18-11-16
I came across a nice line " India is rebooting " .
Somewhere I have begun to feel that people are enjoying this.
खूप वर्ष आपलं तेच तेच चाललं होतं , तेच ते सणवार , तीच तीच जातीवरून भांडणं , सगळं एकदम बंद .
Changing scenario :---
ज्या लोकांना पर्स मध्ये नोटांची गड्डी , इकडे तिकडे १-२ लाख आहेत , बाजूला एकI बॉक्स (सॉरी खोका ) मध्ये कोटी आहेत , याची सवय होती आतI त्यांच्या घरातले dialogue ------
" अगं माझ्याकडे ५६०/- आहेत , तुझ्याकडे किती आहेत ?"
" माझ्याकडे ३२०/- आहेत "
"तुला हवेत का , हे घे १००/-"
" अहो मला काय करायचे आहेत , तुम्हीच ठेवा . बाहेर जIल तर येतIना भाजी आणा १/२ किलो , आणि चिमणलाल कडून आणा , आपलं अकाउंट आहे त्याच्याकडे "
" आपल्या सखूबाईला ५०००/- advance दिला होता नं , तिने सांगितलं आहे ५००/-चा EMI करा "
" काल चप्पल तुटली म्हणून चांभाराकडे गेले , त्याने २०/- मागितले , तर माझ्याकडे नव्हते , मी त्याला म्हटलं , सकाळीच शिरा केला आहे , देऊ का ? , आर चालेल म्हणाला "
आमचे डॉक्टर लोक जे नोटांची पुडकी घेऊन घरी येत होते ते आता काय वाट्टेल ते घेऊन घरी येतील .
तांदूळ , तेलाचा डब्बा . एखाद्या काकूने दिलेले बेसनाचे लाडू , Tata sky recharge coupon. एखाद्या सुग्रण मावशींकडून १० दिवस रात्रीचा डब्बा पाठवायचे वचन .
परवा मलाच एका यवन ( म्हणजे मुसलमान ) पेशंटने , पैसI नाही है , ये रखो हमारे बेकरी के प्रॉडक्ट्स है म्हणून एक पिशवी दिली . त्यात सुपर quality चे , खारी , टोस्ट आणि वेगवेगळी नानकटाई होती . माझी खूप दिवसाची ब्रेकफास्ट आणि midnight snack ची सोय झाली .
" अगं परवा आपण अँपेंडिक्सचे ऑपेरेशन केलं ना त्याने इंदोरचे तिकिटं आणि हॉटेल बुकिंग दिलं आहे . तो म्हणाला मीच जाणार होतो , तर तुम्ही ऑपेरेशन केलंत , आता तुम्ही जा "
" अहो इंदोरला जाऊन काय करणार ? कुणी ओळखीचं पण नाहीये "
" काय करायचंय ओळखीचं , आपणच जाऊ , नाहीतर आपण कशाला गेलो असतो ? आता हवा पण छान आहे , चल शहर बघू , तिथली खाऊ गल्ली प्रसिद्ध आहे तिथे जाऊ ,चोरल नदीची वळणं पाहू , बापूभैय्या देवासकरांचा वाडा आहे का पाहू , तुला मस्त इंदुरी साड्या घेऊ !! चल "
अगं चल !!
( पुल देशपांडे यांचे 'तुझे आहे तुजपाशी ' वाचले असेल तरच काही references कळतील )
No comments:
Post a Comment