Monday, July 24, 2017

जे तिरुपतीला जातात ते येताना कोल्हापूरला महालक्ष्मी चे दर्शन घेतात , असा रिवाज आहे हे आजच कळले . ह्या मागे काही कथा आहे का ?
From the wall of Vaibhav Narayana Joshi:--
श्री तिरुपती बालाजी दक्षिणेच एक मोठ देवस्थान .
हे बालाजी अर्थात विष्णू . हे या पर्वतावर प्रकट झाले . त्यांना श्री पद्मावती आवडल्या आणी त्यांच्याशी विवाह करणे ठरले . पण श्री विष्णूंची पहिली पत्नी श्री लक्ष्मी मातेची परवानगी आवश्यक होती . ती प्रथमतः मिळाली नाही व देवी रुसून कोल्हापूर येथे येऊन राहिल्या . देवाने त...्यांना शोधले तर त्या घोडीच्या रुपात होत्या . मग देवानेही घोड्याचे रुप घेतले व त्यांचा रुसवा काढला आणि तुझा मान कायम राहिल सांगितले . तसेच विवाहा साठी कर्ज मागितले . देवीने कुबेरा आपल्या पुत्राला आज्ञा केली व हा विवाह पार पडला . म्हणून आजही बालाजीहून कोल्हापूर येथे दरवर्षी साडीचोळी व सौभाग्य साज पाठवतात यावेळी किरणोत्सवही असतो . नारायण लक्ष्मींना या दिवशी भेटतात . आणि देवांनी दिलेल्या आशीर्वादाने बालाजी यात्रा कोल्हापूर चे दर्शन घेतल्या शिवाय पूर्ण होत नाही !
*
*
बालाजी ने महालक्ष्मी शी अतिशय थाटामाटात लग्न केले, लग्नाच्या वेळी त्याने अफाट खर्च करण्यासाठी कुबेराकडुन कर्ज घेतले. व्यंकटेशाच्या कोणत्याही मंदिरात हुंडी असते, भाविक त्या हुंडी मध्ये दान टाकतात ते कुबेराचे कर्ज फेडण्यासाठी असते अशी अख्यायिका आहे.
*
*
नवरात्रीत तिरुपतीचा बालाजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साडी पण पाठवतो.
*
*
बालाजी च्या दोन पत्नी एक कोल्हापुर ची महालक्ष्मी आणि दुसरी पद्मावती जी की तिरुपति ला आहे. बालाजी तिरूमलाला आहे. महालक्ष्मी रूसुन कोल्हापुर येथे येवुन बसलीै. त्यामुळे तिरूमला, तिरुपति आणि कोल्हापुर अशी ती यात्रा पुर्ण होते. कोल्हापुर तिरुपति अशी एक एक्सप्रेस ट्रेन आहे तिचे नांव पण हरीप्रिया एक्सप्रेस असे आहे.

No comments:

Post a Comment