Sunday, August 6, 2017

हा फोर्टचा फोटो वाटतोय ना ?
This is Edinburgh !!
आमचा तिथला guide एक खडूस इंग्लिश म्हातारा होता , अगदी इरसाल . भारतात राहिलेला होता
...
म्हणाला " तुमच्या भारतीय पुरुषांचे बरे असते , तुमच्या बायका त्याच त्याच साड्या , अगदी लग्नातल्या पण नेसतात , आमच्या बायकांना सारखे नवीन कपडे लागतात " " Very expensive to have a wife"
म्हणावं वाटलं --हल्ली आमच्या बायकांना पण सारखे नवीन कपडे लागतात .
तिथल्या स्टेशन जवळ एक मोठा घड्याळ असलेला tower आहे . त्याने सांगितले कि ते घड्याळ १०
मिनिटे पुढे असते , लोकांची ट्रेन चुकू नये म्हणून .
आपल्याकडे पण बऱ्याच घरात असेच ५-१० मिनिटे पुढे असलेले घड्याळ असते .
हे पण British संस्कार ?

हवेत जाम गारठा आहे . हल्ली बऱ्याच घरात marble किंवा marbonite ची फरशी असते , ती गारगार पडते . मग त्यावर चालून चालून पाय दुखतात ,especially बायकांचे .

तर बऱ्याच जणी चप्पल घालतात पण पायमोजे घातले तर अजून बरे वाटते . हल्ली बायकांसाठी खास पायमोजे आले आहे , ते बरे पडतात .

बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही अलिबागच्या जवळ नागावला 'शिंत्रेवाडीत' गेलो होतो . त्यांचं एक जुनं घर म्हणजे वाडी आहे आणि एक नवीन पिकनिकला येणाऱ्यांसाठी आहे . तर नवीन तयार नव्हतं म्हणून आम्हाला जुन्या घरी थोडा वेळ उतर...वलं होतं .

अनपेक्षित धनलाभ या कॅटेगरी खाली तो अनुभव होता . इतकी सुंदर सुबक वाडी , well maintained . खूपच फळझाडे , फुलझाडे , झाडावर फणस , विहीर , छोटे हौद , पIट काढलेले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिथे एक आजी होत्या , सगळीकडे बारीक लक्ष ( माझ्या दृष्टीने अशी माणसे एक नंबर ). त्या इतक्या छान वागल्या आमच्याशी . खूप वेळा असं होतं कि आपल्याला एखादे ठिकाण तिथे अनुभव कसा येतो किंवा माणसं कशी वागली होती यावरूनच आवडतात .

तर त्यांनी आपलं घर दाखवलं . मोठं होतं ८-१० खोल्या असतील . चारी बाजूनी व्हरांडा , आणि शहाबादी फरशी . स्वयंपाक घरात घेऊन गेल्या . पण तिथे शेणाने सारवलेले होते . तर त्या म्हणाल्या शेणाने सारवलेले उबदार राहते . बायकांचा बराच वेळ स्वयंपाकघरात जातो , फरशी लावली तर जमीन गार पडते आणि मग पाय दुखतात . हा जुन्या लोकांचI उपाय .

आता ती शहाबादी फरशी गेली आणि ते शेणाने सरावलेले घर तर कधीच गेले पण बायकांचे पाय दुखणे मात्र चालू आहे . त्यांनी आपापली तब्येत जपावी .

Monday, July 31, 2017

Lipstick under my burkha :--
हा सिनेमा मी पहिला नाही पण माझी एक मैत्रीण बघून आली आणि तावातावाने म्हणत होती कि स्त्रियांना पण extra marital affairs करायचा अधिकार असला पाहिजे , पुरुष करतात तर आम्ही का नाही ?
ह्यावर बराच उहापोह झाला .....
म्हटलं करायचं असेल तर करा पण त्यासाठी हौस पाहिजे , ताकत हवी , efficiency आणि memory चांगली पाहिजे . येरागबाळ्याचे काम नाही .
आम्ही एक हा extramarital प्रकार जवळून पहिला होता , त्या हौशी सद्गृहस्थाची जाम पळापळ व्हायची , त्यात तो धांदरट आणि विसरभोळा . चुकीच्या ठिकाणी चुकीचे बोलायचा , कुणाला काय सांगितले आहे ते लक्षात राहायचे नाही , मग बायको पकडायची आणि मग आकांडतांडव .
म्हणजे असे आपल्या चहा पिणाऱ्या बायकोला परवा तू कॉफी छान केली होतीस असे म्हणायचे नाही . वगैरे वगैरे . पुन्हा लक्षात ठेवायचे हिला आज ४ वाजता भेटायचे आहे , तिला उद्या फिरायला न्यायचे आहे वगैरे वगैरे .
पुन्हा दोन घरोबे केल्याने खर्च वाढतात त्यामुळे उत्पन्न वाढवावे लागते , तो वाढीव खर्च tax deductible नाही . ट्रॅफिक पण खूप वाढले आहे , कुणाला ४ वाजता येतो म्हटले तर पोचायलाच ७ वाजायचे , तोपर्यंत परत यायची वेळ व्हायची
असो !!

आता बायकांचे , पुरुष करतात म्हणून आम्हाला पण extramarital करायचे आहे म्हणजे हे कायदेशीर करायचे का ?
एकनिष्ठता हा एक लग्नसंस्थेचा पॉईंट आहे हे खूप जण विसरलेले दिसतात .
बायकांना लाख हौस असेल affair करायची पण सगळे पुरुष हल्ली भयंकर busy असतात . सक्काळी जातात ते रात्री येतात आणि टूरला म्हणून जातात ते बरेच दिवस येतंच नाहीत . पुन्हा ते सतत परेशान असतात . चेहऱ्यावर सतत कुठलं तर बिल भरायचे आहे , टॅक्स भरायचा आहे , शेर मार्केट पडलंय , काहीतरी सापडत नाहीये . मला कुठलं तरी काम करायचे आहे पण कुठलं ते आठवत नाही असेच चेहरे असतात .
Extramarital करायचं म्हणजे थोडा तरी निवांतपणा हवा कि नको ?
परत त्यांना सारखं कुठंतरी जायचं असतं आणि काही नाही तर ते आधार कार्ड लिंक चालू झालं आहे .
मला वाटतं ही सरकारची आयडिया असेल . लोकांना हा फॉर्म भर , तो फॉर्म भर ह्यातच अडकवून ठेवायचं कि नाही नाही ते सुचायला वेळच मिळतI कामI नये .
नाही म्हणजे कधी कधी कोणाला पाहून दिल धडकतो किंवा आठवण आली कि अंदाज शायराना होतो पण पुढे काय ?
माझ्या एका मैत्रिणीने पण हे केलेच , पण पंचाईत अशी झाली कि तिचा नवरा आणि बॉयफ्रेंड मित्र झालेत . आता ती वैतागली आहे .
म्हणजे असे unforeseen complications होऊ शकतात .

त्यातून ज्यांना हौस असेल आणि झेपणार असेल they can go ahead !!
आपल्या कंट्री मध्ये आधीच एवढा गोंधळ आहे , बायका पक्क्या खुंटी सारख्या संसार पकडून आहेत . त्यांनी पण हे उद्योग सुरु केले तर कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहणार नाही .
************************************************************************************
नवरा म्हणतो " तू सगळ्या गोष्टी अश्या analytical नजरेने नको बघू , काही काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात !!

Monday, July 24, 2017

जे तिरुपतीला जातात ते येताना कोल्हापूरला महालक्ष्मी चे दर्शन घेतात , असा रिवाज आहे हे आजच कळले . ह्या मागे काही कथा आहे का ?
From the wall of Vaibhav Narayana Joshi:--
श्री तिरुपती बालाजी दक्षिणेच एक मोठ देवस्थान .
हे बालाजी अर्थात विष्णू . हे या पर्वतावर प्रकट झाले . त्यांना श्री पद्मावती आवडल्या आणी त्यांच्याशी विवाह करणे ठरले . पण श्री विष्णूंची पहिली पत्नी श्री लक्ष्मी मातेची परवानगी आवश्यक होती . ती प्रथमतः मिळाली नाही व देवी रुसून कोल्हापूर येथे येऊन राहिल्या . देवाने त...्यांना शोधले तर त्या घोडीच्या रुपात होत्या . मग देवानेही घोड्याचे रुप घेतले व त्यांचा रुसवा काढला आणि तुझा मान कायम राहिल सांगितले . तसेच विवाहा साठी कर्ज मागितले . देवीने कुबेरा आपल्या पुत्राला आज्ञा केली व हा विवाह पार पडला . म्हणून आजही बालाजीहून कोल्हापूर येथे दरवर्षी साडीचोळी व सौभाग्य साज पाठवतात यावेळी किरणोत्सवही असतो . नारायण लक्ष्मींना या दिवशी भेटतात . आणि देवांनी दिलेल्या आशीर्वादाने बालाजी यात्रा कोल्हापूर चे दर्शन घेतल्या शिवाय पूर्ण होत नाही !
*
*
बालाजी ने महालक्ष्मी शी अतिशय थाटामाटात लग्न केले, लग्नाच्या वेळी त्याने अफाट खर्च करण्यासाठी कुबेराकडुन कर्ज घेतले. व्यंकटेशाच्या कोणत्याही मंदिरात हुंडी असते, भाविक त्या हुंडी मध्ये दान टाकतात ते कुबेराचे कर्ज फेडण्यासाठी असते अशी अख्यायिका आहे.
*
*
नवरात्रीत तिरुपतीचा बालाजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साडी पण पाठवतो.
*
*
बालाजी च्या दोन पत्नी एक कोल्हापुर ची महालक्ष्मी आणि दुसरी पद्मावती जी की तिरुपति ला आहे. बालाजी तिरूमलाला आहे. महालक्ष्मी रूसुन कोल्हापुर येथे येवुन बसलीै. त्यामुळे तिरूमला, तिरुपति आणि कोल्हापुर अशी ती यात्रा पुर्ण होते. कोल्हापुर तिरुपति अशी एक एक्सप्रेस ट्रेन आहे तिचे नांव पण हरीप्रिया एक्सप्रेस असे आहे.
आपल्याकडे शाळेसाठी महाराष्ट्र बोर्ड , CBSC ,ICSC असे ३ options आहेत. दुसरे २ international schools आहेत . बरेच लोक हल्ली ह्या देशातून त्या देशात नोकरी बदलत ,मुलाबाळांसह हिंडत असतात . त्यांच्या मुलांसाठी ह्या International schools आहेत .
(पुढे International level चे jobs मिळवताना ह्या लोकांना preference असेल असे म्हणतात ). फी पण जबरदस्त असते . जो है ठीक है ।
पण ह्या शाळांची सुट्टी जुलै -ओगस्ट मध्ये असते . महाराष्ट्र बोर्डाची एप्रिल -मे .
...
माझी एक मैत्रीण आहे . तिचा मुलगा ,सून आणि २ नातवंड दुबईला असतात . मुलांना आता सुट्या लागल्या आहेत आणि त्याच्या कंपनीने सगळ्यांना विमानाचे तिकीट देऊन पाठवून दिले आहे .
तर हे चौघे २ महिन्यांसाठी भारतात आले आहेत .
त्या मैत्रिणीचे डोके फिरून गेले आहे , ४-४ पाहुणे (आपलाच मुलगा सून असले तरी ) ते पण पावसाळ्यात !
बाहेर पाऊस , कपडे व।ळत नाहीत ,क।मवले दांड्या मारतात. शेजाऱ्यांचा पोरांशी खेळायला जा म्हणावे तर ती मुले अभ्यासात busy .
पोरांची करमणूक नाही केली तर दिवसभर tv लावून बसतात. आणि मुलगा आणि सून प्रतिष्ठीत वागतात .जिम्मेदारी घेऊन घर चालवत नाहीत.
व्याप झालाय म्हणाली .
आधीच आपल्याकडे जात , धर्म , भाषा ,पंथ,veg-nonveg , हे असताना आता ह्या International शाळेचे आणि महाराष्ट्र बोर्डाचे अशी पण फुट पडेल .

मी '89 ला private practice सुरु केली . ४-५ महिनेच झाले होते एक पेशंट आली म्हणाली "तुमचं नाव ऐकून गोव्याहून आलोय "

म्हटलं माझं नाव एवढं गोव्या पर्यंत कधी गेलं ? practice पण तेंव्हा जेमतेमच होती .

नाही म्हटलं तरी मला मनातून खूप आनंद झाला .

...

घरी गेल्यावर नवऱ्याला सागितलं . तो म्हणाला "अगं ते GOA नाही काही , हे कल्याण जवळच एक गोवा नावाचे गाव आहे , तिथले पेशंट कल्याणलाच येतात "

ह्या फोटो मधली डावीकडची safety pin आहे ती नेहेमीची आहे पण उजवीकडची आहे ती वेगळी आहे .
एकाबाजूची तार थोडी लांब करून थोडा curve दिलेला आहे .
ह्यामुळे साडी pin -up करताना किंवा छोट्या मुलांच्या ड्रेसला रुमाल किंवा badge लावताना टोचत नाही आणि curve असल्यामुळे पटकन आणि नीट बसते .
...
ही काही फार मोठी idea नाही कि technology नाही पण मस्त आणि उपयोगी आहे .
ही पिन मला एका अमेरिका return family कडून गिफ्ट मिळाली होती , India मध्ये कुठे मिळते का माहित नाही . .

Sunday, July 23, 2017

भुतांच्या गोष्टी :--
बालपणीच्या भावविश्वात भुतांच्या गोष्टींचे मोठे अप्रूप .
सुट्टीत सगळी भावंडे आजोळी जमली कि रात्री पांघरुणात गुंडाळून घेतल्यावर कोणीतरी भुतांच्या गोष्टी सांगायला सुरुवात करायचं , ते सगळं with background music , sound effects सकट . मस्त घाबरून घ्यायचं आणि गुडूप झोपायचं .
आता भुतं असतात का नसतात ते जाऊ दे पण गोष्टींची मजा यायची .
मुलगा छोटा असताना त्याला रोज रात्री भुताची गोष्ट लागायची , ती पण designer . म्हणजे आज गोष्टीत एक वाघ , हरीण , अजगर आणि ३ भुतं पाहिजेत . मग तशी गोष्ट . दुसऱ्या दिवशी आज जिराफ , गेंडा , हत्ती आणि २ भुतं . रोज नवीन .
माझे बाबा पण रोज भाऊ छोटा होता तेंव्हा गोष्टी सांगायचे , पण तो प्रकार वेगळा होता . त्यात भीमाने कौरवांना कसे मारले . रोज तेच .
आमच्या बाबानी पैलवानकी केली होती का काय माहित नाही , पण त्यांच्या गोष्टीत " पहिला कौरव आला मग भीमाने त्याला दोन्ही हाताने गच्च धरून , हात मागे घेऊन , पायात पाय घालून पडले " असे डावपेच असायचे .
असं प्रत्येक कौरवाला वेगळं , मग रोज सात आठ कौरवच गारद व्हायचे , मग उरलेले उद्या .
मग विचारायचं " कालपर्यंत किती कौरव झाले ? २२ , मग आज पासून तेवीसावा . अशी ती गोष्ट किती दिवस चालली होती .
मोठेपणी पण भुतांच्या गोष्टींचे अप्रूप असतेच , सिनेमे पण खूप आहेत .
आज पण खूप ठिकाणी gettogethers असतील , तर गोष्टी सांगण्यासाठी ह्या काही मस्त भुतांच्या गोष्टी .
पण सांगायच्या मात्र रंगवून रंगवून बरंका !!
Shortest Horror Stories:
1. Therealhatman
I woke up to hear knocking on glass. At first, I thought it was the window until I heard it come from the mirror again.
2. Jmperson
The last thing I saw was my alarm clock flashing 12:07 before she pushed her long rotting nails through my chest, her other hand muffling my screams. I sat bolt upright, relieved it was only a dream, but as I saw my alarm clock read 12:06, I heard my closet door creak open.
3. Miami_Metro
Growing up with cats and dogs, I got used to the sounds of scratching at my door while I slept. Now that I live alone, it is much more unsettling.
4. EvilSteveDave
In all of the time that I've lived alone in this house, I swear to God I've closed more doors than I've opened.
5. Drrd777
A girl heard her mom yell her name from downstairs, so she got up and started to head down. As she got to the stairs, her mom pulled her into her room and said "I heard that, too."
6. Calamitosity
She asked why I was breathing so heavily. I wasn't.
7. The_D_String
My wife woke me up last night to tell me there was an intruder in our house. She was murdered by an intruder 2 years ago.
8. Doctordevice
I awoke to the sound of the baby monitor crackling with a voice comforting my firstborn child. As I adjusted to a new position, my arm brushed against my wife, sleeping next to me.
9. Hangukbrian
I always thought my cat had a staring problem - she always seemed fixated on my face. Until one day, when I realized that she was always looking just behind me.
10. Wartortlesthebestest
There's nothing like the laughter of a baby. Unless it's 1 a.m. and you're home alone.
11. Vigridarena
I was having a pleasant dream when what sounded like hammering woke me. After that, I could barely hear the muffled sound of dirt covering the coffin over my own screams.
12. Vaultkid321
"I can't sleep," she whispered, crawling into bed with me. I woke up cold, clutching the dress she was buried in.
13. JustAnotherMuffledVo
I begin tucking him into bed and he tells me, "Daddy, check for monsters under my bed." I look underneath for his amusement and see him, another him, under the bed, staring back at me quivering and whispering, "Daddy, there's somebody on my bed."
14. madamimadamimadam
You get home, tired after a long day's work and ready for a relaxing night alone. You reach for the light switch, but another hand is already there.
15. Graboid27
I can't move, breathe, speak or hear and it's so dark all the time. If I knew it would be this lonely, I would have been cremated instead.
16. Aerron
She went upstairs to check on her sleeping toddler. The window was open and the bed was empty.
17. Genetically_witless
I never go to sleep. But I keep waking up.
18. Skuppy
My daughter won't stop crying and screaming in the middle of the night. I visit her grave and ask her to stop, but it doesn't help.
19. Cobaltcollapse
After working a hard day, I came home to see my girlfriend cradling our child. I didn't know which was more frightening, seeing my dead girlfriend and stillborn child, or knowing that someone broke into my apartment to place them there.
20. Guztaluz
There was a picture in my phone of me sleeping. I live alone.


From Rajasthan....


रात्रभर बदबद बदबद पाऊस पडतोय .
आषाढातला हा शेवटचा पाऊस . आता श्रावण लागेल , मग " क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे " तसा पाऊस सुरु होईल .
असे मला वाटते .
...
पावसाचा जोर कमी होईल , रूप बदलेल .
आषाढातला पाऊस हा deficit compensate करणारा असतो आणि श्रावणातला maintenance चा असतो .
असे मला वाटते .
श्रावण मासी हर्ष मानसी
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
वरति बघता इंद धनुचा गोफ दुहेरि विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळिच ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पखं पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शु्द्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

अतिरेक :--

मागे झाडे एवढी लोकांनी तोडली कि मग अनेक NGO , पर्यावरणवादी पुढे येऊन झाडे तोडायचीच नाहीत असे झाले , फांदी तोडली तरी गुन्हा .
एखादे झाड वठले आहे , पडायचाच बेतात आहे तरी तोडत नाहीत .

...

रस्त्यावरच्या कुत्र्यांना मारायचे नाही , नाही म्हणजे नाही . मग ते पिसाळलेले का असेना . लोकांना चावत का असेना . मुनिसिपालिटी ने अशा भटक्या कुत्र्यांसाठी shelter करावेत , पण ते नाही . रात्री किंवा पहाटे जे लोक ये जा करतात त्यांना किती भीती वाटते हे कोण लक्षात घेणार ?

इंदिराबाई गांधीच्या लक्षात आले होते कि आपली लोकसंख्या फार झाली आहे , control करावी लागेल . तेंव्हा family प्लांनिंगचा अतिरेक झाला , सत्ता गेली , तेंव्हा पासून एकही सरकारने फॅमिली प्लांनिंगचा मुद्दा घेतला नाही .

सासवांनी सुनांना एवढे छळले , घरकामावरून , पैशावरून , मुलगा हवाच म्हणून कि मुलींनी धसकाच घेतला आहे , एकतर लग्न करत नाहीत नाहीतर पळून येतात .

शिक्षणाचे एवढे अवडंबर झाले आहे कि शिक्षण उगीच महाग करून ठेवले आहे . लोक जातात आणि येतात पण पुढे नोकरी मिळवायला , आयुष्यातल्या प्रॅक्टिकल गोष्टी हाताळायला गोंधळ .

कुठल्या यात्रेला , जत्रेला किंवा सुट्टीवर इतके लोक एकाच ठिकाणी जाणार कि तिथली यंत्रणा मोडून तोडून पडली पाहिजे

जिथे मतलब आणि फायदा आहे ते बरोब्बर केले जाते , नाहीतर नाही .

सारासार विवेकबुद्धी , Power of discretion असलं काही नाहीच .


अंबानींचा JIO :--
१५००/- रु फोन ?
कुठल्या हिशोबाने त्यांनी हे venture केले आहे कळत नाही . तो फोन बनवायला १५००/- पेक्षा नक्कीच जास्त लागले असतील .
...
हा कुठला बिझनेस प्लॅन आहे ? कॉम्पिटिशनला संपवायचा आहे का ? का अजून काही ?
८०-८१ साली धीरूभाई अंबानीने Vimal कंपनी काढली होती . तेंव्हा खूपंच बायका नोकरी करू लागल्या होत्या . तेंव्हा त्यांनी ज्या साड्या बनवल्या होत्या त्या जाम टिकाऊ , धुतल्या कि पटकन वाळणाऱ्या आणि इस्त्री न लागणाऱ्या अशा होत्या . design पण नवीन होते . बायका खुश होत्या .
त्यांनी तेंव्हा लोकांना काय हवंय ते जाणलं आणि लोकांनी पण भरपूर प्रतिसाद दिला .
नंतर त्यांनी किती कंपन्या काढल्या , कायकाय उद्योग केले , बरेच आगेपीछे पण केले , पण ते वाढतंच गेले .
हे JIO म्हणजे त्यांनी लोकांना जाणलं आहे का ? आत्ता आपल्या देशात लोकांना खूप सारे हवे आहे पण पैसे नाहीयेत . त्यांच्या इच्छा आहेत पण सगळं महाग झालंय .
आपल्या कंट्री मध्ये 'High turnover low cost ' हे लागू पडतं . प्रचंड लोकसंख्या , सगळ्यांच्याच गरजI वाढलेल्या . ते गोष्टी विकत तर घेणार आहेतच पण महाग झाल्यामूळे चिडचिड होते आहे .
हे सगळ्याच बाबतीत होते आहे , मेडिकल ट्रीटमेंट , शिक्षण , कपडे , लग्नाचा खर्च . जे म्हणाल ते .
लोकांना माफक दरात , average to good quality हवी आहे . खूप पॉश नको , साधारण चालेल पण दर माफक असावेत . त्याचे compensation turnover वाढवून होते .
हे गणित त्यांना जमले आहे .
प्रत्येक गिर्हाईकांकड्न खूप पैसे घेण्यापेक्षा ,,, प्रत्येकाकडून माफक घ्या आणि खूप जणांना सर्विस द्या .
ते चिनी सामान पण त्यामुळेच आपल्याकडे चालते . स्वस्त असते , जेवढे दिवस टिकेल तेवढे टिकेल . खूप टिकावं अशी अपेक्षाच नसते .
रस्ते पण असेच , महिनाभर बरे दिसले तरी खूप झाले .
मला तर वाटते आहे मुकेश अंबानींचा Guide मधला Dev Anand झालाय . एक अवस्था अशी येत असेल कि मला आता नको , दुसऱ्याला द्यावेसे वाटते . असे झाले असेल का ?
हे venture लॉस मध्ये गेलं तरी त्यांना नुकसान झेपेल .
आपल्याकडे कोणाकडे कितीही पैसे असले तरी अजून मिळाले तर हवेच असतात , सगळीकडे हेच दिसते , त्यामुळे अंबानीने हे केले आहे ते कसे काय असे वाटते .
जेंव्हा लोक म्हणत होते India मध्ये काही अर्थ नाही आणि भरभरून परदेशात गेले , तेंव्हा त्यांनी आपल्या देशातल्या लोकात , इथल्या कंडिशन मध्ये इंटरेस्ट घेतला आणि यशस्वी होऊन दाखवले . लोकांना पण पैसा कमवून दिला , नोकऱ्या दिल्या ती पण अचाट गोष्ट आहेच कि !!
Only time will tell whether this is successful or not .
Ambanis are famous for their 'Out of the box ' thinking

Friday, July 21, 2017

नवीन शोध ;--

टीव्ही  समोर बसले होते , हातात मोबाईल होता त्यात youtube  चालू होतं . टीव्ही चालू केला आणि चुकून मोबाईलचे बटण दाबले गेले तर  मोबाईल वर चालू असलेला विडिओ टीव्हीवर दिसू लागला . 

अरेच्चा असे कसे झाले ?

तर घरात वायफाय आहे आणि तुमचा टीव्ही वायफाय  enabled  असेल तर मोबाईल मधले youtube चे विडिओ 'Watch on tv ' चे बटण दाबून टीव्हीवर बघता  येतात . 

***************************************************************************

Today's discovery .
Sat in front of the tv and switched it on , I had my mobile in my hand and something on youtube was going on . Inadvertently pressed a button and the video was displayed on tv !!
So if you have wifi and a wifi enabled tv , you can project youtube videos on tv by pressing a 'watch on tv button '.
Maybe this is an old thing but I discovered it today and I am thrilled .

Tuesday, July 18, 2017

एकदा husband ला म्हटलं चल तुला नवीन शर्ट घेऊ . तो as usual "कशाला ? काही नको " असं म्हणाला . मलाच हौस म्हटलं चल ठाण्याला जाऊ ,एवढे mall झालेत चल .
By the way --ठाणे माझे माहेर --आणि जगातले बेस्ट शहर --कारण एक तर ते माझे माहेर आहे , आता तिथे कोणी नाही पण अजूनही मला ठाण्याला जायचं म्हटलं कि प्रचंड आनंद होतो .
ठाण्याचा layout सोपा आहे आणि तिथे कामं पटापट होतात .
...
तर मग आम्ही mall मध्ये branded शर्ट घ्यायला गेलो . तर तिथला एकही शर्ट त्याला होईना , मोठी size फारच सैल , लहान size फारच घट्ट . बरंच हिंडलो पण सगळीकडे तेच .
त्याच्या भाषेत तो 'तुंदिलतनू ' आहे , म्हणजे ढेरीवाला . ती ढेरी काही आता जाणार नाही . आणि त्या mall मधले salesman वयाने कमी ,एका पेक्षा एक बारीक बारीक , नुसती हाडं हाडं , ते अश्या विचित्र नजरेने बघायचे .
आमचा गडी हिरमुसला , थोडा फुगून बसला . आता काय करायचं ?
मी आणलं होतं मग आता ?
मग म्हटलं थांब आपण माझ्या ठाण्यात जाऊ . आम्ही नौपाड्याला गेलो . तिथे गोखले रोड , राममारुती रोड वर जुनी readymade ची दुकाने आहेत तिकडे जाऊ .
मग अशाच एका दुकानात गेलो .कुणीच नव्हतं ,आम्हीच .
Salesman वयाने मोठा होता .
त्याने अंदाज घेतला , AC लावलं , थंड मागवलं , बसायला दिलं (Mall मधे बसायला जागा नसते )
मग त्याने एक एक शर्ट दाखवायला सुरुवात केली . अहा !, काय variety होती . आणि सगळे बरोब्बर मापाचे . मस्त designer ,fitting ला perfect .
मी विचारलं तुमच्याकडे कसे काय , mall मधे आजिबात मिळाले नाहीत . तो म्हणाला तुमच्याकडे बघूनच मला कळले कि तुम्ही तिकडून आलात . आम्ही हे खास आपल्या लोकांची मापं असतात तसे बनवून घेतलेत .
Customerला समजून घेऊन service देणं आणि आम्ही करतो तेच बरोबर असं म्हणून आपले products माथी मारणं हे दोन्ही बघितलं .
हे जुने दुकानदार फार हुशार आहेत , उगाच नाही एवढे mall झाले तरी त्यांना टक्कर देत उभे आहेत.
आमचे काम झाले , आमचा गडी खुश झाला . आणि मी पण ठाण्यासारखे जगात शहरच नाही हे पुन्हा पुन्हा म्हणायला मोकळी झाले .

गुरुपौर्णिमा

आम्ही सर्जरी पोस्ट करत असताना बॉस लोक मोठ्या कॉम्प्लिकेटेड केसेस करायचे , मग कमी कठीण थोड्या जुनिअर लोकांना आणि सोप्या अगदी नवशिक्या लोकांना . उतरंड असायची .

शिकत असताना सोप्पी ऑपरेशन्स पण कठीण वाटतात मग हळू हळू जमत जातात मग जशी प्रगती करता तशी मोठी मोठी ऑपरेशन्स वाट्याला येतात .

...

एकदा आमच्या बॉसने अगदी सोप्पं ऑपेरेशन केलं , ते इतकं छान केलं , अगदी नजाकतीने . कधी सुरू झालं आणि कधी संपलं कळलं सुद्धा नाही. इतकं स्टIयलिश ? आम्हा जुनिअर लोकांना अचंबाच वाटलंI होता.

तेंव्हा आमचा एक सिनिअर म्हणाला होता " किती वर्षाची तपश्चर्या असते तेंव्हा कुठे ही सहजता येते , मुद्दाम मोठे लोक सोप्प्या गोष्टी कशा करतात ते बघायचं कारण आपल्याला त्या कळत असतात , आणि त्या सोप्या गोष्टी ते किती अप्रतिम करतात ते टिपायचं कारण आपल्याला ती लेव्हल गाठायची आहे.

Always have high aims in life , the struggle to reach there is very interesting and satisfying.

आयुष्यभर शिकणे आणि शिकवणे यापेक्षा आपल्या गुरूंना दुसरी काय मानवंदना देऊ शकतो ?

एक पेशंट आला , चांगला दांडगा मिशावाला . पोटात दुखतंय म्हणून परस्पर सोनोग्राफी करून आला होता . यात त्याला cholelithiasis होतं म्हणजे gallbladder मध्ये खडे होते आणि तिथेच दुखत होतं .
त्याने विचारले काय झालंय ?
Gallbladder मध्ये स्टोन्स आहेत.
...
मग ?
ऑपेरेशन करावं लागेल .
कुठलं ?
Cholecystectomy .
म्हणजे काय ?
पित्तIशयाच्या पिशवीत खडे झालेत , तिथेच दुखतंय म्हणून ती पिशवी काढावी लागेल .
नाही काढली तर ?
दुखत राहील आणि अजून वेगळे प्रॉब्लेम पण होऊ शकतील .
खडे विरघळणारे औषध द्या. मला पिशवी काढायची नाही
असं औषध नसतं ,ऑपेरेशनच करावे लागेल . तात्पुरतं दुखणं कमी व्हायचं देता येईल .
पण असं औषध देणारे असतात , आहेत .
मला तरी माहीत नाही .
मग तो माझ्याकडे संशयाने पाहू लागला . त्याला वाटलं असेल की आपण बरे सापडलेली दिसतोय , मुद्दाम औषध देत नाहीयेत , ओपरेशन सांगत आहेत पैसे काढायला . तो एवढा दांडगा माणूस संशयाने माझ्याकडे बघत होता .
मग म्हणाला " मी ऐकलंय की पिशवी काढल्यावर त्रास होतो . मी माझी पिशवी काढू देणार नाही
छे , आजिबात नाही उलट तुम्हाला त्रास होतोय तो जाईल .
एक नाटक पण आलं होतं त्यावर .
कधी ? Cholecystectomy वर ? मला नाही माहीत . म्हटलं ह्याच्या डोक्यात काय आहे देवजाणे .
हो आलं होतं . डॉक्टर एकI पेशंटची पिशवी काढतात मग तिला त्रास होतो . मी माझी पिशवी काढू देणार नाही .
अहो ती गर्भाशयाची पिशवी ,ती बायकांनाच असते , तुमचं वेगळं आहे, तुम्हाला काही नाही होणार .
पण त्याच्या डोक्यात संशयाचं भूत चांगलंच जोरदार होतं .
हा एवढा राक्षसी चेहऱ्याचा माणूस समोर बसून " मी माझी पिशवी काढू देणार नाही " म्हणत असताना खरं तर मला जाम हसू आलं , हसले असते तर त्याला राग आला असता आणि त्याने एक पंच मारला असता तर मी गIरदच झाले असते .
मग ?
मला ऑपेरेशन करायचं नाही .
ठीक आहे .
अशा पेशंटना जास्त समजवायला गेलं तर त्यांना जास्तंच संशय येऊ लागतो .
मेडिकलच्या जगावर नाटकं सिनेमे येतात पण त्यातून आम जनता त्यांना हवा तो अर्थ काढते आणि जास्तच confuse होते .

Saturday, July 15, 2017

माझ्याकडे २ मुली नोकरी मागायला आल्या होत्या, साधारण २० वर्षाच्या . १०वि पास ? दिसायला स्मार्ट होत्या , आम्हालाही गरज होती म्हणून ठेवल्या . कुणी आलं तर या बसा करतील ,नाव लिहून घेतील ,थोडा हिशोब लिहितील आणि Xerox काढून आणतील एवढी माफक अपेक्षा होती .

मग कळलं मराठी येत नाही ,English च तर नावच नको , आकडे लिहिता येत नाहीत , ३२५ --३००२५ असा लिहिलं कागद punch करायला सांगितले तर एकेका कागदावर खूपच भोकं पाडून ठेवली . काही बोललं तर राग पटकन येणार , आपल्याला येत नाही तर शिकून घ्यावं हे... तर आजिबातच नाही .

नखरे , mobile, boyfriend ला phone हे व्यवस्थित .

एवढे advanced dumbo पहिल्यांदाच पहिले . मलाच २ सापडल्या तर अजून किती असतील ?

ह्या मुलींना कोणी काहीच शिकवलं नाही , शाळेत नाही आणि घरी पण नाही .

मी दम भरला तर माझ्याशीच खूप भांडल्या .

मी काय फार तर कामावर ठेवणार नाही , पण त्यांच्या फायद्या साठी तरी त्यांना आलं पाहिजे .

मला वाटतं असे कमी IQ चे असतील , त्यांना लिहिणे वाचणे आणि बेरीज वजाबाकी येव्हाड्यचीच शाळा असावी , बाकी जशी प्रगती दाखवतील तसं शिकवावं .

त्या कदाचित स्वयपांक चांगला करतील , मुलं चांगली सांभाळतील किंवा कलाकुसरीची कामं चांगलं करतील किंवा अजून काही ,पण ते त्यांचं त्यांनाच किंवा त्यांच्या आईवडिलांना शोधावं लागेल .

किंवा ultimate लग्न करून टाकतील .

Thursday, July 13, 2017

हल्ली मुलं दोन -अडीच वर्षाची झाली कि त्यांना playgroup , nursery च्या शाळेत पाठवतात . बहुतेक घरात भावंड नसतं किंवा सांभाळायला कुणी नसतं किंवा जर दुसऱ्या मुलांची ,माणसांची सवय व्हावी हे पण कारण असतं .

पण मुलं अजून छोटी असतात , प्रतिकार शक्ती (immunity )पूर्ण विकसित नसते . ती ५ वर्षांपर्यंत होते . म्हणून Immunisation ५ वर्षांपर्यंत चालतं (पुढे पण असतं पण ५ वर्षांपर्यंत महत्वाचे ).

या वयात मुलांना अधूनमधून आजारपण येतच असतं . थोडी तब्येत नरमगरम वाटली , रडू रडू करत असेल , अंग ...थोडं कोमट ,थोडी सर्दी असं असेल तर शाळेत पाठवू नये .

घरी एक दिवस राहिले , गरम वरण भात खाल्ला , चांगली झोप झाली कि बरे होतात.

बरं नसताना शाळेत पाठवलं कि एक दिवसाचे दुखणे ४ दिवसांवर जाते . त्या पेक्षा एक दिवस बुट्टी मारलेली बरी .

आणि अशी आजारी मुलं शाळेत आली कि अजून १०-१२ मुलं cross - infection होऊन आजारी पडतात .

मुलं सारखी सारखी आजारी पडली तर तब्येत कमजोरच राहते , पुढे मोठेपणी त्रास होतो .

मुलाच्या आईला नोकरी असेल तर तिला पण दांड्या मारून चालत नाही . तर मुलं होऊ द्यायची असतील तर backup चांगला पाहिजे .

त्यामुळे political कारणासाठी तरी माता लोकांनी घरातल्या senior मंडळींशी संबंध चांगले ठेवावेत . अशा वेळेला उपयोगी पडतात .

काल एक पेशंट येऊन माझ्याशी बरीच भांडून गेली .जुनी पेशंट आहे ५०+. ७-८ महिन्यांनी आली होती.
आली तीच आक्रमक " मला असं सारखं सारखं का होतं ?"
" काय होतं?"
"सारखं पोट बिघडतं , माझ्या सगळ्या टेस्ट करा "...
सारखं म्हणजे कधीपासून ?
झाला १ महिना
बऱ्याच दिवसांनी आलात मग एवढे दिवस बऱ्या होतात का ?
हो बरी होते .
मग आता काय झालं एवढं एक महिन्यात ?
अहो हा पावसाळा सुरू झाल्यापासून दर रविवारी आम्ही मॉन्सून पिकनिनला गेलो , तर माझं जरा वेडं वाकडं खाणं झालंय आणि २ दिवसांपूर्वी कटलेट केले होते ते खूपच खाल्ले आणि तेंव्हा पासून पोट टम्म झालंय .
अहो अपचन झालंय , Infection झालं असेल , treatment केल्यावर होईल बरं .
नाही माझ्या सगळ्या टेस्ट करा , मला असं का होतं .
अहो कितीतरी वेळा टेस्ट केल्यात , सगळ्या नॉर्मल येतात , आणि नॉर्मल आल्या की परत तुम्ही येऊन माझ्याशी भांडता , सगळ्या टेस्ट नॉर्मल असून मी का आजारी पडते .

मग आता मी काय करू ?
हे बघा तुम्ही आता ५०+ आहेत , या वयात पचनशक्ती कमी होते , तर तब्येतीला झेपेल एव्हढंच खा .
मग मी काय मजा करायची नाही का ? काही खायचं नाही का ?
अहो मजा करा पण झेपेल एवढीच करा , तुम्ही नेहेमी जसं खाता पिता तसं सांभाळत करा मग बऱ्या राहाल . काहीकाही जणांना उलटं सुलटं वागलं तरी त्रास होत नाही काही जणांना होतो . प्रत्येकांनी आपापलं सांभाळावं .
मग मी खाऊ तरी काय ?
पुन्हा तेच , आता ५०+ बाईला काय खावं काय नको हा सल्ला द्यायचा म्हणजे कठीण आहे .

मला त्या बाईचं दुःख कळलं , तिला कसंही वागायचं आहे , पथ्य पाळायचं नाही आणि आजारी पण पडायचं नाही आणि आपल्याच चुकीमुळे आपण आजारी पडलो हे मान्य करायचं नाहीये आणि सगळं ठपका डॉक्टरांवर टाकायचाय .
ऐसा नही होता है । फिर डाक्टर के चक्कर लगIने पडते है ।

मी एक पाहिलं आहे , जे लोक नियमितपणे वIरीलI जातात ते असे आजारी पडत नाहीत , आमच्या ओळखीचे असे लोक आहेत . त्यांचं endurance , immunity चांगली असते आणि ते सांभाळून जगतात .

Wednesday, July 12, 2017

मी पण रखुमाई :---

बऱ्याच बायकांना आपल्या नवऱ्याचे मित्र , त्याचा गोतावळा , सारखी त्याच्या भोवती असलेल्या लोकांचं रागच येतो . ह्या लोकांमुळे नवऱ्याशी चार सुख दुःखाच्या गोष्टी पण करता येत नाही , सारखी माणसं , सारखी माणसं . 

ज्या लोकांचा लोकसंग्रह मोठा आहे , त्यांच्या बायकांचे हेच म्हणणे असेल . 

मग ती बायको नवऱ्याला म्हणते , "काय तुमची हि माणसं , सगळे दांभिक , कामापुरतेच येतात , एकपण चांगला नाही , उपयोग करून घेतात , तुमचं नाव खराब करतात .  नका उभं  करू त्यांना , नाहीतर आपणंच जाऊ दुसरीकडे , नाहीतर मी चालले दुसरीकडे . 

विठुराया ऐकून घेतो  , रुसलेल्या रखुमाईच्या समजूत लढतो , तरीपण ती ऐकत नाही , दुसरीकडे जाऊन उभी राहते . 

पण विठ्ठल  आपल्या लोकांना , गोतावळ्याला , भक्तांना सोडत नाही . तिथेच उभा  आहे . अत्तावीस युगे हेच चालू आहे . 
 सगळेच विठ्ठल , सगळ्याच रखुमाई !!

हे एक गोड गाणे , रखुमाईच्या कैफियत मांडणारे 



आजकाल opd त जायचं म्हणजे फार alert असावं लागतं , कोण पेशंट काय घेऊन येईल सांगताच येत नाही . आणि हल्ली जे जे होतंय ते आमच्या textbook मध्ये आजिबात नाही . 

एक आजोबा आले होते , श्रीमंत (Well off ) , काय होतंय तर उजवा  गाल  सुजलंय , २-३ दिवस झालेत आणि थोडा दुखतोय . 
मला आधी facial paralysis चा doubt आले , ते नव्हतं ,मग कुठे काही गळू आहे का बघितलं , ते पण नव्हतं , मग विचारलं कशामुळे झालं ? काही मार लागला का ? तर नाही म्हणाले . मग थोडा वेळ त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर जरा गोरे वाटले . 

मग विचारलं parlour मध्ये जाऊन facial  केले का ? तर लाजून हो म्हणाले . ( आधी आपणहून नाही सांगितलं )

तर उजवाच  गाल का ? तर facial करणाऱ्यांचा उजवा हात स्ट्रॉंग असतो आणि जास्त दाब पडतो . 

आजोबा तरुण होऊ बघत्येत , पिकली पानं हिरवी होतायेत . 

असू दे असू दे !!

अशा वेळेला हसायचं नसतं , हसू आलं तरी . गंभीरच ठेवायचा चेहरा . 

********************************************************************

माझ्या समस्त facial करणाऱ्या बंधू भगिनींनो , आजकाल जरा सिनियर लोकांना पण फेशिअल करून घ्यायचं असतं , तर जरा हळू . त्यांना कितीही वाटलं आपण तारू आहोत तरी त्वचा थोडी नाजूक झालेलीच असते , तर जरा बेताने . 


आम्ही आज श्रीदेवीचा 'Maa ' सिनेमा पहिला . 

It is good , I liked it .

सिनेमा मनात रेंगाळतो , छोटे छोटे प्रसंग परत परत आठवतात . 

श्रीदेवी आता साठीची असेल , खरंच कौतुक करावं तेवढं कमी . 

Good story , good direction , good casting , मजा आया !!

दिमाग लगाके  पिक्चर बनाया  है !!

शनिवारी 'MOM ' पहिला आणि काल  'Naam  Shabana 'पहिला . 

दोन्ही सिनेमे '' Revenge movies ' आणि तो पण बायकांनी घेतलेला सूड . . दोन्ही सिनेमे छान , competent असे होते . 

पण आता एक गोष्ट लक्षात येते आहे कि मागे हेरॉईन व्हायचं असेल तर तर त्या मुलींना नाच येणे , सुंदर दिसणे , नट्टापट्टा करणे , नखरे करणे , पुरुषाचे मन रिझवणे असले item करता येणे आवश्यक होते . 

आता तसे नाहीये . मुलींना टेकनॉलॉजि , मारामारी , फिटनेस , mental alertness हे जमलं पाहिजे . पैसे तर कमावलेच पाहिजेत . 
जुन्या जमानातल्या माया , ममता , प्रेम वगैरे outdated झालेले इमोशन्स आहेत .
त्या 'चि व चि सौ का' मधले हिरो हेरॉईन तर एकमेकांशी पण मारामारी करतात . 



Times have changed !!

ते तुझे डोळे , तुझे ओठ , तुझे केस  वगैरे सगळं गेलं आता . 

Girls don't want to be girls anymore they want to be boys . Girls don't like the way boys and men behave with them , and they don't even protect them so now they have to manage things on their own .

कठीण आहे !!

परंपरेनुसार 'Division of lobour'  होतं . पुरुषांनी बाहेर जाऊन कमवायचं आणि स्त्रियांनी घर , मुलं , सांभाळायची  . 

त्या दंगल मध्ये आमिरखान ने मुलींना पहेलवान केलं  तर जगाने  त्याचा सिनेमा डोक्यावर घेतला पण एका शेतकऱ्याने मुलींना नांगराला जुंपलं तर गदारोळ झाला . 

मुलींनी  नेमकं कसं वागायचं ?

Previously the roles were well defined , now they are not .






बऱ्याच लोकांना इंग्रजी बोलण्याची भीती वाटते , येत असतं पण चुकेल का ? आपल्याला हसतील का ? असंच वाटत राहतं म्हणून मग ते येत असून पण बोलत नाहीत .

आम्ही बराच tourism केलं आहे , बहुतेक वेळेला मराठी group बरोबर . तिथे जेवण मराठी , बोलणं चालणं मराठीच .

पण एकदा एका International tour company बरोबर गेलो होतो . तिथे वेगवेगळ्या प्रांताचे , भाषेचे लोक होते . गुजराथी , south Indian , North Indian . सगळे ठोकून इंग्लिश बोलायचे , न भिता . गुजराथी गुजराथीतून बोलायचे ,South Indian त्यांचा हे...ल काढून बोलायचे . North Indian - ते दिल्लीचे होते , ते तर जाम जोर लाऊन बोलायचे . कुणाचेच इंग्लिश perfect नव्हतं पण बोलायचे .

आजीबात घाबरायचं नाही , बोलायचं , चुकलं तर कोणी पकडून नेत नाही .

आधी आजूबाजूच्या लोकांवरच practice करायची . आपोआप हळूहळू सहजपणा येत जातो .

कुणीतरी चांगलं इंग्लिश बोलणारं सापडतच त्यांचं बोलणं ऐकायचं , तसं बोलायचं

आपली मायबोली आपली आई आहे , दुसरी भाषा आल्याने तिचा सन्मान कमी होत नाही .

दडपण ठेवायचेच नाही . बाकी सगळी हुशारी फक्त बोलता येत नाही म्हणून मागे नाही पडायचं .

Friday, July 7, 2017

त्या तुषार कपूरनी चाळीशी आल्यावर खटपट्या लटपट्या करून एकI मुलाला जन्म दिलाय .ते पण लग्न न करता . (Surrogate mother)

आपली पारंपरिक पद्धत म्हणजे योग्य त्या वयात लग्न करायचं , पटपट १-२ मुले झाली पाहिजेत . झालं . आता करा संसार .

ही पद्धत आता कालबाह्य झाली असे वाटते .

...



आधी वेळेत कुणी लग्न करत नाही , मग इतक्यात बाळ नको असे करत बसतात , career करायचं असतं दोघांनाही , किंवा पैसे जमवायचे असतात किंवा घर घ्यायचं असतं किंवा इतक्यात अडकायचं नसतं . Various reasons . किंवा लग्न टिकत पण नाहीत .

हल्ली झालं तर एक होतं आणि ते पण आकाशपाताळ एक करून .

आता कायद्याने पण single parent ला मुलाला जन्म द्यायचा, दत्तक घायचा हक्क दिला आहे . लग्न करायला हवे असे नाही.

पण मी एक गंमत पहिली आहे पस्तिशी चाळीशी आली की आपल्याला एक छोटं कुणीतरी हवं ही भावना एकदम तीव्र होते , एक्दम जबरदस्त बाळाची भूकच लागते , पण तोपर्यंत निसर्ग कधीकधी साथ देत नाही . मग एक्दम जIग आल्यासारखं करतात आणि treatment साठी चकरा सुरू होतात . आणि तेंव्हा career गेलं उडत असं पण होतं .

दुसरं म्हणजे ज्यांना वेळेवर अगदी तरुणपणी १-२ मुलं झालेली असतात त्यांना पण पस्तिशी आली की अजून एक बाळ असावंस वाटतं काहीजणांना आपोआप होतं पण . पण आधीची १०-१२ वर्षाची मुलं असताना लाज वाटते .

आमच्याकडे एकदा अशी पेशंट डिलिव्हर झाली होती , मोठी दोन मुलं होती आणि आता एक छोटं बाळ . त्या मुलांना एवढा आनंद झाला होता आणि त्यांना बाळासाठी एक मोठ्ठं खेळणं आणलं . बाळाकडे बघत बसायचे शाळेला दांडी मारून . मजा यायची बघायला .

पस्तिशी नंतर मातृत्व किंवा वडील होणं जास्त एंजॉय करता येतं कारण थोडी maturity आलेली असते , आर्थिक स्टॅबिलिटी असते . व्यावहारिक दृष्ट्या उशीर झालेला असतो पण आता काळ बदलला आहे .

माझी आई MD (Gynac ) होती . तिचे असे खूप पेशंट असायचे . ती म्हणायची ती आधी झालेली मुलं मोठी कधी होतात कळत पण नाही, ते शिक्षणासाठी म्हणून निघून जातात आणि हे छोटं आपल्याजवळ राहतं . आणि हे मोठं होईपर्यंत मोठ्या मुलांना मुलं झालेली असतात , त्यातलं एक आपल्याजवळ आणून ठेवायचं सोबतीला .

हल्ली खूप जोडपी अशी दिसतात की त्यांची सगळी मुलं परदेशात आहेत आणि दोघं एकटे पडलेत , अजून एक उशिरा झालेलं बाळ असतं तर करमलं तरी असतं .

आता population , महागाई , शिक्षण ,नोकरी, ट्राफिक असे अनेक व्याप आहेत पण प्रत्येकानी आपापला निर्णय घ्यायचाय.

आपल्या कंट्री मध्ये काही म्हणा सगळ्यात मोठ्ठI आनंद बाळ झाल्याचाच आहे .

मला वाटतं आपल्या India चा speed 'सावकाश ' आहे .

सावकाश गोष्टी केल्या कि बरोब्बर होतात .

लग्नात नाही का म्हणत "सावकाश जेवा " ?

...

सावकाश जेवलं कि अन्न बरोब्बर पचतं .

सावकाश गाडी चालवावी , सावकाश विचार करून निर्णय घ्यावेत ,घाईघाईने कोणाबद्दल मत बनवू नये .

हल्ली लोकांना फार एकावर एक कामं घ्यायची सवय लागली आहे .हे झालं कि ते , ते झालं कि ते . स्वतःला फार गुंतवून ठेवतात .

आपण busy असलं पाहिजे आणि लोकाना दिसलं पण पाहिजे नाहीतर आपलं status कमी होतं असं बऱ्याच जणांना वाटतं .

ह्यातून चुका होतात , accident होतात , काहीतरी महत्वाचे विसरले जाते ,decision चुकतात .

कधी कधी फार महागात पडतं .

शरीराला , मनाला आराम हवाच कि !!

अजून एक गोष्ट . फार busy असलात तर आजूबाजूचे परस्पर काहीतरी कारभार करतात ते अंगाशी येऊ शकतं . बारीक लक्ष ठेवता येत नाही , काहीतरी महत्वाचे नजरेतून सुटतं . आपलं लक्ष आहे हे पण लोकांना कळलं पाहिजे .

"In a jiffy ", "I want it done yesterday " ह्या American terms popular आहेत पण आपल्याकडे असं होत नाही .

खूप लोकांवर कामाचे pressure प्रचंड आहे , मग खूप थकवा येतो , जाता जात नाही . ह्याला 'Chronic fatigue syndrome ' असं नाव आहे .

कधी कधी वेगाने व नेमके काम करावे लागते ,पण सतत नसे नसावे . It is damaging to the body .

जगणं सोपं आणि सुटसुटीत करता आलं पाहिजे .

Thursday, June 29, 2017

एका young man चं ( वय १७-१८) confession :---

"काकू (म्हणजे मी ) मला नं माझ्या GF पेक्षा माझा mobile आवडतो . , मी सांगितलेलं ऐकतो , माझ्यावर रुसत नाही , हट्ट करत नाही ,तो मला त्रास देत नाही , रडत नाही .... "

"अरेच्चा काय झालं ? गडबड झाली का ?"

...

हो आणि विषण्ण पणे हसला ( हा विषण्ण शब्द मागे मराठी कथा कादंबऱ्यात असायचा , हल्ली कोणी वापरात नाही ) त्याचं हसू बघून वाटलं " दिलं को ठेंस बहुत जोरकी लगी होगी '

आता समजूत काय काढणार ?

म्हटलं " होता है , होता है !!" हा तर पहिलाच अनुभव दिसतोय , और ३-४ दफा हो जायेगा तो दिल मजबूत हो जायेगा , उठसूट टुटेगा नाही .

ऐ मेरे दोस्त ,अब खुशी का ढुंढो बहाना , ये गम के फसIने , इष्क के अफसाने तो चलते रहेंगे !!

I take a lot of community lectures in various mahila-mandals with only a blackboard and chalk.




Saturday, June 24, 2017

Weekend आवी गयु ,बहु सारू लागे छे .

आज मारो गुजरातीमा वात करवIनु मन करे छे .

केम ? मज्जामा छो के नथी ? मज्जामाचं रवानु .

...

झालं माझं गुजराथी संपलं , एवढंच येतं . आमचे बॉस म्हणायचे ' जेवढ्या भाषा शिकता येतील तेवढ्या शिकून घ्या , तेव्हढंच तुम्हाला पेशंटना समजून घेताना फायद्याचं पडेल .

प्रत्येक भागाची demography वेगळी असते , म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक राहतात . कल्याणचे वेगळे , ठाण्याचे वेगळे , पुणे नाशिकचे वेगळे . त्यांची भाषा वेगळी , पद्धती वेगळ्या , जेवण वेगळं . जेवढं समजून घेऊ तेवढं झिरपतI येतं .

गुजराथी पेशंट आले की मी थोडं बोलायची मग त्यांना वाटायचं की यांना गुजराथी येतं मग ते खूप सगळं गुजराथीतून बोलायचे , मग माझी धांदल . मग त्यांना सांगायचं की मला एवढंच येतं , मग मोडक्या तोडक्या हिंदी मराठीतून चालू ठेवायचं .

कल्याण जुनं गाव आहे , म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळIपासूनचे म्हणजे आत्ता पर्यंत बघा किती पिढ्या झाल्या असतील ?

वेगवेगळ्या आळ्या आहेत , वेगवेगळा समाजाचे लोक राहतात . कासार, कुंभार ,चांभार , ब्राह्मण , मारवाडी ,मुसलमान , तेली ,वाणी , आगरी ,अजून खूप आहेत . सगळे आणि परंपरागत व्यवसाय करतात .

South Indian , त्यात तामिळ वेगळे आणि केरळी वेगळे , ओळखता आले पाहिजेत , ह्याचं त्याला बोलून चालत नाही . आता बंगाली , ओरिसा हे पण खूप आले आहेत . NRI पण एक वेगळी जमIत आहे .

आमचे दुबई ला नातेवाईक होते , त्यांची मुलं छोटी होती , काही झालं की तिथल्या डॉक्टरकडे घेऊन जायचे . तो डॉक्टर तर सतत हैराण असायचा कारण दुबईमध्ये तर सगळ्या जगातून लोक एकत्र आलेले , त्यांना समजून घेताघेता परेशान झालेला असायचा .

आता कल्याण बदलत चाललंय , नवीन भागात तर एक्दम आधुनिक झालंय , हेच कल्याण का म्हणून ओळखता येणार नाही.

Sunday, June 18, 2017

अजूनही बऱ्याच घरांमध्ये चार पिढ्या , पांच पिढ्या दिसतात . पण असं एकत्र बसून फोटो काढणं होत नाही .
छान वाटतं बघायला .

19-6-16

'उडता पंजाब' -- review वाचले, आता बघावा का नाही ?
कधी वाटतं खूपच समृद्धी आली , सगळं भरपूर असलं , पिढीजाद वैभव असलं कि माणसाला फक्त बिघडून दाखवायचंच बाकी राहतं का ? Aim in life काहीच नसतो . सगळं तर असतं .
म्हणजे थोडी कडकी , थोडी ओढाताण . थोडं डोक्यावर कर्ज , कष्ट , दगदग , थोडं tension असं असलं तरच माणसं track वर राहतील का ?
...
मी एक वाक्य ऐकलं होतं "जास्त झालं कि उतू जातं " . पैसे के पीछे पडी दुनिया आपल्या मुलांना करायला काहीच ठेवत नाहीये. वIयI जाऊन दाखवणं हा एकंच option त्यांच्यापुढे आहे का ?

Tuesday, June 13, 2017

From Makarand Madanrao Kulkarni :-


पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर फिर्यादीला एफआय आरची प्रत लगेचच देणे कायद्याने बंधनकारक आहे.मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ती प्रत देणे कधीकधी कठीण जाते.अशावेळी तक्रारदाराला एफआयआरचा फोटो मोबाईलमध्ये घेण्याची मुभा देण्यात आली आहे.


ज़िंदगी में प्यार का पौधा लगाने से पहले ज़मीन परख लेना दोस्तों..
हर एक मिटटी की फितरत में वफ़ा नही होती..
*
*...
*
तलाश सिर्फ सुकून की होती हैं...

नाम रिश्ते का चाहें कुछ भी हो...
*
*
*Copied from here and there.....

आमचं लग्न झालं तेंव्हा आमच्या सासूबाई ज्या वयाच्या होत्या त्या वयाची मी आता आहे . ५४ .

त्या एकदम सुगरण होत्या , अन्नपूर्णा , काहीही केलं तरी चविष्ट व्हायचं . त्यांच्या हाताखाली काम करून मी पण बरंच शिकले . दम पण खूप भरायच्या , पण माझी आईच मला एवढी फायरिंग द्यायची कि ह्यांचं दम भरणं मला नॉर्मल वाटायचं . It's ok type . पुन्हा मेडीकलला बोलणी खाण्याला अंतच नसIयचा त्यामुळे कधी मनावरच घेतलं नाही .

हल्ली जरI बोललं कि काय राग येतो लोकांना , फारच झालंय मानपान .

...

तर असो !

तर मी साखरांबा केलाय . सासूबाई कैरीचा कीस काढून त्याचI साखरांबा करायच्या आणि त्यात वेलदोडे घालायचे आणि फोडी करून गुळांबा करायच्या त्यात लवंग घालायची .

मी एकाच केलाय दीड किलोचा ,साखर पण घातली आणि गुळ पण घातला , वेलदोडे, लवंग केशर सगळं घातलं, मस्त झालाय .

ह्यात एक tip आहे , कैऱ्या किसून झाल्यावर , साखर , गुळ जे काय घालायचं असेल ते घालून एक-दीड तास तसेच ठेवायचे म्हणजे साखर मुरते नाहीतर कैऱ्या आणि साखर गुळ एकजीव होत नाहीत .

काहीजण एक पाऊस पडल्यावर करतात, काही आधी --Two schools of thought . पाऊस पडल्यावर केला तर म्हणतात जास्त टिकतो पण मला वाटतं कैऱ्यांचा करकरीतपणI कमी होतो आणि पाऊस पडल्यावर चिखलात जाऊन आणायला कंटाळा येतो .

So that's that ......

नवीन मुलींनी पण करायला हरकत नाही , सोप्पा आहे , आधी अर्धा किलोचा करायचा , जमलं तर मग जास्त . डरनेका नही करनेका । .

ह्याच्या मागचं logic असं असेल कि पावसाळ्यात बाहेर जायला जमलं नाही तर घरात जरI चवीसाठी असावं. आता लोणचं पण करणार आहे . हल्ली विकत सगळं मिळतं पण आपण करायची गम्मत वेगळीच .

काल  आमच्या मेडिकल क्लबच्या कार्यक्रमात कल्याणचे  DCP शिंदे साहेब आले होते . 
पोलीस खात्यात बरेच बदल होत आहेत . 
काही पोलीस स्टेशनची  अवस्था अगदी वाईट होती ,त्यांना चांगल्या जागा मिळवून दिल्या आहेत 

पोलिसांना लोकांशी communicate , संवाद साधण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे . 

पोलीस स्टेशन वर कुठल्या  कुठल्या सेवा मिळतात हे फलक लावण्यात आले आहेत . 

कोणी पोलीस स्टेशनला गेले तर एक संपर्क अधिकारी असतो , तो त्यांना योग्य त्या अधिकाऱ्याकडे  पाठवतो . 

पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना एक feedback form  भरून घेतला जातो आणि दुसऱ्या दिवशी डिपार्टमेंट कडून फोन जातो कि तुमचं काम झालं का ? अनुभव कसा होता ?


ह्या साठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबानी पण विशेष कौतुक केलं . 

व्वा !! फार छान . 

असे बदल झाले तर आम जनतेला मोठा दिलासा मिळेल 

मला ते क्रिकेट आजिबात आवडत नाही , आता नाही आवडत . काय करणार ?

ते क्रिकेट म्हणजे ' Waste of time , money and resources for a disproportionately small number of people '

फायदा म्हणजे खूपंच  माणसे एका जागी बसून राहतात आणि पैसा generate होतो . 

एकदा आम्ही  सगळे घरातले टीव्ही समोर बसून match बघत होतो . सासरे तर असे बघायचे मॅच अगदी डोळे घालून , कि आपली पापणी लवली तरी आभाळ कोसळेल  होईल !! हल्ली नवरा तसI  वागतो . 

मुलगा छोटा ३ वर्षाचा  मंIडी घालून बसला होता , बराच वेळ बघितलं बघितलं आणि म्हणाला बॅट बॉल  खेळतायत . 

मी जाम जोरात हसले , सासर्यांना खूप राग आला , म्हटलं छोट्या मुलांच्या तोंडून सत्य बाहेर पडतं . 

तर हे अवडंबर झालेलं आणि स्तोम माजवलेलं क्रिकेट . 

********************************************************************************

मुलींसाठी खेळायला ग्राउंड नाहीत , एक बाग होती कल्याणमध्ये मनोवी गार्डन , तिथे बिल्डिंग झालीय , अशी बागेत बिल्डिंग करतात काय ?

मुलींना खेळायला सुरक्षित जागा नाहीत म्हणून माता त्यांना बस घरात करतात , बसून बसून त्या बोजड होतात , शरीराची योग्य ती वाढ  होत नाही , स्नायू बळकट होत नाहीत , म्हणून मग कामं करताना कंटाळा येतो आणि सगळ्यात शेवटी डेलिव्हरीच्या वेळेला कळI  सोसवत नाहीत आणि देववत नाहीत , प्रत्येक कळेला गगनभेदी किंकाळी फुटते  , मग डॉक्टर सीझर करतात आणि लोक डॉक्टरांच्या नावानेच ठणाणा करतात . 

मुलींसाठी ग्राउंड हवेत , सायकल चालव , पकडापकडी , खोखो , लंगडी असे  खेळ खेळल्या तर हातपाय मोकळे होतात , भूक लागते , शरीर बांधेसूद रहाते  आणि नैसर्गिक फिटनेस राहतो . अभ्यास करायलाच हवा पण शरीराला पण व्यायाम हवा . 

ह्यासाठी townplanning वाल्या लोकांनी विचार करायला हवा , दिसली मोकळी जागा कि देऊन टाक बिल्डरला असे करू नये . पुढच्या पिढीचा पिढीचं पण विचार करावा . 










So  पावसाळा has set in officially , time to move on !!

आपल्याकडे ऋतू बदलले कि rules बदलतात . 

आधी wardrobe बदलायचा , उन्हाळ्यात जे cotton चे ड्रेस व साड्या स्टयलिश वाटायच्या ते आता अगदी मान टाकल्यागत होऊन जातात , personality अगदी डाउन होते . 
सिल्कला तर हातंच  लावायचा नाही , भिजले तर गेले . 
आता फक्त सिन्थेटिक , खराब होत नाहीत आणि वIळतात पण पटपट . 

ते सदा जीन्स घालून बसणारे काय करतील , भिजली तर दिवस  दिवस वIळत नाही . ते एक dryer मिळतं वेगळं , ते वॉशिंग मशीन बरोबर येतं ते नाही , वेगळं मिळतं . मस्त कोरडे होऊन येतात कपडे . 


आम्ही सिंगापूरला गेलो होतो , तिथे वर्षभर कधीही पाऊस पडतो . तिथे ते थ्री फोर्थ्स  पँट्स , pedal pushers घालतात , . प्रॅक्टिकल फॅशन . नऊवारी साड्या पण adjustable असतात 

आता आहारात बदल करायला हवा . आंबे बंद ,केळ्याचे  शिकरण चालू . पावसाळी आंबे असतात . 
पालेभाज्या बंद , वर लटकणाऱ्या भाज्या चालू , दोडकी , वांगी , पडवळ etc 

श्रIवणात  ती कोवळी कोवळी रताळी येतात , फार छान लागतात , कीस फार छान होतो मऊमऊ . 

Looking forward to enjoying पावसाळा !!!

मी '८९ ला प्रॅक्टिस सुरु केली . सुरुवातीचे काही महिने सामसूमच होती मग हळूहळू प्रॅक्टिस वाढू लागली . पैसे जमू लागले . 

मी माझे पैसे  माझ्या पर्स मध्येच ठेवायची , आणि काय व्हायचं कुठे चांगला ड्रेस दिसला कि घे , साडी घे , पर्स घे असं व्हायचं . जमवलेले पैसे काही क्षणात गायब . बरच दिवस हे असं चाललं होतं . मग एकदा म्हटलं हे काही बरोबर नाही , अशाने आपण कफल्लकच राहू . 

कुछ तो करना पडेगा !

बँकेत अकॉउंट काढून पैसे भरणं कंटाळवाणं होतं . 

मग नवऱ्याने एक आयडिया सांगितली   'Daily collection ' 
तेंव्हा आमच्या सारखे daily income वाले खूप होते , तर बँकेचेच लोक daily कॉलेकशनला यायचे . तुम्ही जमतील तसे द्या . रोज १००/२०० ( तेंव्हा आकडे असेच होते ) 

मग ते बरं पडलं , रोज थोडे पैसेबजूला टाकायचे . एक वर्षाचे अकाउंट ,वर्षाने पैसे मिळायचे . मग त्यातून काही मोठं घेता यायचं . हळूहळू instruments घेत गेले , स्कूटर घेतली आणि मजा म्हणजे हॉस्पिटलची जागा पण ह्या daily collection च्या पैशातूनच बुक केली . 

ह्यामुळे 'Fiscal discipline ' , आर्थिक शिस्त लागली .. 

एक डॉक्टर भेटले होते , छान प्रॅक्टिस आहे पण म्हणाले पैसे कुठे जातात कळतंच  नाही . आजकाल इंस्ट्रुमेंट्स एकापेक्ष एक भारी आले आहेत , एकदम sophisticated , बघितल्या क्षणी मोह होतो , घेतली जातात पण भयंकर महाग , त्यांचा maintainance , annual service चार्जे पण खुपंच असतो . . पैशाला काय वाट हव्या तेवढ्या फुटतात . 

ह्याचा फायदा कर्ज घेतल्यावर होतो , आधी कर्जाचा हप्ता , सगळी देणी , बिलं आणि पगार , उरलेले आपल्याला . 
वेळेवर कर्ज फेडलं तर क्रेडिट score वाढतो आणि परत विना अडथळे पुन्हा कर्ज मिळतं . 

आमचे डॉक्टर लोकांच्या बऱ्याच गोष्टी कर्जावरच  चालतात . 

आपल्याला हवे असतात तेंव्हा पैसे नसतात , मग कर्ज घ्यायचं आणि फेडायचं . 


बँक आपल्याला कर्ज देतात ते त्यांच्या कडच्या लोकांनी ठेवलेल्या ठेवीवर , कर्ज फेडलं नाही तर बँकI  बुडतील आणि ज्यांनी विश्वासाने पैसे ठेवले असती ते नुकसानीत  जातील .

जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांनी आर्थिक शिस्त लावून घेणे गरजेचे आहे , त्यातूनच ते मोठे होत जातात . छोट्या लोकांची काही union नसते , राजकीय पाठबळ पण नसतं , आपणंच आपली काळजी घायची असते . 















13-6-16

Lifestyle disordes :--

ह्या category खाली हल्ली खूपच आजार येतात , म्हणजे जीवनशैलीच्या चुकींमुळे होणारे आजार . जो पर्यंत जीवन शैलीत सुधारणा होत नाहीत तो पर्यंत हे बरे होत नाहीत .

पेशंटची जीवनशैली नेमकी कशी आहे हे त्यांनाच माहित असते , डॉक्टर काही त्यांच्या बरोबर नसतात , ते फक्त प्रश्न विचारू शकतात आणि सल्ले देऊ शकतात . बर्याच गोष्टी लोकांनी आपल्या आपणच बदलायच्या असतात .

...

नुसत्या औषध गोळ्यांनी हे आजार बरे होत नाहीत जो पर्यंत मूळ कारण जात नाही ,मग लोकांची चिडचिड सुरु होते . " एवढी औषधे घेतली तरी काही फरक नाही "

खरे म्हणजे हे आजार ओढवलेले असतात, आपल्या जीवन शैलीत बदल केला तर लगेच बरे होतात (जास्त झाले नसतील तर ) पण डॉक्टरांशी खरं बोलला पाहिजे आणि सांगितलेलं ऐकलं पाहिजे .

हल्ली बरेच पेशंट म्हणतात " फुकटचे सल्ले नका देऊ , मी काही बदलणार नाही , तुम्ही फक्त औषधं द्या , आणि पथ्य पाणी काही सांगू नका , करणार नाही "

१) हल्ली खूपच पेशंट पाय दुखतात म्हणून येतात , पाय दुखणं वेगळं आणि गुडघे दुखणं वेगळं . हल्ली बरेच लोक गाडीत . बसमध्ये किंवा tv ,कॉम्पुटर समोर खूप वेळ बसून असतात , बहुतेकांकडे आजकाल सोफा , dining table आणि पलंग असतो . म्हणजे पाय सतत खाली सोडलेले असतात , आणि कंबर हलत नाही . एकाच जागी एकाच position मध्ये अनेक तास बसून असतात .

त्याने गुडघ्या खाली पोटऱ्या असतात त्यात रक्तIचे चलनवलन कमी .किंवा बंद होते आणि मग पाय आदी जड होतात , सूज येऊ शकते आणि मग दुखू लागतात . तिथल्या रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि मग 'Varicose veins ' किंवा 'Chronic venous syndrome ' होतो .

खूप वेळ उभ्याने स्वयंपाक करणाऱ्या बायकांना पण हे होते .

बर्याच लोकांना कळत पण नाही कि आपले पाय दुखत आहेत , हे इतके हळूहळू होते कि लक्षातच येत नाही मग कधीतरी जाणीव होते कि इथे प्रोब्लेम आहे . ह्या लोकांना नुसतं थकल्यासारखा feel असतो .

ह्यव उपाय म्हणजे logical आहे कि एवढ्या वेळ एकाजागी बसू नये , मध्ये मध्ये चालून यावं किंवा पाय हलवावे , घोटे वरखाली करावे म्हणजे पोटरीचे स्नायू काम करतील आणि रक्त परत फिरू लागेल.

झाल्यावर treatment घेण्यापेक्षा preventive medicine वर भर दिला पाहिजे .

हा एक आजाराचा प्रकार झाला असे कितीतरी आहेत , एक पुस्तक पण लिहिता येईल