So पावसाळा has set in officially , time to move on !!
आपल्याकडे ऋतू बदलले कि rules बदलतात .
आधी wardrobe बदलायचा , उन्हाळ्यात जे cotton चे ड्रेस व साड्या स्टयलिश वाटायच्या ते आता अगदी मान टाकल्यागत होऊन जातात , personality अगदी डाउन होते .
सिल्कला तर हातंच लावायचा नाही , भिजले तर गेले .
आता फक्त सिन्थेटिक , खराब होत नाहीत आणि वIळतात पण पटपट .
ते सदा जीन्स घालून बसणारे काय करतील , भिजली तर दिवस दिवस वIळत नाही . ते एक dryer मिळतं वेगळं , ते वॉशिंग मशीन बरोबर येतं ते नाही , वेगळं मिळतं . मस्त कोरडे होऊन येतात कपडे .
आम्ही सिंगापूरला गेलो होतो , तिथे वर्षभर कधीही पाऊस पडतो . तिथे ते थ्री फोर्थ्स पँट्स , pedal pushers घालतात , . प्रॅक्टिकल फॅशन . नऊवारी साड्या पण adjustable असतात
आता आहारात बदल करायला हवा . आंबे बंद ,केळ्याचे शिकरण चालू . पावसाळी आंबे असतात .
पालेभाज्या बंद , वर लटकणाऱ्या भाज्या चालू , दोडकी , वांगी , पडवळ etc
श्रIवणात ती कोवळी कोवळी रताळी येतात , फार छान लागतात , कीस फार छान होतो मऊमऊ .
Looking forward to enjoying पावसाळा !!!
No comments:
Post a Comment