Tuesday, July 18, 2017

एकदा husband ला म्हटलं चल तुला नवीन शर्ट घेऊ . तो as usual "कशाला ? काही नको " असं म्हणाला . मलाच हौस म्हटलं चल ठाण्याला जाऊ ,एवढे mall झालेत चल .
By the way --ठाणे माझे माहेर --आणि जगातले बेस्ट शहर --कारण एक तर ते माझे माहेर आहे , आता तिथे कोणी नाही पण अजूनही मला ठाण्याला जायचं म्हटलं कि प्रचंड आनंद होतो .
ठाण्याचा layout सोपा आहे आणि तिथे कामं पटापट होतात .
...
तर मग आम्ही mall मध्ये branded शर्ट घ्यायला गेलो . तर तिथला एकही शर्ट त्याला होईना , मोठी size फारच सैल , लहान size फारच घट्ट . बरंच हिंडलो पण सगळीकडे तेच .
त्याच्या भाषेत तो 'तुंदिलतनू ' आहे , म्हणजे ढेरीवाला . ती ढेरी काही आता जाणार नाही . आणि त्या mall मधले salesman वयाने कमी ,एका पेक्षा एक बारीक बारीक , नुसती हाडं हाडं , ते अश्या विचित्र नजरेने बघायचे .
आमचा गडी हिरमुसला , थोडा फुगून बसला . आता काय करायचं ?
मी आणलं होतं मग आता ?
मग म्हटलं थांब आपण माझ्या ठाण्यात जाऊ . आम्ही नौपाड्याला गेलो . तिथे गोखले रोड , राममारुती रोड वर जुनी readymade ची दुकाने आहेत तिकडे जाऊ .
मग अशाच एका दुकानात गेलो .कुणीच नव्हतं ,आम्हीच .
Salesman वयाने मोठा होता .
त्याने अंदाज घेतला , AC लावलं , थंड मागवलं , बसायला दिलं (Mall मधे बसायला जागा नसते )
मग त्याने एक एक शर्ट दाखवायला सुरुवात केली . अहा !, काय variety होती . आणि सगळे बरोब्बर मापाचे . मस्त designer ,fitting ला perfect .
मी विचारलं तुमच्याकडे कसे काय , mall मधे आजिबात मिळाले नाहीत . तो म्हणाला तुमच्याकडे बघूनच मला कळले कि तुम्ही तिकडून आलात . आम्ही हे खास आपल्या लोकांची मापं असतात तसे बनवून घेतलेत .
Customerला समजून घेऊन service देणं आणि आम्ही करतो तेच बरोबर असं म्हणून आपले products माथी मारणं हे दोन्ही बघितलं .
हे जुने दुकानदार फार हुशार आहेत , उगाच नाही एवढे mall झाले तरी त्यांना टक्कर देत उभे आहेत.
आमचे काम झाले , आमचा गडी खुश झाला . आणि मी पण ठाण्यासारखे जगात शहरच नाही हे पुन्हा पुन्हा म्हणायला मोकळी झाले .

No comments:

Post a Comment