Traffic management company :---
आपल्याकडे ट्रॅफिक मॅनॅजमेण्ट म्हणजे लोकंच जे काही मनाने करतील ते . आमच्याकडे तर हे चित्र नेहेमीच दिसतं . पोलीस असतात पण ते नसले कि परत तसेच .
ज्या गाड्यातून सामान उतरवायचे असेल त्या गाड्या दुपारी १-४ या दरम्यान याव्यात . कितीतरी दुकानासमोर निवांतपणे मोठी ट्र्क उभी करून सामान उतरवत असतात , गॅसचा सिलेंडर , furniture हलवणे , वाळू , सिमेंटच्या गोणी , हे लोक रस्त्यावर उभे राहिले कि झालाच पाहिजे ट्रॅफिक जॅम . त्यांनी गर्दीच्या वेळेत येऊ नये .
साधं रिक्षातून उतरताना , थांबल्यावर रिक्षा वाल्याला विचारणार किती झाले , मग पर्स उघडणार , मग मोठी नोट देणार , मग सुटते घेणार , एवढं होईपर्यंत मागे हे ट्राफिक .
आधीच विचारून , तेव्हडे पैसे तयार ठेवावे .
आज एक बंगलोर रिटर्न माणूस भेटला होता , म्हणाला तिथले रस्ते अरुंद आणि सिटी बस सगळ्या व्होल्वो , १० फुटाचा रस्ता , ही बस स्टॉप वर थांबली कि सगळंI ट्रॅफिक जॅम . छोट्या मिनी बसेस हव्या.
एवढा शिक्षणाच्या मागे धावणारा देश , प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवू शकत नाही ?
No comments:
Post a Comment