Saturday, June 24, 2017

Weekend आवी गयु ,बहु सारू लागे छे .

आज मारो गुजरातीमा वात करवIनु मन करे छे .

केम ? मज्जामा छो के नथी ? मज्जामाचं रवानु .

...

झालं माझं गुजराथी संपलं , एवढंच येतं . आमचे बॉस म्हणायचे ' जेवढ्या भाषा शिकता येतील तेवढ्या शिकून घ्या , तेव्हढंच तुम्हाला पेशंटना समजून घेताना फायद्याचं पडेल .

प्रत्येक भागाची demography वेगळी असते , म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक राहतात . कल्याणचे वेगळे , ठाण्याचे वेगळे , पुणे नाशिकचे वेगळे . त्यांची भाषा वेगळी , पद्धती वेगळ्या , जेवण वेगळं . जेवढं समजून घेऊ तेवढं झिरपतI येतं .

गुजराथी पेशंट आले की मी थोडं बोलायची मग त्यांना वाटायचं की यांना गुजराथी येतं मग ते खूप सगळं गुजराथीतून बोलायचे , मग माझी धांदल . मग त्यांना सांगायचं की मला एवढंच येतं , मग मोडक्या तोडक्या हिंदी मराठीतून चालू ठेवायचं .

कल्याण जुनं गाव आहे , म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळIपासूनचे म्हणजे आत्ता पर्यंत बघा किती पिढ्या झाल्या असतील ?

वेगवेगळ्या आळ्या आहेत , वेगवेगळा समाजाचे लोक राहतात . कासार, कुंभार ,चांभार , ब्राह्मण , मारवाडी ,मुसलमान , तेली ,वाणी , आगरी ,अजून खूप आहेत . सगळे आणि परंपरागत व्यवसाय करतात .

South Indian , त्यात तामिळ वेगळे आणि केरळी वेगळे , ओळखता आले पाहिजेत , ह्याचं त्याला बोलून चालत नाही . आता बंगाली , ओरिसा हे पण खूप आले आहेत . NRI पण एक वेगळी जमIत आहे .

आमचे दुबई ला नातेवाईक होते , त्यांची मुलं छोटी होती , काही झालं की तिथल्या डॉक्टरकडे घेऊन जायचे . तो डॉक्टर तर सतत हैराण असायचा कारण दुबईमध्ये तर सगळ्या जगातून लोक एकत्र आलेले , त्यांना समजून घेताघेता परेशान झालेला असायचा .

आता कल्याण बदलत चाललंय , नवीन भागात तर एक्दम आधुनिक झालंय , हेच कल्याण का म्हणून ओळखता येणार नाही.

No comments:

Post a Comment