Tuesday, July 18, 2017

एक पेशंट आला , चांगला दांडगा मिशावाला . पोटात दुखतंय म्हणून परस्पर सोनोग्राफी करून आला होता . यात त्याला cholelithiasis होतं म्हणजे gallbladder मध्ये खडे होते आणि तिथेच दुखत होतं .
त्याने विचारले काय झालंय ?
Gallbladder मध्ये स्टोन्स आहेत.
...
मग ?
ऑपेरेशन करावं लागेल .
कुठलं ?
Cholecystectomy .
म्हणजे काय ?
पित्तIशयाच्या पिशवीत खडे झालेत , तिथेच दुखतंय म्हणून ती पिशवी काढावी लागेल .
नाही काढली तर ?
दुखत राहील आणि अजून वेगळे प्रॉब्लेम पण होऊ शकतील .
खडे विरघळणारे औषध द्या. मला पिशवी काढायची नाही
असं औषध नसतं ,ऑपेरेशनच करावे लागेल . तात्पुरतं दुखणं कमी व्हायचं देता येईल .
पण असं औषध देणारे असतात , आहेत .
मला तरी माहीत नाही .
मग तो माझ्याकडे संशयाने पाहू लागला . त्याला वाटलं असेल की आपण बरे सापडलेली दिसतोय , मुद्दाम औषध देत नाहीयेत , ओपरेशन सांगत आहेत पैसे काढायला . तो एवढा दांडगा माणूस संशयाने माझ्याकडे बघत होता .
मग म्हणाला " मी ऐकलंय की पिशवी काढल्यावर त्रास होतो . मी माझी पिशवी काढू देणार नाही
छे , आजिबात नाही उलट तुम्हाला त्रास होतोय तो जाईल .
एक नाटक पण आलं होतं त्यावर .
कधी ? Cholecystectomy वर ? मला नाही माहीत . म्हटलं ह्याच्या डोक्यात काय आहे देवजाणे .
हो आलं होतं . डॉक्टर एकI पेशंटची पिशवी काढतात मग तिला त्रास होतो . मी माझी पिशवी काढू देणार नाही .
अहो ती गर्भाशयाची पिशवी ,ती बायकांनाच असते , तुमचं वेगळं आहे, तुम्हाला काही नाही होणार .
पण त्याच्या डोक्यात संशयाचं भूत चांगलंच जोरदार होतं .
हा एवढा राक्षसी चेहऱ्याचा माणूस समोर बसून " मी माझी पिशवी काढू देणार नाही " म्हणत असताना खरं तर मला जाम हसू आलं , हसले असते तर त्याला राग आला असता आणि त्याने एक पंच मारला असता तर मी गIरदच झाले असते .
मग ?
मला ऑपेरेशन करायचं नाही .
ठीक आहे .
अशा पेशंटना जास्त समजवायला गेलं तर त्यांना जास्तंच संशय येऊ लागतो .
मेडिकलच्या जगावर नाटकं सिनेमे येतात पण त्यातून आम जनता त्यांना हवा तो अर्थ काढते आणि जास्तच confuse होते .

No comments:

Post a Comment