Saturday, June 10, 2017

आता ज्या ज्या परीक्षा त्यात बहुतेक ठिकाणी मुली पुढे आहेत असे दिसते . Overall performance मध्ये पण मुलींच  पुढे आहेत . चांगले आहे . 

पण मुले मागे का आहेत ? त्यांना हा अभ्यास  आवडत नाही का ? मुलं जास्त हूड आणि दांडगी असतात , त्यांना अभ्यास  सोडून बाकी गोष्टीत इंटरेस्ट असतो . आई वडिलांना लाख वाटुदे कि पोराने अभ्यास करावा पण तो टिकून तर राहिला पाहिजे , सारखा पळून गेला तर कसे ?

मला वाटतं आजकालचं खरं जग आणि ह्यांचा अभ्यास ह्याचा काही ताळमेळ नाही . त्यांची आवड कशात आहे हे बघून शिकवावे , मग करतील . 

आजकाल मोबाईल , ते वेगवेगळे apps , hitech सिनेमे हे सगळं एकीकडे आणि तो रुक्ष अभ्यास दुसरीकडे . 

एकीकडे असे दिसते कि भाषा आणि गणितात पण गोंधळच आहे . 

मुलांच्या अंगात जाम शक्ती असते , त्यांना एकाजागी बसून राहायला पण आवडत नाही , मग अभ्यास तर दूरच , मग आपलं कसं तरी पास होऊन  जे आवडत नाही ते करत बसावं लागतं ,आणि मार्क कमी म्हणून आईवडील सतत  टेन्शन मध्ये आणि मुलाला वेडंवाकडं बोलणार . 

अशाने काही येत नसलेले उंडगे पोरं तयार होतील . पण ह्यांच्या आवडीचे काही मिळाले तर छान मार्गी लागतील 


ज्यांचा academic ओढा आहे त्यांना हा अभ्यासक्रम चांगला आहे , पण ज्यांना नाहीये त्यांना नुसतं हिडीसफिडीस करून कसं चालेल . त्यांनी आपले ठोकरे खात जगायचं हे काही बरोबर नाही . 

ते skill development होतं त्याचं काय झालं ?


















No comments:

Post a Comment