Monday, July 31, 2017

Lipstick under my burkha :--
हा सिनेमा मी पहिला नाही पण माझी एक मैत्रीण बघून आली आणि तावातावाने म्हणत होती कि स्त्रियांना पण extra marital affairs करायचा अधिकार असला पाहिजे , पुरुष करतात तर आम्ही का नाही ?
ह्यावर बराच उहापोह झाला .....
म्हटलं करायचं असेल तर करा पण त्यासाठी हौस पाहिजे , ताकत हवी , efficiency आणि memory चांगली पाहिजे . येरागबाळ्याचे काम नाही .
आम्ही एक हा extramarital प्रकार जवळून पहिला होता , त्या हौशी सद्गृहस्थाची जाम पळापळ व्हायची , त्यात तो धांदरट आणि विसरभोळा . चुकीच्या ठिकाणी चुकीचे बोलायचा , कुणाला काय सांगितले आहे ते लक्षात राहायचे नाही , मग बायको पकडायची आणि मग आकांडतांडव .
म्हणजे असे आपल्या चहा पिणाऱ्या बायकोला परवा तू कॉफी छान केली होतीस असे म्हणायचे नाही . वगैरे वगैरे . पुन्हा लक्षात ठेवायचे हिला आज ४ वाजता भेटायचे आहे , तिला उद्या फिरायला न्यायचे आहे वगैरे वगैरे .
पुन्हा दोन घरोबे केल्याने खर्च वाढतात त्यामुळे उत्पन्न वाढवावे लागते , तो वाढीव खर्च tax deductible नाही . ट्रॅफिक पण खूप वाढले आहे , कुणाला ४ वाजता येतो म्हटले तर पोचायलाच ७ वाजायचे , तोपर्यंत परत यायची वेळ व्हायची
असो !!

आता बायकांचे , पुरुष करतात म्हणून आम्हाला पण extramarital करायचे आहे म्हणजे हे कायदेशीर करायचे का ?
एकनिष्ठता हा एक लग्नसंस्थेचा पॉईंट आहे हे खूप जण विसरलेले दिसतात .
बायकांना लाख हौस असेल affair करायची पण सगळे पुरुष हल्ली भयंकर busy असतात . सक्काळी जातात ते रात्री येतात आणि टूरला म्हणून जातात ते बरेच दिवस येतंच नाहीत . पुन्हा ते सतत परेशान असतात . चेहऱ्यावर सतत कुठलं तर बिल भरायचे आहे , टॅक्स भरायचा आहे , शेर मार्केट पडलंय , काहीतरी सापडत नाहीये . मला कुठलं तरी काम करायचे आहे पण कुठलं ते आठवत नाही असेच चेहरे असतात .
Extramarital करायचं म्हणजे थोडा तरी निवांतपणा हवा कि नको ?
परत त्यांना सारखं कुठंतरी जायचं असतं आणि काही नाही तर ते आधार कार्ड लिंक चालू झालं आहे .
मला वाटतं ही सरकारची आयडिया असेल . लोकांना हा फॉर्म भर , तो फॉर्म भर ह्यातच अडकवून ठेवायचं कि नाही नाही ते सुचायला वेळच मिळतI कामI नये .
नाही म्हणजे कधी कधी कोणाला पाहून दिल धडकतो किंवा आठवण आली कि अंदाज शायराना होतो पण पुढे काय ?
माझ्या एका मैत्रिणीने पण हे केलेच , पण पंचाईत अशी झाली कि तिचा नवरा आणि बॉयफ्रेंड मित्र झालेत . आता ती वैतागली आहे .
म्हणजे असे unforeseen complications होऊ शकतात .

त्यातून ज्यांना हौस असेल आणि झेपणार असेल they can go ahead !!
आपल्या कंट्री मध्ये आधीच एवढा गोंधळ आहे , बायका पक्क्या खुंटी सारख्या संसार पकडून आहेत . त्यांनी पण हे उद्योग सुरु केले तर कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहणार नाही .
************************************************************************************
नवरा म्हणतो " तू सगळ्या गोष्टी अश्या analytical नजरेने नको बघू , काही काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात !!

No comments:

Post a Comment