मी पण रखुमाई :---
बऱ्याच बायकांना आपल्या नवऱ्याचे मित्र , त्याचा गोतावळा , सारखी त्याच्या भोवती असलेल्या लोकांचं रागच येतो . ह्या लोकांमुळे नवऱ्याशी चार सुख दुःखाच्या गोष्टी पण करता येत नाही , सारखी माणसं , सारखी माणसं .
ज्या लोकांचा लोकसंग्रह मोठा आहे , त्यांच्या बायकांचे हेच म्हणणे असेल .
मग ती बायको नवऱ्याला म्हणते , "काय तुमची हि माणसं , सगळे दांभिक , कामापुरतेच येतात , एकपण चांगला नाही , उपयोग करून घेतात , तुमचं नाव खराब करतात . नका उभं करू त्यांना , नाहीतर आपणंच जाऊ दुसरीकडे , नाहीतर मी चालले दुसरीकडे .
विठुराया ऐकून घेतो , रुसलेल्या रखुमाईच्या समजूत लढतो , तरीपण ती ऐकत नाही , दुसरीकडे जाऊन उभी राहते .
पण विठ्ठल आपल्या लोकांना , गोतावळ्याला , भक्तांना सोडत नाही . तिथेच उभा आहे . अत्तावीस युगे हेच चालू आहे .
सगळेच विठ्ठल , सगळ्याच रखुमाई !!
हे एक गोड गाणे , रखुमाईच्या कैफियत मांडणारे

No comments:
Post a Comment