Saturday, June 10, 2017

आम्ही एकदा मुरबाडच्या रस्त्यावर गेलो होतो . एका मळ्यात एक शेतकरी काम करताना दिसला . सहज गेलो तर बऱ्याच भाज्या होत्या , म्हटलं जरा देता का , तर त्याला एवढा आनंद झाला , त्यांना मस्त वांगी , पालक, घेवडा , दुधी खूपच भाजी दिली , विचारलं किती पैसे तर लाजला , मग म्हणाला द्या समजून , मग १०० रु दिले तर म्हणाला एवढे नाही २० द्या . बळंबळंच त्याच्या हातावर ठेवले .

आमच्या भाजीमार्केट मध्ये भाजीचे काहींच्या काही घेतले असते .

आम शेतकरी भोळसट वाटतात , त्यांना पैशाचे व्यवहार कळत नाहीत . ते आपण आणि आपली शेती यातच रमलेले असतात . त्यांच्या भोळसटपणाचा फायदा खूप जण घेतात . आणि दुसरं म्हणजे काही व्यवहार करताना कोणाला सांगत नाहीत , आणि फसले गेले कि काय करावं सुचत नाही , कोणाला विचारावं कळत नाही .

कोकणातला शेतकरी व्यवहाराला पक्का आहे , तो नुकसानीत जाणारच नाही आणि वेडावाकडा खर्च पण करणार नाही .

या निमित्ताने शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम सोडवणारी आपापल्या भागानुसार कमिटी करता येईल , त्यांच्याकडे पीडित माणूस जाऊ शकेल .

शेतकऱ्यांसाठी फंड स्थापन करता येईल , लोक देईल पैसे पण त्यात लांडीलबाडी झाली परत लोकांचा विश्वास उडतो .

हे शेतकऱ्यांचे नेते शेतकरी नुकसानीत जाऊ नये म्हणून दुसरे longterm उपाय सुचवताना दिसत नाहीत .


No comments:

Post a Comment