Sunday, July 23, 2017

रात्रभर बदबद बदबद पाऊस पडतोय .
आषाढातला हा शेवटचा पाऊस . आता श्रावण लागेल , मग " क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे " तसा पाऊस सुरु होईल .
असे मला वाटते .
...
पावसाचा जोर कमी होईल , रूप बदलेल .
आषाढातला पाऊस हा deficit compensate करणारा असतो आणि श्रावणातला maintenance चा असतो .
असे मला वाटते .
श्रावण मासी हर्ष मानसी
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
वरति बघता इंद धनुचा गोफ दुहेरि विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळिच ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पखं पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शु्द्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

No comments:

Post a Comment