Wednesday, June 7, 2017

27-8-16

आमच्याकडे एखादी तरुण स्त्री येते , आधीचे एक मूल आहे परत प्रेग्नन्ट आहे आणि आता नको . " "अहो असू द्या कि , तुमच्या छोटुशी खेळायला , भावंडं हवंच " असं म्हटलं कि जीभ बाहेर काढतात नाहीतर डोळे वर फिरवतात  आणि म्हणतात " नकक्को आजिबात नक्को , हे आहे तेच सांभाळता येत नाही , दुसरं कुठे ? आता नक्को कधीच नक्को "

खूपच जोरदार reaction असते .

आजकाल मुली असं का म्हणत आहेत ?

१) कामं पडतात , अशी कामं ज्यांची सवय नसते , अडकल्या सारखं होतं , कुणी मदत करत नाही , बाळ सांभाळायला कुणी येत नाही , बाळासाठी आर्थिक उत्पन्न बुडतं , खर्च वाढतात , सारखी काटकसर करावी लागते , मन मारावं लागतं .

बाळंतपण म्हणजे एक अवडंबर झाले आहे , प्रचंड खर्च पण आहे

२) घरातले अलगद अंग काढून घेतात , तुझे मूल आहे तूच सांभाळ , आमचे हे करून झालंय , पुन्हा अडकायचे नाही त्यात.

मूल  कसे सांभाळायचे माहित नसते , चुका होतात , मग मूल वारंवार आजारी पडते , व्याप होतो


३) स्वयंपाक तूच कर , घर आवर , मुलांना शाळेत ने आण कर , अभ्यास घे  आणि आम्ही तुला नावं ठेवतो .

४)बरोब्बर pregnancy च्या वेळेला सासरच्या लोकांशी वाद होतात आणि सगळी pregnancy टेन्शन मध्ये जाते . डिलिव्हरी झाल्यावर तर सासर- माहेरच्या मध्ये जबरी पॉलिटिक्स होतं . खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते , मानसिक स्वास्थ्य बिघडते .

५) कधी घरकाम केलेले नाही , professional शिक्षण घेण्यात आयुष्य गेलं अशा मुलींकडून गृहकृत्य अपेक्षिली जातात , पुन्हा पैसे कमवावेत किंवा माहेरून आणावेत ही  अपेक्षा पण असते .

६) एका मुलाच्या वेळेला हा अनुभव आलेली स्त्री पुन्हा त्या वाटेलI जाईल का ? 

जरा बाबा लोकांनी मुलं सांभाळायला हातभार लावला तर आईलोक दुसरा chance घ्यायला हो म्हणतील .

बाजारातून सामान आणून देणे , मुलांना शाळेत ने आण करणे आईला नोकरी करायची असेल तर जवळच मुलं सांभाळायची व्यवस्था असणे .

असे मदत करणारे पुढे आले तरच भावंडे जन्माला येतील .

Pregnancy आणि बाळंतपणात सांभाळून घेणे , शारीरिक आणि मानसिक आरोग्य छान ठेवणे , तरच होणारी संतती धष्टपुष्ठ आणि हुशार निघेल.  नाहीतर जन्माला घालायचं म्हणून घालायचं आणि सदा आजारी आणि अशक्त मूल जगात आणायचं याला काही अर्थ नाही .

आजकालच्या मुलींमध्ये कितीही fault असले तरी जनन क्षमता त्यांच्यातच असते , मुलं हवी असतील तर त्यांना समजून सांभाळून घ्यावेच लागेल .






No comments:

Post a Comment