Thursday, July 13, 2017

काल एक पेशंट येऊन माझ्याशी बरीच भांडून गेली .जुनी पेशंट आहे ५०+. ७-८ महिन्यांनी आली होती.
आली तीच आक्रमक " मला असं सारखं सारखं का होतं ?"
" काय होतं?"
"सारखं पोट बिघडतं , माझ्या सगळ्या टेस्ट करा "...
सारखं म्हणजे कधीपासून ?
झाला १ महिना
बऱ्याच दिवसांनी आलात मग एवढे दिवस बऱ्या होतात का ?
हो बरी होते .
मग आता काय झालं एवढं एक महिन्यात ?
अहो हा पावसाळा सुरू झाल्यापासून दर रविवारी आम्ही मॉन्सून पिकनिनला गेलो , तर माझं जरा वेडं वाकडं खाणं झालंय आणि २ दिवसांपूर्वी कटलेट केले होते ते खूपच खाल्ले आणि तेंव्हा पासून पोट टम्म झालंय .
अहो अपचन झालंय , Infection झालं असेल , treatment केल्यावर होईल बरं .
नाही माझ्या सगळ्या टेस्ट करा , मला असं का होतं .
अहो कितीतरी वेळा टेस्ट केल्यात , सगळ्या नॉर्मल येतात , आणि नॉर्मल आल्या की परत तुम्ही येऊन माझ्याशी भांडता , सगळ्या टेस्ट नॉर्मल असून मी का आजारी पडते .

मग आता मी काय करू ?
हे बघा तुम्ही आता ५०+ आहेत , या वयात पचनशक्ती कमी होते , तर तब्येतीला झेपेल एव्हढंच खा .
मग मी काय मजा करायची नाही का ? काही खायचं नाही का ?
अहो मजा करा पण झेपेल एवढीच करा , तुम्ही नेहेमी जसं खाता पिता तसं सांभाळत करा मग बऱ्या राहाल . काहीकाही जणांना उलटं सुलटं वागलं तरी त्रास होत नाही काही जणांना होतो . प्रत्येकांनी आपापलं सांभाळावं .
मग मी खाऊ तरी काय ?
पुन्हा तेच , आता ५०+ बाईला काय खावं काय नको हा सल्ला द्यायचा म्हणजे कठीण आहे .

मला त्या बाईचं दुःख कळलं , तिला कसंही वागायचं आहे , पथ्य पाळायचं नाही आणि आजारी पण पडायचं नाही आणि आपल्याच चुकीमुळे आपण आजारी पडलो हे मान्य करायचं नाहीये आणि सगळं ठपका डॉक्टरांवर टाकायचाय .
ऐसा नही होता है । फिर डाक्टर के चक्कर लगIने पडते है ।

मी एक पाहिलं आहे , जे लोक नियमितपणे वIरीलI जातात ते असे आजारी पडत नाहीत , आमच्या ओळखीचे असे लोक आहेत . त्यांचं endurance , immunity चांगली असते आणि ते सांभाळून जगतात .

No comments:

Post a Comment