्ट friends cum enemies असतात. बायकोला तर सतत नवऱ्याचा राग येत असतो आणि नवऱ्याला पण आपल्या सगळ्या लबाड्या बायकोला कळल्या म्हणून बायकोचा राग येत असतो . खटIखट भांडत असतात . पण आता higher orbit मध्ये असतात , कारण भांडण तर करायचं असतं पण कामं पण खूप असतात . तर हातातल्या कामात खंड न पडू देता भांडण करतात . उदाः -समजा बायको पोळ्या करत असेल तर पोळ्या बरोब्बर बनत रहातात पण तोंडाचा पट्टा चालू असतो . नवरा पण office ची तयारी करताना हल्ले परतवत असतो .

ही भांडणं विशी - तिशीतल्या भांडणासारखी नसतात , दिवसभर भांडण , मग खूप दिवस अबोलI , मग माहेरी पळून जाणे वगैरे .

पन्नाशीत तर नवराबायको चिकटलेल्या जुळ्यांसारखेच असतात --' तुझ्याशी जमना आणि तुझ्या बिगर होईना '

तर पन्नाशीत भांडणाची level अजून वर गेलेली असते , म्हणजे चांगले शालजोडीतले हाणत असतात . टोमणे मारत असतात

मागे दया डोंगरे , अरुण जोगळेकर , सई परांजपे मंडळी 'गजरा' नावाचा कार्यक्रम करायची . मस्त असायचा . Dialogue खुसखुशीत असायचे .

आपल्या मराठी भाषेची गंमत आहे ती येऊ द्या कि लोकांपुढे .

मी मध्ये एक serial बघत होते , काय बकवास dialogue होते . Intellectual deficiency वाटली .

म्हणजे असं करायचं ५-६ जोडपी घ्यायची , सगळ्यांची मुले अमेरिकेला गेली आहेत . सगळे जाऊन एकदा बाळंतपण वगैरे करून आलेत , म्हणजे आता कुठे जायचं नाही . आता काढा picture किंवा serial . म्हणजे " अहो माझी बामची बाटली कुठाय ? किंवा " जरI पाय दाबून देतेस का ?" असे नको .

तसे हल्लीचे ५०+ लोक फिट आहेत , थोड्या १-२ व्याधी बाळगून आहेत पण चालायचंच . पण ते सगळे आपल्या कंट्री मध्ये राहून , adverse condition मध्ये कामं करून , पक्के तावून सुलाखून निघालेले आहेत आणि आता एक पिकलेपण आणि गोडवा आलाय हापूस आंब्या सारखा , तो capture करता यायला हवा .


Sunday, May 21, 2017

3-5-17


तो Ventilator  सिनेमा पहिला . त्यात तो हिरो आपल्या वडिलांना खूप मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतो . ते सिरीयस असतात .त्याला कोणी तरी विचारतं " कशाच्या जोरावर तू ऍडमिट केलंस ? बिल कोण भरणार ? 

त्यावर उत्तर असतं " त्यांनी एवढं केलं , आता त्यांच्या साठी नको का करायला ?

त्याचे श्रीमंत नातेवाईक येऊन बिल भरतात आणि पेशंट पण बरा होतो . 


पण दर वेळेला असं होत नाही , पेशंट कधी कधी रिस्पॉन्स  देत नाही आणि मृत्यू  होतो पण एवढे दिवस ICU मध्ये ऍडमिट असतो त्याचं बिल अफाट होतं . म्हणजे खर्च खूप आणि हातात डेड बॉडी .  लोकांची चिडचिड , संताप होणं स्वाभाविक आहे . मग ह्याला उपाय काय आहे ?

आता ती ५०० किलो वजनाची पेशंट त्या डॉक्टर लोकांनी घेतली  , ३०० किलो वजन कमी पण झाले पण जायच्या वेळेला तिच्या बहिणीने  भांडण काढलं . हे नेहेमीच घडतं . 

मेडिकल जगात खूपच प्रगती झाली आहे , कुठले कुठले पेशंट बरे होऊन घरी जातात , म्हातारी माणसे ८०+, ९०+ पण घरी जातात , ऑपरेशन्स तर अफाटच होत असतात , हल्ली accident चे पेशंट खूप असतात , मIर पण जबरी लागलेला असतो . ह्या लोकांना बरं करायचं म्हणजे खूप दिवस लागतात , खूप शक्ती , ज्ञान लागतं , वेगवेगळे specialist लागतात . खर्च अफाट होतो. 

बरेच पेशंट घरी खूप दिवस आजारी , बेड वर पडून असतात , त्यांची शेवटची घरघर सुरु झाली कि नातेवाईक त्यांना हॉस्पिटल मध्ये हलवतात  आणि पेशंट काही तासातच जातो . मग बिल करू नये अशी अपेक्षा असते , केलं  कि भांडण . 

आजकाल किडनी खराब असलेले लोक खूपच आहेत , त्यांना डायलिसिस लागतं , तो वारंवार खर्च होतो , काही लहान मुलांना वारंवार रक्त द्यावं लागतं . 

कॅन्सरचे प्रमाण खूपच वाढले आहे , ट्रीटमेंट पण आहे पण पैसा  खूप लागतो .. 

नातेवाईक रडकुंडीला येतात . 

काय करावे ?

Insurance हा उपाय आहे का ? म्हातारी माणसे जास्त आजारी पडतात , त्यांचा इन्शुरन्स असतो का ?

Insurance claim पास करायच्या आधी  ते एजन्ट आणि ते लोक खूप queries काढतात , त्यांना नुकसानच आहे क्लेम पास झाला तर , ते त्यांच्यापरीने क्लेम कसा पास होणार नाही हे पाहतात . 

काय उपाय आहे ह्या सगळ्याला ?

आजकाल एक गंमत होते आहे , ज्या मुलींना माहेरच्या गरीब म्हणून किंवा तिचे उत्पन्न काही नाही म्हणून घरात थोडं हिडीसफिडीस केलं जातं , त्यांना काही वर्षांनी माहेरची एखादी प्रॉपर्टी विकली गेली किंवा शेतजमीन विकली गेली कि एकदम खूप पैसे मिळतात . 

मग तिच्याशी कसं वागावं ते कळत नाही . एकदम स्टेटस बदलतं . 

माझी एक मैत्रीण आहे , फIर सोसलं तिने , तिला बरेच कायकाय मिळालं , आता ती इतकी भाव खाते , मागे बिचारीची खाली मIन असायची आता ती वरच बघत असते . नवरा परेशान  आहे , 

22-5-16

रंग बदलणारा सरडा .
रंग बदलायची मक्तेदारी फक्त सरड्याचीच असते असे नाही .


22-5-16

आपण कुठे लग्नाला किंवा अजून कुठे जेवायला गेलो आणि जेवण खूप आवडलं तर खूप कौतुक करतो आणि मग जाम जेवतो . पण तो स्वयंपाक चांगला का झाला याचा विचार नाही करत .
तसं त्या सैराट सिनेमाचे झाले आहे , सिनेमा पाहून खूप आवडतो म्हणून कौतुक करत आहेत आणि खूप वेळा जाऊन बघत आहेत .

...
एकदा मला कढीच आवडली , मस्तच होती , मग त्या contracter ला विचारलं " म्हणजे सगळा स्वयपाक छान आहे पण कढी फारच छान आहे , काय केलंत ? ते म्हणाले " दुधनाक्यावरचे ताजे दुध आणले , तापवून साय न काढता दही लावले आणि त्या दह्याची कढी केली " (दुध नाक्याचे दुध म्हणजे आमचे कल्याण स्पेशल ) एकदा उसळ छIन होती , मग सांगितलं कि जाड बुडाच्या कढाईत ,मंद आचेवर शिजवलं कि उसळ चांगली होते , अर्थात तिखटमीठ बरोब्बर हवंच .
म्हणजे raw material आणि technique चांगलं हवं . हे तर फक्त २ points झाले .
सैराटचे खूप कौतुक झाले , lead pair , music , director , पण पडद्या मागचे कलाकार पण खूप असतात . Dialogues , sound , background score , cinematography , editing सर्वच technical बाबी supreme आहेत .
गावाकडचा सिनेमा म्हटलं कि धुसर दिसेल असं वाटतं , पण डोळ्याला फार छान दिसतं . Locations सुरेख आहेत , cinematography उत्कृष्ट आहे . कुठलाही प्रसंग असा एकाच angle मधून लांबलचक shot नाही , छोटे छोटे वेगवेगळ्या angle मधून scene आहेत,त्याला shot division म्हणतात , त्यामुळे ३- Dimensional effect येतो. प्रसंग खुलतो .
Editing खूप मेहनत घेऊन केले आहे . कधी कधी cameramanनी अफलातून shot घेऊन दाखवून आपली कला दाखवली आहे .
ह्या गोष्टींवर पण खूप पैसा घातला आहे , पण तो सत्कारणी लागला आहे .
ह्या पडद्या मागच्या कलाकारांचे कौतुक व्हावे हीच इच्छा .
ते नागनाथ मंजुळे विचार करणारे डिरेक्टर आहेत , प्रत्येक गोष्ट अशी का ? ह्याचे उत्तर आहे . Evolve आणि upgrade होणारे आहेत . जब्बार पटेल , विजय आनंद , राम गोपाल वर्मा ( त्यांचे सत्या आणि अब तक छपन्न एकदम क्लास --मग काहीतरी गडबड झाली ) अनुराग कश्यप . वेगळी वाट निवडून दाखवणारे लोक आहेत .
Best wishes to all the team members and do well in the future . We are looking forward to your next venture.
दुपारी जेवणं होतात , संद्याकाळी चहा होतो पण रात्रीच्या जेवणाला वेळ असतो . संध्याकाळी भूक लागते . 

काहीतरी तळकट खाल्लं कि ऍसिडिटी होते , नाही खाल्लं तर चिडचिड होते . 


तर बेस्ट म्हणजे भेळ , भेळवाल्याला शोधंत  कुठं हिंडायचं तर घरीच करायची . 

कुरमुरे , फरसाण किंवा भेळेचा चिवडा किंवा तत्सम , कांदा , मिरची कोथिंबीर बारीक  चिरून , कैरी असेल तर मजा येते , बारीक चिरून , तसेच टोमॅटो हवे असतील तर . 

ती चिंचगूळाची चटणी , पुदिन्याची चटणी पण करून ठेवता येते , टिकते फिजमध्ये . 


करायची भेळ आणि खायची , मस्त वाटतं . 

मुलांना पण कुरमुरे , बारीक शेव , थोडे चणे दाणे मिक्स करून ६ वाजता वगैरे दिले कि ते आठ सIडेआठ पर्यंत बरे राहतात . 

आपल्याकडे कुठलाही पदार्थ करायचा असेल तर खूपच आयटम लागतात , पण भेळेला थोडं आगे पीछे चालतं . 

हा आयटम पुरुष वर्ग पण सहज करू शकतो , त्यांना पण म्हणता येतं हे मी केलंय बरंका !!
19-7-14

छोटी चूक बघता बघता खूप महागात पडू शकते . Fire dept नी बिल्डिंगच्या safety साठी काय काय पाहिजे ह्याचे पत्रक काढावे व सगळ्या बिल्डींगच्या membersनी आपली आपली बिल्डिंग तपासून घ्यावी . हे दुसर्यांसाठी नसून स्वतःसाठी आहे . 
बहुतेक गोष्टी commomsense च्या आहेत . जिन्यात पसारा नको . Wiring नीट पाहिजे . अजून बरच काही . 

Prevention is better than cure . 

Maintainance  वर लोकांना खर्च करायला नको वाटतं पण आता सगळ्या जागा एवढ्या गच्च आणि complicated झाल्या आहेत कि कुठेही काहीही होऊ शकतं . Better safe than sorry .

16-7-14

माझ्याकडे २ मुली नोकरी मागायला आल्या होत्या, साधारण २० वर्षाच्या  . १०वि पास ? दिसायला स्मार्ट होत्या , आम्हालाही गरज होती म्हणून ठेवल्या . कुणी आलं तर या बसा करतील ,नाव लिहून घेतील ,थोडा हिशोब लिहितील आणि Xerox काढून आणतील एवढी माफक अपेक्षा होती . 
मग कळलं मराठी येत नाही ,English च तर नावच नको , आकडे लिहिता येत नाहीत , ३२५ --३००२५ असा लिहिलं कागद punch करायला सांगितले तर एकेका कागदावर खूपच भोकं पाडून ठेवली . काही बोललं तर राग पटकन येणार , आपल्याला येत नाही तर शिकून घ्यावं हे तर आजिबातच नाही . 
नखरे , mobile, boyfriend ला phone हे  व्यवस्थित . 

एवढे advanced dumbo पहिल्यांदाच पहिले .  मलाच २ सापडल्या तर अजून किती असतील ?

ह्या मुलींना कोणी काहीच शिकवलं नाही , शाळेत नाही आणि घरी पण नाही . 

मी दम भरला तर माझ्याशीच खूप भांडल्या . 
मी काय फार तर कामावर ठेवणार नाही , पण त्यांच्या फायद्या साठी तरी त्यांना आलं पाहिजे . 

मला वाटतं असे कमी IQ चे असतील , त्यांना लिहिणे वाचणे  आणि बेरीज वजाबाकी येव्हाड्यचीच शाळा असावी , बाकी जशी प्रगती दाखवतील तसं शिकवावं . 
त्या कदाचित स्वयपांक चांगला करतील , मुलं चांगली सांभाळतील  किंवा कलाकुसरीची कामं चांगलं करतील किंवा अजून काही ,पण ते त्यांचं त्यांनाच किंवा त्यांच्या आईवडिलांना शोधावं लागेल . 
किंवा ultimate लग्न करून टाकतील . 
14-7-17

कल्याणच्या जवळ नेतिवली जवळ एक airstrip आहे . British लोकांनी बांधलेला आहे 


Navi Mumbai मध्ये नवीन airport बांधायचे बऱ्याच दिवसांपासून घाटत आहे पण प्रगती काही नाही कारण जागाच चुकीची आहे . त्या जागेतून २ नद्या जातात . त्यांचा प्रवाह बदलावा लागेल . 


त्या नद्यांचं काही सांगता येत नाही . त्या मनाला येईल तसं वागतात . एखाद्या दिवशी plane मधून उतरायचो आणि नेमकं नद्यांना पूर येऊन वाहून जायचो . 

तर कल्याण जवळच्या airstrip चा विचार व्हावा.  British  लोकांचं एक आहे . त्यांचा जागेचा choice अफलातून आहे . काय एक एक जागा निर्माण केल्या आहेत . ह्या airstrip कडे कल्याण मधून यावे लागणार नाही . पनवेलहून शिळ फाट्याहून येता येईल . 
मनात आणलं तर होऊ शकेल . कल्याणच्या लोकांना job opportunities खूप होतील ,development पण होईल . मुंबईच्या airport वरचं load पण कमी होईल .