Friday, July 7, 2017

त्या तुषार कपूरनी चाळीशी आल्यावर खटपट्या लटपट्या करून एकI मुलाला जन्म दिलाय .ते पण लग्न न करता . (Surrogate mother)

आपली पारंपरिक पद्धत म्हणजे योग्य त्या वयात लग्न करायचं , पटपट १-२ मुले झाली पाहिजेत . झालं . आता करा संसार .

ही पद्धत आता कालबाह्य झाली असे वाटते .

...



आधी वेळेत कुणी लग्न करत नाही , मग इतक्यात बाळ नको असे करत बसतात , career करायचं असतं दोघांनाही , किंवा पैसे जमवायचे असतात किंवा घर घ्यायचं असतं किंवा इतक्यात अडकायचं नसतं . Various reasons . किंवा लग्न टिकत पण नाहीत .

हल्ली झालं तर एक होतं आणि ते पण आकाशपाताळ एक करून .

आता कायद्याने पण single parent ला मुलाला जन्म द्यायचा, दत्तक घायचा हक्क दिला आहे . लग्न करायला हवे असे नाही.

पण मी एक गंमत पहिली आहे पस्तिशी चाळीशी आली की आपल्याला एक छोटं कुणीतरी हवं ही भावना एकदम तीव्र होते , एक्दम जबरदस्त बाळाची भूकच लागते , पण तोपर्यंत निसर्ग कधीकधी साथ देत नाही . मग एक्दम जIग आल्यासारखं करतात आणि treatment साठी चकरा सुरू होतात . आणि तेंव्हा career गेलं उडत असं पण होतं .

दुसरं म्हणजे ज्यांना वेळेवर अगदी तरुणपणी १-२ मुलं झालेली असतात त्यांना पण पस्तिशी आली की अजून एक बाळ असावंस वाटतं काहीजणांना आपोआप होतं पण . पण आधीची १०-१२ वर्षाची मुलं असताना लाज वाटते .

आमच्याकडे एकदा अशी पेशंट डिलिव्हर झाली होती , मोठी दोन मुलं होती आणि आता एक छोटं बाळ . त्या मुलांना एवढा आनंद झाला होता आणि त्यांना बाळासाठी एक मोठ्ठं खेळणं आणलं . बाळाकडे बघत बसायचे शाळेला दांडी मारून . मजा यायची बघायला .

पस्तिशी नंतर मातृत्व किंवा वडील होणं जास्त एंजॉय करता येतं कारण थोडी maturity आलेली असते , आर्थिक स्टॅबिलिटी असते . व्यावहारिक दृष्ट्या उशीर झालेला असतो पण आता काळ बदलला आहे .

माझी आई MD (Gynac ) होती . तिचे असे खूप पेशंट असायचे . ती म्हणायची ती आधी झालेली मुलं मोठी कधी होतात कळत पण नाही, ते शिक्षणासाठी म्हणून निघून जातात आणि हे छोटं आपल्याजवळ राहतं . आणि हे मोठं होईपर्यंत मोठ्या मुलांना मुलं झालेली असतात , त्यातलं एक आपल्याजवळ आणून ठेवायचं सोबतीला .

हल्ली खूप जोडपी अशी दिसतात की त्यांची सगळी मुलं परदेशात आहेत आणि दोघं एकटे पडलेत , अजून एक उशिरा झालेलं बाळ असतं तर करमलं तरी असतं .

आता population , महागाई , शिक्षण ,नोकरी, ट्राफिक असे अनेक व्याप आहेत पण प्रत्येकानी आपापला निर्णय घ्यायचाय.

आपल्या कंट्री मध्ये काही म्हणा सगळ्यात मोठ्ठI आनंद बाळ झाल्याचाच आहे .

No comments:

Post a Comment