Thursday, June 29, 2017

एका young man चं ( वय १७-१८) confession :---

"काकू (म्हणजे मी ) मला नं माझ्या GF पेक्षा माझा mobile आवडतो . , मी सांगितलेलं ऐकतो , माझ्यावर रुसत नाही , हट्ट करत नाही ,तो मला त्रास देत नाही , रडत नाही .... "

"अरेच्चा काय झालं ? गडबड झाली का ?"

...

हो आणि विषण्ण पणे हसला ( हा विषण्ण शब्द मागे मराठी कथा कादंबऱ्यात असायचा , हल्ली कोणी वापरात नाही ) त्याचं हसू बघून वाटलं " दिलं को ठेंस बहुत जोरकी लगी होगी '

आता समजूत काय काढणार ?

म्हटलं " होता है , होता है !!" हा तर पहिलाच अनुभव दिसतोय , और ३-४ दफा हो जायेगा तो दिल मजबूत हो जायेगा , उठसूट टुटेगा नाही .

ऐ मेरे दोस्त ,अब खुशी का ढुंढो बहाना , ये गम के फसIने , इष्क के अफसाने तो चलते रहेंगे !!

I take a lot of community lectures in various mahila-mandals with only a blackboard and chalk.




Saturday, June 24, 2017

Weekend आवी गयु ,बहु सारू लागे छे .

आज मारो गुजरातीमा वात करवIनु मन करे छे .

केम ? मज्जामा छो के नथी ? मज्जामाचं रवानु .

...

झालं माझं गुजराथी संपलं , एवढंच येतं . आमचे बॉस म्हणायचे ' जेवढ्या भाषा शिकता येतील तेवढ्या शिकून घ्या , तेव्हढंच तुम्हाला पेशंटना समजून घेताना फायद्याचं पडेल .

प्रत्येक भागाची demography वेगळी असते , म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक राहतात . कल्याणचे वेगळे , ठाण्याचे वेगळे , पुणे नाशिकचे वेगळे . त्यांची भाषा वेगळी , पद्धती वेगळ्या , जेवण वेगळं . जेवढं समजून घेऊ तेवढं झिरपतI येतं .

गुजराथी पेशंट आले की मी थोडं बोलायची मग त्यांना वाटायचं की यांना गुजराथी येतं मग ते खूप सगळं गुजराथीतून बोलायचे , मग माझी धांदल . मग त्यांना सांगायचं की मला एवढंच येतं , मग मोडक्या तोडक्या हिंदी मराठीतून चालू ठेवायचं .

कल्याण जुनं गाव आहे , म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळIपासूनचे म्हणजे आत्ता पर्यंत बघा किती पिढ्या झाल्या असतील ?

वेगवेगळ्या आळ्या आहेत , वेगवेगळा समाजाचे लोक राहतात . कासार, कुंभार ,चांभार , ब्राह्मण , मारवाडी ,मुसलमान , तेली ,वाणी , आगरी ,अजून खूप आहेत . सगळे आणि परंपरागत व्यवसाय करतात .

South Indian , त्यात तामिळ वेगळे आणि केरळी वेगळे , ओळखता आले पाहिजेत , ह्याचं त्याला बोलून चालत नाही . आता बंगाली , ओरिसा हे पण खूप आले आहेत . NRI पण एक वेगळी जमIत आहे .

आमचे दुबई ला नातेवाईक होते , त्यांची मुलं छोटी होती , काही झालं की तिथल्या डॉक्टरकडे घेऊन जायचे . तो डॉक्टर तर सतत हैराण असायचा कारण दुबईमध्ये तर सगळ्या जगातून लोक एकत्र आलेले , त्यांना समजून घेताघेता परेशान झालेला असायचा .

आता कल्याण बदलत चाललंय , नवीन भागात तर एक्दम आधुनिक झालंय , हेच कल्याण का म्हणून ओळखता येणार नाही.

Sunday, June 18, 2017

अजूनही बऱ्याच घरांमध्ये चार पिढ्या , पांच पिढ्या दिसतात . पण असं एकत्र बसून फोटो काढणं होत नाही .
छान वाटतं बघायला .

19-6-16

'उडता पंजाब' -- review वाचले, आता बघावा का नाही ?
कधी वाटतं खूपच समृद्धी आली , सगळं भरपूर असलं , पिढीजाद वैभव असलं कि माणसाला फक्त बिघडून दाखवायचंच बाकी राहतं का ? Aim in life काहीच नसतो . सगळं तर असतं .
म्हणजे थोडी कडकी , थोडी ओढाताण . थोडं डोक्यावर कर्ज , कष्ट , दगदग , थोडं tension असं असलं तरच माणसं track वर राहतील का ?
...
मी एक वाक्य ऐकलं होतं "जास्त झालं कि उतू जातं " . पैसे के पीछे पडी दुनिया आपल्या मुलांना करायला काहीच ठेवत नाहीये. वIयI जाऊन दाखवणं हा एकंच option त्यांच्यापुढे आहे का ?

Tuesday, June 13, 2017

From Makarand Madanrao Kulkarni :-


पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर फिर्यादीला एफआय आरची प्रत लगेचच देणे कायद्याने बंधनकारक आहे.मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ती प्रत देणे कधीकधी कठीण जाते.अशावेळी तक्रारदाराला एफआयआरचा फोटो मोबाईलमध्ये घेण्याची मुभा देण्यात आली आहे.


ज़िंदगी में प्यार का पौधा लगाने से पहले ज़मीन परख लेना दोस्तों..
हर एक मिटटी की फितरत में वफ़ा नही होती..
*
*...
*
तलाश सिर्फ सुकून की होती हैं...

नाम रिश्ते का चाहें कुछ भी हो...
*
*
*Copied from here and there.....

आमचं लग्न झालं तेंव्हा आमच्या सासूबाई ज्या वयाच्या होत्या त्या वयाची मी आता आहे . ५४ .

त्या एकदम सुगरण होत्या , अन्नपूर्णा , काहीही केलं तरी चविष्ट व्हायचं . त्यांच्या हाताखाली काम करून मी पण बरंच शिकले . दम पण खूप भरायच्या , पण माझी आईच मला एवढी फायरिंग द्यायची कि ह्यांचं दम भरणं मला नॉर्मल वाटायचं . It's ok type . पुन्हा मेडीकलला बोलणी खाण्याला अंतच नसIयचा त्यामुळे कधी मनावरच घेतलं नाही .

हल्ली जरI बोललं कि काय राग येतो लोकांना , फारच झालंय मानपान .

...

तर असो !

तर मी साखरांबा केलाय . सासूबाई कैरीचा कीस काढून त्याचI साखरांबा करायच्या आणि त्यात वेलदोडे घालायचे आणि फोडी करून गुळांबा करायच्या त्यात लवंग घालायची .

मी एकाच केलाय दीड किलोचा ,साखर पण घातली आणि गुळ पण घातला , वेलदोडे, लवंग केशर सगळं घातलं, मस्त झालाय .

ह्यात एक tip आहे , कैऱ्या किसून झाल्यावर , साखर , गुळ जे काय घालायचं असेल ते घालून एक-दीड तास तसेच ठेवायचे म्हणजे साखर मुरते नाहीतर कैऱ्या आणि साखर गुळ एकजीव होत नाहीत .

काहीजण एक पाऊस पडल्यावर करतात, काही आधी --Two schools of thought . पाऊस पडल्यावर केला तर म्हणतात जास्त टिकतो पण मला वाटतं कैऱ्यांचा करकरीतपणI कमी होतो आणि पाऊस पडल्यावर चिखलात जाऊन आणायला कंटाळा येतो .

So that's that ......

नवीन मुलींनी पण करायला हरकत नाही , सोप्पा आहे , आधी अर्धा किलोचा करायचा , जमलं तर मग जास्त . डरनेका नही करनेका । .

ह्याच्या मागचं logic असं असेल कि पावसाळ्यात बाहेर जायला जमलं नाही तर घरात जरI चवीसाठी असावं. आता लोणचं पण करणार आहे . हल्ली विकत सगळं मिळतं पण आपण करायची गम्मत वेगळीच .

काल  आमच्या मेडिकल क्लबच्या कार्यक्रमात कल्याणचे  DCP शिंदे साहेब आले होते . 
पोलीस खात्यात बरेच बदल होत आहेत . 
काही पोलीस स्टेशनची  अवस्था अगदी वाईट होती ,त्यांना चांगल्या जागा मिळवून दिल्या आहेत 

पोलिसांना लोकांशी communicate , संवाद साधण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे . 

पोलीस स्टेशन वर कुठल्या  कुठल्या सेवा मिळतात हे फलक लावण्यात आले आहेत . 

कोणी पोलीस स्टेशनला गेले तर एक संपर्क अधिकारी असतो , तो त्यांना योग्य त्या अधिकाऱ्याकडे  पाठवतो . 

पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना एक feedback form  भरून घेतला जातो आणि दुसऱ्या दिवशी डिपार्टमेंट कडून फोन जातो कि तुमचं काम झालं का ? अनुभव कसा होता ?


ह्या साठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबानी पण विशेष कौतुक केलं . 

व्वा !! फार छान . 

असे बदल झाले तर आम जनतेला मोठा दिलासा मिळेल 

मला ते क्रिकेट आजिबात आवडत नाही , आता नाही आवडत . काय करणार ?

ते क्रिकेट म्हणजे ' Waste of time , money and resources for a disproportionately small number of people '

फायदा म्हणजे खूपंच  माणसे एका जागी बसून राहतात आणि पैसा generate होतो . 

एकदा आम्ही  सगळे घरातले टीव्ही समोर बसून match बघत होतो . सासरे तर असे बघायचे मॅच अगदी डोळे घालून , कि आपली पापणी लवली तरी आभाळ कोसळेल  होईल !! हल्ली नवरा तसI  वागतो . 

मुलगा छोटा ३ वर्षाचा  मंIडी घालून बसला होता , बराच वेळ बघितलं बघितलं आणि म्हणाला बॅट बॉल  खेळतायत . 

मी जाम जोरात हसले , सासर्यांना खूप राग आला , म्हटलं छोट्या मुलांच्या तोंडून सत्य बाहेर पडतं . 

तर हे अवडंबर झालेलं आणि स्तोम माजवलेलं क्रिकेट . 

********************************************************************************

मुलींसाठी खेळायला ग्राउंड नाहीत , एक बाग होती कल्याणमध्ये मनोवी गार्डन , तिथे बिल्डिंग झालीय , अशी बागेत बिल्डिंग करतात काय ?

मुलींना खेळायला सुरक्षित जागा नाहीत म्हणून माता त्यांना बस घरात करतात , बसून बसून त्या बोजड होतात , शरीराची योग्य ती वाढ  होत नाही , स्नायू बळकट होत नाहीत , म्हणून मग कामं करताना कंटाळा येतो आणि सगळ्यात शेवटी डेलिव्हरीच्या वेळेला कळI  सोसवत नाहीत आणि देववत नाहीत , प्रत्येक कळेला गगनभेदी किंकाळी फुटते  , मग डॉक्टर सीझर करतात आणि लोक डॉक्टरांच्या नावानेच ठणाणा करतात . 

मुलींसाठी ग्राउंड हवेत , सायकल चालव , पकडापकडी , खोखो , लंगडी असे  खेळ खेळल्या तर हातपाय मोकळे होतात , भूक लागते , शरीर बांधेसूद रहाते  आणि नैसर्गिक फिटनेस राहतो . अभ्यास करायलाच हवा पण शरीराला पण व्यायाम हवा . 

ह्यासाठी townplanning वाल्या लोकांनी विचार करायला हवा , दिसली मोकळी जागा कि देऊन टाक बिल्डरला असे करू नये . पुढच्या पिढीचा पिढीचं पण विचार करावा . 










So  पावसाळा has set in officially , time to move on !!

आपल्याकडे ऋतू बदलले कि rules बदलतात . 

आधी wardrobe बदलायचा , उन्हाळ्यात जे cotton चे ड्रेस व साड्या स्टयलिश वाटायच्या ते आता अगदी मान टाकल्यागत होऊन जातात , personality अगदी डाउन होते . 
सिल्कला तर हातंच  लावायचा नाही , भिजले तर गेले . 
आता फक्त सिन्थेटिक , खराब होत नाहीत आणि वIळतात पण पटपट . 

ते सदा जीन्स घालून बसणारे काय करतील , भिजली तर दिवस  दिवस वIळत नाही . ते एक dryer मिळतं वेगळं , ते वॉशिंग मशीन बरोबर येतं ते नाही , वेगळं मिळतं . मस्त कोरडे होऊन येतात कपडे . 


आम्ही सिंगापूरला गेलो होतो , तिथे वर्षभर कधीही पाऊस पडतो . तिथे ते थ्री फोर्थ्स  पँट्स , pedal pushers घालतात , . प्रॅक्टिकल फॅशन . नऊवारी साड्या पण adjustable असतात 

आता आहारात बदल करायला हवा . आंबे बंद ,केळ्याचे  शिकरण चालू . पावसाळी आंबे असतात . 
पालेभाज्या बंद , वर लटकणाऱ्या भाज्या चालू , दोडकी , वांगी , पडवळ etc 

श्रIवणात  ती कोवळी कोवळी रताळी येतात , फार छान लागतात , कीस फार छान होतो मऊमऊ . 

Looking forward to enjoying पावसाळा !!!

मी '८९ ला प्रॅक्टिस सुरु केली . सुरुवातीचे काही महिने सामसूमच होती मग हळूहळू प्रॅक्टिस वाढू लागली . पैसे जमू लागले . 

मी माझे पैसे  माझ्या पर्स मध्येच ठेवायची , आणि काय व्हायचं कुठे चांगला ड्रेस दिसला कि घे , साडी घे , पर्स घे असं व्हायचं . जमवलेले पैसे काही क्षणात गायब . बरच दिवस हे असं चाललं होतं . मग एकदा म्हटलं हे काही बरोबर नाही , अशाने आपण कफल्लकच राहू . 

कुछ तो करना पडेगा !

बँकेत अकॉउंट काढून पैसे भरणं कंटाळवाणं होतं . 

मग नवऱ्याने एक आयडिया सांगितली   'Daily collection ' 
तेंव्हा आमच्या सारखे daily income वाले खूप होते , तर बँकेचेच लोक daily कॉलेकशनला यायचे . तुम्ही जमतील तसे द्या . रोज १००/२०० ( तेंव्हा आकडे असेच होते ) 

मग ते बरं पडलं , रोज थोडे पैसेबजूला टाकायचे . एक वर्षाचे अकाउंट ,वर्षाने पैसे मिळायचे . मग त्यातून काही मोठं घेता यायचं . हळूहळू instruments घेत गेले , स्कूटर घेतली आणि मजा म्हणजे हॉस्पिटलची जागा पण ह्या daily collection च्या पैशातूनच बुक केली . 

ह्यामुळे 'Fiscal discipline ' , आर्थिक शिस्त लागली .. 

एक डॉक्टर भेटले होते , छान प्रॅक्टिस आहे पण म्हणाले पैसे कुठे जातात कळतंच  नाही . आजकाल इंस्ट्रुमेंट्स एकापेक्ष एक भारी आले आहेत , एकदम sophisticated , बघितल्या क्षणी मोह होतो , घेतली जातात पण भयंकर महाग , त्यांचा maintainance , annual service चार्जे पण खुपंच असतो . . पैशाला काय वाट हव्या तेवढ्या फुटतात . 

ह्याचा फायदा कर्ज घेतल्यावर होतो , आधी कर्जाचा हप्ता , सगळी देणी , बिलं आणि पगार , उरलेले आपल्याला . 
वेळेवर कर्ज फेडलं तर क्रेडिट score वाढतो आणि परत विना अडथळे पुन्हा कर्ज मिळतं . 

आमचे डॉक्टर लोकांच्या बऱ्याच गोष्टी कर्जावरच  चालतात . 

आपल्याला हवे असतात तेंव्हा पैसे नसतात , मग कर्ज घ्यायचं आणि फेडायचं . 


बँक आपल्याला कर्ज देतात ते त्यांच्या कडच्या लोकांनी ठेवलेल्या ठेवीवर , कर्ज फेडलं नाही तर बँकI  बुडतील आणि ज्यांनी विश्वासाने पैसे ठेवले असती ते नुकसानीत  जातील .

जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांनी आर्थिक शिस्त लावून घेणे गरजेचे आहे , त्यातूनच ते मोठे होत जातात . छोट्या लोकांची काही union नसते , राजकीय पाठबळ पण नसतं , आपणंच आपली काळजी घायची असते . 















13-6-16

Lifestyle disordes :--

ह्या category खाली हल्ली खूपच आजार येतात , म्हणजे जीवनशैलीच्या चुकींमुळे होणारे आजार . जो पर्यंत जीवन शैलीत सुधारणा होत नाहीत तो पर्यंत हे बरे होत नाहीत .

पेशंटची जीवनशैली नेमकी कशी आहे हे त्यांनाच माहित असते , डॉक्टर काही त्यांच्या बरोबर नसतात , ते फक्त प्रश्न विचारू शकतात आणि सल्ले देऊ शकतात . बर्याच गोष्टी लोकांनी आपल्या आपणच बदलायच्या असतात .

...

नुसत्या औषध गोळ्यांनी हे आजार बरे होत नाहीत जो पर्यंत मूळ कारण जात नाही ,मग लोकांची चिडचिड सुरु होते . " एवढी औषधे घेतली तरी काही फरक नाही "

खरे म्हणजे हे आजार ओढवलेले असतात, आपल्या जीवन शैलीत बदल केला तर लगेच बरे होतात (जास्त झाले नसतील तर ) पण डॉक्टरांशी खरं बोलला पाहिजे आणि सांगितलेलं ऐकलं पाहिजे .

हल्ली बरेच पेशंट म्हणतात " फुकटचे सल्ले नका देऊ , मी काही बदलणार नाही , तुम्ही फक्त औषधं द्या , आणि पथ्य पाणी काही सांगू नका , करणार नाही "

१) हल्ली खूपच पेशंट पाय दुखतात म्हणून येतात , पाय दुखणं वेगळं आणि गुडघे दुखणं वेगळं . हल्ली बरेच लोक गाडीत . बसमध्ये किंवा tv ,कॉम्पुटर समोर खूप वेळ बसून असतात , बहुतेकांकडे आजकाल सोफा , dining table आणि पलंग असतो . म्हणजे पाय सतत खाली सोडलेले असतात , आणि कंबर हलत नाही . एकाच जागी एकाच position मध्ये अनेक तास बसून असतात .

त्याने गुडघ्या खाली पोटऱ्या असतात त्यात रक्तIचे चलनवलन कमी .किंवा बंद होते आणि मग पाय आदी जड होतात , सूज येऊ शकते आणि मग दुखू लागतात . तिथल्या रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि मग 'Varicose veins ' किंवा 'Chronic venous syndrome ' होतो .

खूप वेळ उभ्याने स्वयंपाक करणाऱ्या बायकांना पण हे होते .

बर्याच लोकांना कळत पण नाही कि आपले पाय दुखत आहेत , हे इतके हळूहळू होते कि लक्षातच येत नाही मग कधीतरी जाणीव होते कि इथे प्रोब्लेम आहे . ह्या लोकांना नुसतं थकल्यासारखा feel असतो .

ह्यव उपाय म्हणजे logical आहे कि एवढ्या वेळ एकाजागी बसू नये , मध्ये मध्ये चालून यावं किंवा पाय हलवावे , घोटे वरखाली करावे म्हणजे पोटरीचे स्नायू काम करतील आणि रक्त परत फिरू लागेल.

झाल्यावर treatment घेण्यापेक्षा preventive medicine वर भर दिला पाहिजे .

हा एक आजाराचा प्रकार झाला असे कितीतरी आहेत , एक पुस्तक पण लिहिता येईल

12-6-16

आपले मोदीसाहेब परदेशात प्रवास करताना विमानातच राहतात असे ऐकले , त्यांची कारणं काही असोत पण आपण प्रवास करतो तेच वाहन आपलं घर ही कल्पना मस्त आहे शाहरुख खान पण स्वदेस सिनेमात अशाच एका बस मध्ये राहतो .
सुटसुटीत आहे , पुन्हा हॉटेलचा खर्च नाही . दुसरं आपल्याकडे अजूनही बर्याच ठिकाणी राहायची सोय नसते , हॉटेल नसतात . अशा remote जागी जायचं असेल तर हे वाहन उपयोगी पडू शकते .
शहरात कामाचे नाही , traffic jam मध्ये अडकायचे . पण बघायला गेलात तर हे traffic jam साठी चांगलं आहे . अडकलं तर मागे जाऊन आडवं तरी पडता येईल . तेवढीच पाठ टेकायची । जIम clear झाला कि उठव म्हणून कोणाला तरी सांगायचं .









Saturday, June 10, 2017

आम्ही एकदा मुरबाडच्या रस्त्यावर गेलो होतो . एका मळ्यात एक शेतकरी काम करताना दिसला . सहज गेलो तर बऱ्याच भाज्या होत्या , म्हटलं जरा देता का , तर त्याला एवढा आनंद झाला , त्यांना मस्त वांगी , पालक, घेवडा , दुधी खूपच भाजी दिली , विचारलं किती पैसे तर लाजला , मग म्हणाला द्या समजून , मग १०० रु दिले तर म्हणाला एवढे नाही २० द्या . बळंबळंच त्याच्या हातावर ठेवले .

आमच्या भाजीमार्केट मध्ये भाजीचे काहींच्या काही घेतले असते .

आम शेतकरी भोळसट वाटतात , त्यांना पैशाचे व्यवहार कळत नाहीत . ते आपण आणि आपली शेती यातच रमलेले असतात . त्यांच्या भोळसटपणाचा फायदा खूप जण घेतात . आणि दुसरं म्हणजे काही व्यवहार करताना कोणाला सांगत नाहीत , आणि फसले गेले कि काय करावं सुचत नाही , कोणाला विचारावं कळत नाही .

कोकणातला शेतकरी व्यवहाराला पक्का आहे , तो नुकसानीत जाणारच नाही आणि वेडावाकडा खर्च पण करणार नाही .

या निमित्ताने शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम सोडवणारी आपापल्या भागानुसार कमिटी करता येईल , त्यांच्याकडे पीडित माणूस जाऊ शकेल .

शेतकऱ्यांसाठी फंड स्थापन करता येईल , लोक देईल पैसे पण त्यात लांडीलबाडी झाली परत लोकांचा विश्वास उडतो .

हे शेतकऱ्यांचे नेते शेतकरी नुकसानीत जाऊ नये म्हणून दुसरे longterm उपाय सुचवताना दिसत नाहीत .


पारंपारिक शेतकरी असल्याशिवाय शेती करता येत नाही , शेती विकत घेता येत नाही , BSC agriculture करता येतं का ? 

शेती मध्ये इन्व्हेस्ट करता येत नाही ,

बाहेरचा पैसा  आणि त्याहून मोठं आयडिया  आणि टेकनॉलॉजि येऊ देत नाहीत . नवीन विचार , बाहेरच्या जगातल्या नवीन कल्पना येऊ देत नाहीत , मग प्रगती होत नाही आणि शेतकरी नुकसानीतच जातो . 

शेतकऱ्यांकडून माल  घेणारे मधले दलाल कोण आहेत ?, ते का बोलत नाहीयेत ? ग्राहक , दलाल आणि शेतकरी अशी ही साखळी आहे , मग मधले दलाल यात नाही कसे ? नाव पण घेत नाही कुणी . 

शहरातल्या तरुणाईला पण शेतीत इंटरेस्ट असू शकतो , त्यांना येऊ दिलं नाही तर ते आपला पैसा  दुसरीकडे गुंतवतील किंवा परदेशी जातील . 

शेतकऱ्याची holding power  वाढवायची असेल तर cold storage हवेत . 

कोणी काही सांगायला गेलं कि म्हणतात तुम्ही कधी शेती केली आहे का ? तुम्हाला काय कळतंय ?

बाकी जनतेनी आता ह्या शेतकरी बंधूंच्या आयुष्यात इन्टेरेस्ट घेतला पाहिजे , ज्यांचे नातेवाईक आहेत तिकडे ये जा केली पाहिजे . प्रॉब्लेम समजून  घेऊन उपाय शोधले पाहिजेत . 

Special agricultural  consultants  आणि financial advisers हवेत . 

करायचं झालं तर खूप काही करता येईल . हे शेतकरी सतत दुःखी आणि कर्जबाजारी आणि कधीही आत्महत्या करणार असे असेल तर लोकांना पण जेवण गोड लागणार नाही . 

अन्नदाता सुखी असेल तरच जनता सुखी राहील . 






Good वाला Morning जी !!

Looking forward to the weekend !


Traffic management company :---

आपल्याकडे ट्रॅफिक मॅनॅजमेण्ट  म्हणजे लोकंच  जे काही मनाने करतील ते . आमच्याकडे तर हे चित्र नेहेमीच दिसतं . पोलीस असतात पण ते नसले कि परत तसेच . 

ज्या गाड्यातून सामान उतरवायचे असेल त्या गाड्या दुपारी १-४ या दरम्यान याव्यात . कितीतरी दुकानासमोर निवांतपणे मोठी ट्र्क उभी करून सामान उतरवत असतात , गॅसचा सिलेंडर , furniture हलवणे , वाळू , सिमेंटच्या गोणी , हे लोक रस्त्यावर उभे राहिले कि झालाच पाहिजे ट्रॅफिक जॅम . त्यांनी गर्दीच्या वेळेत येऊ नये . 


साधं रिक्षातून उतरताना , थांबल्यावर रिक्षा वाल्याला विचारणार किती झाले , मग पर्स उघडणार , मग मोठी नोट देणार , मग सुटते घेणार , एवढं होईपर्यंत मागे हे ट्राफिक . 
आधीच विचारून , तेव्हडे पैसे तयार  ठेवावे . 

आज एक बंगलोर रिटर्न माणूस भेटला होता , म्हणाला तिथले रस्ते अरुंद आणि सिटी बस सगळ्या व्होल्वो , १० फुटाचा रस्ता , ही  बस स्टॉप वर थांबली कि सगळंI  ट्रॅफिक जॅम . छोट्या मिनी बसेस हव्या.

 एवढा शिक्षणाच्या मागे धावणारा देश , प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवू शकत नाही ?


आता ज्या ज्या परीक्षा त्यात बहुतेक ठिकाणी मुली पुढे आहेत असे दिसते . Overall performance मध्ये पण मुलींच  पुढे आहेत . चांगले आहे . 

पण मुले मागे का आहेत ? त्यांना हा अभ्यास  आवडत नाही का ? मुलं जास्त हूड आणि दांडगी असतात , त्यांना अभ्यास  सोडून बाकी गोष्टीत इंटरेस्ट असतो . आई वडिलांना लाख वाटुदे कि पोराने अभ्यास करावा पण तो टिकून तर राहिला पाहिजे , सारखा पळून गेला तर कसे ?

मला वाटतं आजकालचं खरं जग आणि ह्यांचा अभ्यास ह्याचा काही ताळमेळ नाही . त्यांची आवड कशात आहे हे बघून शिकवावे , मग करतील . 

आजकाल मोबाईल , ते वेगवेगळे apps , hitech सिनेमे हे सगळं एकीकडे आणि तो रुक्ष अभ्यास दुसरीकडे . 

एकीकडे असे दिसते कि भाषा आणि गणितात पण गोंधळच आहे . 

मुलांच्या अंगात जाम शक्ती असते , त्यांना एकाजागी बसून राहायला पण आवडत नाही , मग अभ्यास तर दूरच , मग आपलं कसं तरी पास होऊन  जे आवडत नाही ते करत बसावं लागतं ,आणि मार्क कमी म्हणून आईवडील सतत  टेन्शन मध्ये आणि मुलाला वेडंवाकडं बोलणार . 

अशाने काही येत नसलेले उंडगे पोरं तयार होतील . पण ह्यांच्या आवडीचे काही मिळाले तर छान मार्गी लागतील 


ज्यांचा academic ओढा आहे त्यांना हा अभ्यासक्रम चांगला आहे , पण ज्यांना नाहीये त्यांना नुसतं हिडीसफिडीस करून कसं चालेल . त्यांनी आपले ठोकरे खात जगायचं हे काही बरोबर नाही . 

ते skill development होतं त्याचं काय झालं ?


















वटपौर्णिमा म्हणजे शादीशुदा लोकांचा Valentine day  !!
कल्याणमध्ये एक छान कॉफीशॉप झालंय , आम्ही कधीकधी तिथे जाऊन बसतो . सगळे यंग लोक असतात . छान वाटतं यांच्याकडे बघून . त्यांचे कपडे , hairstyles , fashion  बघून मस्त वाटतं .  कधी काळी  आपण पण असेच होतो . 

तर असेच आम्ही मध्ये तिथे जाऊन बसलो . नवरा कुठली कॉफी घ्यावी हे बघत बसला होता ( हल्ली खूपच variety  झाली आहे ) मी इकडे तिकडे बघत होते . 

आमच्या उजव्या बाजूला एक जोडपं होता आणि डाव्या बाजूला एक . उजव्या बाजूचे जोडपे म्हणजे एकमेकांशी किती बोलू आणि किती  नको ,असे , अगदी उधाण आलं होतं . एकंच  कॉफी मागवली , दोघं अर्धी अर्धी प्यायले , खूपंच  खुश होते एकमेकांवर . 

डावीकडचे अगदी उलट , दोघंही थोडे थकलेले , कंटाळलेले , गप्प , दोघांनी वेगळं वेगळं मागवलं  आणि आपापल्या मोबाईल  मध्ये डोकं खुपसून बसले . ह्यांचं म्हणजे एकमेकांशी सगळं बोलून झालं होतं किंवा काही बोलायचं  नव्हतं किंवा एखादं भांडण पण झालं असावं . 

म्हटलं हि उजवीकडे आधीची stage आणि डावीकडे नंतरची . आधीच उन्माद आणि उत्साह नंतर कमी होतो . 

Share market च्या भाषेत बोलायचं झालं तर 'मार्केट डाउन ' होतं . तंव्हा कसं म्हणतात ? correction आहे किंवा "ये तो होता रहता है " , किंवा अभी investment opportunity है . Mutual fund  मध्ये इन्व्हेस्ट करा , लॉन्ग टर्म बेनेफिट मिळतोच . वरखाली तर होतंच  राहणार . SIP करा . 

नवीन पिढीला या भाषेत  समजावून सांगितलेले कळेल , mutual फंडांवर विश्वास करता तास एकमेकांवर करा , longterm  benefit मिळतो , आणि मार्केट डाउन असताना कसं पुन्हा इन्व्हेस्ट करता  तसं ताणतणाव असताना एकमेकांमध्ये इन्व्हेस्ट करा ,समजजून घ्या  अशा वेळेला  खरं म्हणजे दोघांना एकमेकांची जास्त गरज असते . 



Happy वटपौर्णिमा !!
















आज आमच्याकडे वऱ्याची खिचडी , दाण्याची आमटी , उपासाची बटाट्याची भाजी , कैरी घालून नारळाची चटणी , ताक असा मेनू आहे . 
माझ्यापेक्षा नवऱ्यालाच जास्त इंटरेस्ट आहे . 

 Celebrating वटपौर्णिमा . 


















दिवसेंदिवस ८०-९० किलोचे पेशंट, खूप म्हातारे , मग काही गुढघे वाकवता येत नसलेले , किंवा मणक्याचा प्रॉब्लेम असलेले लोक वाढत चालले आहेत . 

प्रॉब्लेम असा येतो कि ह्यांना तपासण्याच्या टेबलवर  कसे चढवायचे ? . टेबले ३-१/२, ४ फूट उंच जाते , २- अडीच फूट रुंदी असते . हे चढताना किंवा उतरताना पडू शकतात . नवीन प्रॉब्लेम होऊ शकतात . Advanced pregnancy च्या बायका पण ह्यात येतात
तर मला एक आयडिया आली कि असं टेबल  हवं . म्हणजे वरखाली करता येणारे . 

टेबले खाली घेऊन पेशंटला बसवायचे , टेबले वर घ्यायचं  आणि तपासून झाले कि टेबले खाली घेऊन उतरवायचं . 

खाली कॉट किंवा सोफ्याच्या लेव्हलला पेशंट तपासता येत नाहीत .


दिवसेंदिवस असे टेबले सगळ्या क्लिनिक मध्ये लागू शकेल .

पण हे असे बनवणार कोण ?
आमचे हॉस्पिटल furniture वाले , त्यांनी कोणी अजून असे काही केले नाही . 

हि सिस्टिम सोपी हवी , नर्स , आयाबाई यांना  पण वापरता यायला हवी , दणकट हवी . काही दिवस झाले कि अडकलाय , लिव्हर तुटलाय असं नको . 

फार महाग नको , सोप्पं सुटसुटीत design हवे . 
पेशंटना पण दिलासा मिळेल. 

Dear friends , found a table with these features , haven't seen personally . Seems sensible design .

http://meditekengineers.com/examination-table-motorized-5401a.html






आजकाल सिनेमाचे reviews  येतात त्यात त्याच्या संगीता बद्दल एकंच  वाक्य असतं  ' एकही गाणं लक्षात राहत नाही '. 


हे पटलं . जुनी गाणी कशी पाठ व्हायची , मधल्या म्युसिक संकट ते आता लक्षात पण राहत नाही इथपर्यंत आलंय . 


आपल्याला गाणी लागतात , जुनी गाणी आहेत छान पण किती वर्ष चालवायची ? , किती orchestra  ह्या गाण्यांवर चाललेत , स्वतःचे एकतारी गाणे बनवावे . प्रयत्न तरी करावा . 


सिनेमाच्या यशात त्याच्या गाण्यांचा मोठा हात असतो . सैराट मध्ये पण गाण्यांनी मोठा हात दिला . त्या डिरेक्टरला पण म्युसिक sense  असावा लागतो , त्याशिवाय होत नाही . 


आपल्याकडे गाणे बनवणाऱ्यापेक्षा गाणाऱ्याला  जास्त  प्रसिद्धी मिळते . दुसरे गायक त्यांची कॉपी करू म्हटले तरी जमत नाही कारण ते गाणं ते ऐकून शिकतात , मूळ गाणाऱ्याने ते ज्याने बनवले आहे त्यांच्या बरोबर बसून  , रिहर्सल करून  , एकेक जागा बसवून घेतलेल्या असतात , त्यामुळे गाण्याला रंगात येते , खुलते . त्यांची thought process कधी कोणी बघितलीच नाही , हे गाणं असं का ? दुसऱ्या कोणत्या चाली होत्या ? हा राग का निवडला ?  


आपल्याकडे किती तरी पडेल चित्रपटात एकापेक्षाएक बहारदार गाणी आहेत . अजून लक्षात आहेत . 


ती creativity  गेली काय ?


साधं शाळेत कविता शिकवताना पण चाल चावून शिकवली तरी लक्षात राहते , मुलांना मजा येते . तिथूनच creativity ला सुरुवात होते . 


हे एक 'काबील ' सिनेमातलं गाणं , मला डान्स आवडला , गाणं नाही . दोघं आंधळे आहेत आणि तो तिला डान्स शिकवतो आहे , choreography   छान आहे . 


Looking forward to some new interesting , lovely and memorable music.








शिक्षणाचे आणि मार्कांचे अवडंबर :---



आमच्या ओळखीचे २ भाऊ आहेत , बरेच वयाने मोठे आहेत आमच्यापेक्षा . त्यातला मोठा तो सतत नापास व्हायचा आणि धाकटा मेरिट मध्ये पIस व्हायचा . कौतुक नेहेमी धाकट्याचे व्हायचे आणि मजा म्हणजे धाकटा पIस झाल्याचे पेढे मोठा आणायचा . 


धाकटाचे करिअर सुरळीत  झाले , ग्रॅड्युएशन झाले , चांगल्या कंपनीत  नोकरी , quarters सगळं व्यवस्थित . 


मोठ्याने खूप struggle केला . ग्रॅड्युएशन  झाले नाहीच . मग इकडे नोकरी कर , तिकडे कर . पडेल ते काम कर . पण यात तो तावून सुलाखून निघाला . त्याच्या नशिबाने त्यावर विश्वास टाकणारी सहचारिणी मिळाली . तिचा त्याला फार आधार होता . 


मग त्याला चालवायला एक युनिट मिळालं , आणि ते त्याने इतकं firstclass  चालवून दाखवलं . त्याला इकडे तिकडे करून  सगळे loopholes  माहित होते . 

बिझनेस करायचा असेल तर काय काय लबाड्या होऊ शकतात आणि कसा कसा तोटा होऊ शकतो हे पण माहित हवं . नुसतं काम करत राहिलं आणि मागून सगळं लंपास होत राहिलं तर काय उपयोग ?



तर असा हा माणूस , चांगलाच यशस्वी झाला , मग एकाचे दोन युनिट झाले , व्यवसाय वाढला . बऱ्याच जणांना नोकऱ्या दिल्या . आईवडिलांना सांभाळलं , बाकी नातेवाईकांना मदत केली , समाजात प्रतिष्ठा मिळवली .



धाकटा आपण बरं आपला संसार बरा असा होता , जास्त कोणाला थारा  द्यायचा नाही . घरच्यांच्या मते तो आप्पलपोटI  होत , पक्का मतलबी .




यशस्वी होण्याचा काही एकाच मंत्र नाही .


परीक्षेत यशस्वी होणे हे चांगलेच आहे पण नाही झाले तरी सगळे रस्ते बंद होतात असे नाही .


उलट या लोकांना अजून इतर क्षेत्र धुंडाळण्यास मिळतील . त्यात ते प्रगती करू शकतात . त्यात त्यांना जास्त मजा येईल .


हे नाही म्हणून काहीच नाही असे नसते , उलट जग explore  करायची संधी मिळेल . आणि जे तावून सुलाखून  निघतात ते जास्त जीवन  जगतात . ते  भयंकर वाटेल but it helps in the long run . 


आमचे डॉक्टर लोक पण बऱ्याचदा नापास झालेले असतात . इतक्या परीक्षा असतात कि अधूनमधून नापास होतातच , पण मग अजून अभ्यास होतो  आणि मजा म्हणजे हे डॉक्टर्स    अधिक चांगले डॉक्टर होतात कारण त्यांना दुखियारे लोक जास्त चांगले समजतात 



Don't worry my dear young boys and girls , there is space for everyone .


जे असेल ते असो , जिगर ठेवायची , पुढे जायचं . जहाँ और भी है !!




















रात्री जागणारे * सकाळी उठून बसणारे 

दुपारी झोपणारे * दुपारी फ्रेश असणारे व कामे करणारे 

सकाळी फ्रेश  * संध्याकाळी फ्रेश 

veg * nonveg 

झोपताना AC , पंख लागणारे *  आजिबात काही नको असलेले 

गरम चहा पिणारे  * चहा गार झाल्यावर पिणारे 

अशा लोकांचे एकमेकांशी आजिबात पटत नाही पण उप्परवाला  अशाच जोड्या जमवतो . 

आतले आणि बाहेरचे :==


बऱ्याच वर्षांपूर्वी एक कथा आली होती 'आतले आणि बाहेरचे '

एका ट्रेन मध्ये एका माणसाला चढायचं असतं , ट्रेन मधली माणसं त्याला आत येऊ देत नाहीत , दार आतून बंद करतात , कसाबसा हा चढतो . 

मग अजून माणसे येतात मग हा पण त्या लोकांना चढू देत नाही , कारण हा आता आतला झालेला असतो आणि आता बाहेरचे त्याला नको असतात . 

****************************************************************

आपल्या दैनंदिन जीवनात पण आपण system च्या आतले आहोत का बाहेरचे ह्यावर आपला दृष्टिकोन असतो . 

एखाद्या कंपनीचा मालक कंपनीचे प्रॉफिट वाढवायला कामगारांकडून कमीतकमी पैशात जास्तीत जास्त काम काढून घेईल , कामगार लोक जास्तीतजास्त पगार व बेनेफिट मिळवायचे प्रयत्न करतील . दोघांचे equation एकमेकांना पटले तर कंपनी चालेल नाहीतर बंद पडेल . 
मालकाने  कमी पगार दिला तर कामगार सोडून जातील आणि कामगारांनी फारच त्रास दिला तर मालक कंपनी बंद करेल . 

समजा मी कस्टमर आहे , तर मला जास्तीत जास्त सुविधा किंवा वस्तू कमीत कमी पैशात हव्या असतात पण देणार्याला त्या किमतीत परवडत नसलं तर तो quality खराब करेल , त्याने दोघांना त्रास होईल . 


समजा कोणाला लोकांना जेवण द्यायचे आहे , तो काँट्रॅक्टरला पैसे अजून कमी करा , अजून कमी करा सांगतो , मग कॉन्ट्रॅक्टर पण बेक्कार जेवण देतो . 

समजा मी कुठल्या कंपनीचे shares घेतले आहेत तर माझी  अपेक्षा असणार कि त्या कंपनीने मला प्रॉफिट काढून द्यावा पण त्यांच्या गिऱ्हाईकांची म्हणणे असेल कि स्वस्तात माल  मिळावा . 

शेतकऱ्यांना वाटते कि आपल्या मालाला जास्तीतजास्त भाव मिळावा पण लोकांना वाटतं कि धान्य , भाजीपाला दूध स्वस्त मिळावे . हे महाग झाले कि ते कमी जेवतात किंवा शिळं खातील . 

सासूला वाटते कि सुनेनी जास्तीतजास्त काम करावे , सुनेला तसे आजिबात वाटत नाही , समजून नाही घेतलं कि आहेच पुढचं . 



हे अगदीच सोप्पं झालं . प्रत्येक गोष्टीची link , chain असते . 

कोणी एकाने जास्त हिसकावलं किंवा अडवून धरलं तर सगळी लिंक खराब होऊ शकते . 


कुठल्याही व्यायसायाची किंवा बिझनेस ची ताकत  नुसत्या प्रॉफिट वर नसते तर तो  वर्षानुवर्षे , पिढ्यानपिढ्या चालू राहिला पाहिजे . 

जुन्या मुंबईत वालधुनी , Princes street , मंगलदास मार्केट , हिंदमाता मार्केट  कितीतरी पिढ्या चालू आहेत . जुने गिर्हाईक कुठून कुठून येतात , तेच नवीन कस्टमर घेऊन येतात . फार माफक भाव असतो . 

काही वर्षांपूर्वी आपल्याला फायदा आहे म्हणून जवळच्या ओळखीच्या लोकांना , मित्रांना चुकीच्या ठिकाणी investment चे सल्ले  दिले गेले , त्या व्यक्तीला तेंव्हा प्रॉफिट झालं पण सगळ्यांचे संबंध तुटले आणि नाव पण खराब झाले . 

फार तुटेपर्यंत ताणू नये , जरा समजुतीने घ्यावे . 


तो अमिताभ बच्चन एकदम शहाणा आहे , कुठल्याही जाहिरातीत दिसतो . एकदा म्हणाला होता ' Any  transaction  should  be  affordable ' . परवडलं आणि पटलं तरच व्यवहार होतात . तो पैशासाठी अडवत नसेल , त्रास देत नसेल आणि वर cooperate पण करत असेल , मग सगळ्यात जास्त busy  तोच असणार . 













Wednesday, June 7, 2017

27-8-16

आमच्याकडे एखादी तरुण स्त्री येते , आधीचे एक मूल आहे परत प्रेग्नन्ट आहे आणि आता नको . " "अहो असू द्या कि , तुमच्या छोटुशी खेळायला , भावंडं हवंच " असं म्हटलं कि जीभ बाहेर काढतात नाहीतर डोळे वर फिरवतात  आणि म्हणतात " नकक्को आजिबात नक्को , हे आहे तेच सांभाळता येत नाही , दुसरं कुठे ? आता नक्को कधीच नक्को "

खूपच जोरदार reaction असते .

आजकाल मुली असं का म्हणत आहेत ?

१) कामं पडतात , अशी कामं ज्यांची सवय नसते , अडकल्या सारखं होतं , कुणी मदत करत नाही , बाळ सांभाळायला कुणी येत नाही , बाळासाठी आर्थिक उत्पन्न बुडतं , खर्च वाढतात , सारखी काटकसर करावी लागते , मन मारावं लागतं .

बाळंतपण म्हणजे एक अवडंबर झाले आहे , प्रचंड खर्च पण आहे

२) घरातले अलगद अंग काढून घेतात , तुझे मूल आहे तूच सांभाळ , आमचे हे करून झालंय , पुन्हा अडकायचे नाही त्यात.

मूल  कसे सांभाळायचे माहित नसते , चुका होतात , मग मूल वारंवार आजारी पडते , व्याप होतो


३) स्वयंपाक तूच कर , घर आवर , मुलांना शाळेत ने आण कर , अभ्यास घे  आणि आम्ही तुला नावं ठेवतो .

४)बरोब्बर pregnancy च्या वेळेला सासरच्या लोकांशी वाद होतात आणि सगळी pregnancy टेन्शन मध्ये जाते . डिलिव्हरी झाल्यावर तर सासर- माहेरच्या मध्ये जबरी पॉलिटिक्स होतं . खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते , मानसिक स्वास्थ्य बिघडते .

५) कधी घरकाम केलेले नाही , professional शिक्षण घेण्यात आयुष्य गेलं अशा मुलींकडून गृहकृत्य अपेक्षिली जातात , पुन्हा पैसे कमवावेत किंवा माहेरून आणावेत ही  अपेक्षा पण असते .

६) एका मुलाच्या वेळेला हा अनुभव आलेली स्त्री पुन्हा त्या वाटेलI जाईल का ? 

जरा बाबा लोकांनी मुलं सांभाळायला हातभार लावला तर आईलोक दुसरा chance घ्यायला हो म्हणतील .

बाजारातून सामान आणून देणे , मुलांना शाळेत ने आण करणे आईला नोकरी करायची असेल तर जवळच मुलं सांभाळायची व्यवस्था असणे .

असे मदत करणारे पुढे आले तरच भावंडे जन्माला येतील .

Pregnancy आणि बाळंतपणात सांभाळून घेणे , शारीरिक आणि मानसिक आरोग्य छान ठेवणे , तरच होणारी संतती धष्टपुष्ठ आणि हुशार निघेल.  नाहीतर जन्माला घालायचं म्हणून घालायचं आणि सदा आजारी आणि अशक्त मूल जगात आणायचं याला काही अर्थ नाही .

आजकालच्या मुलींमध्ये कितीही fault असले तरी जनन क्षमता त्यांच्यातच असते , मुलं हवी असतील तर त्यांना समजून सांभाळून घ्यावेच लागेल .






16-11-17

"काय करायचे आहेत एवढे पैसे ?"

आज हे वाक्य बऱ्याच वर्षाने ऐकलं .

मी surgery पोस्ट करत असताना (८७-८८) आम्हाला stipend मिळायचा , तो होता १९००/-. त्यातले आमचे २००/३००/- उरायचे . मग वाढून तो २३००/- झाला , तेंव्हा माझा colleague म्हणाला होता " इतना पैसा  लेके क्या करनेका ?"

मधल्या काळात हे असं वाक्य गायबच झालं होतं .

आज हे वाक्य परत ऐकलं . आमच्या बाजूला राहणाऱ्या एक बाई रांगेत उभं राहून ४५००/- घेऊन आल्या आणि कौतुकाने दाखवत होत्या , तेंव्हा त्यानाच शेजारी म्हणाले " तुम्हाला काय करायचे आहेत एवढे पैसे ?"

त्या पण म्हणाल्या " हो बरोबर आहे "

इति .....

17-11-16

मला वाटतं आता ह्या practical knowledge चे classes घ्यायला हवेत :--

१)  Management of finances .
2) Understanding law
3) Safe driving rules
4) Laws regarding marriage and divorce .
5) Home science
6) Baby care
7) Town planning
8) Taking care of your documents.

असं अजून कितीतरी .

आपल्याला कुठल्या गोष्टीतलं कळत नसेल तर ते समोरच्याला लगेच समजतं मग फसवलं जाण्याची शक्यता वाढते . माहिती आणि ज्ञान असेल तर  chances कमी होतात .

18-11-16

I came across a nice line " India is rebooting " .

Somewhere I have begun to feel that people are enjoying this.

खूप वर्ष आपलं तेच तेच चाललं  होतं  , तेच ते सणवार , तीच तीच जातीवरून भांडणं  , सगळं एकदम बंद .

Changing scenario :---

ज्या लोकांना पर्स मध्ये नोटांची गड्डी , इकडे तिकडे १-२ लाख आहेत , बाजूला एकI बॉक्स (सॉरी खोका ) मध्ये कोटी आहेत , याची सवय होती आतI त्यांच्या घरातले dialogue ------

" अगं माझ्याकडे ५६०/- आहेत , तुझ्याकडे किती आहेत ?"
" माझ्याकडे ३२०/- आहेत "
"तुला हवेत का , हे घे १००/-"
" अहो मला काय करायचे आहेत , तुम्हीच ठेवा . बाहेर जIल तर येतIना भाजी आणा १/२ किलो , आणि चिमणलाल कडून आणा , आपलं अकाउंट आहे त्याच्याकडे "
" आपल्या सखूबाईला ५०००/- advance दिला होता नं , तिने सांगितलं आहे  ५००/-चा  EMI  करा "
" काल चप्पल तुटली म्हणून चांभाराकडे गेले , त्याने २०/- मागितले , तर माझ्याकडे नव्हते , मी त्याला म्हटलं , सकाळीच शिरा  केला आहे , देऊ का ? , आर चालेल म्हणाला "


आमचे डॉक्टर लोक जे नोटांची पुडकी घेऊन घरी येत होते ते आता काय वाट्टेल ते घेऊन घरी येतील .

तांदूळ , तेलाचा डब्बा . एखाद्या काकूने दिलेले बेसनाचे लाडू , Tata sky recharge coupon. एखाद्या सुग्रण मावशींकडून १० दिवस रात्रीचा डब्बा पाठवायचे  वचन .

परवा   मलाच एका यवन ( म्हणजे मुसलमान ) पेशंटने , पैसI नाही है  , ये रखो हमारे बेकरी  के प्रॉडक्ट्स है म्हणून एक पिशवी दिली . त्यात सुपर quality चे , खारी , टोस्ट आणि वेगवेगळी नानकटाई होती . माझी खूप दिवसाची ब्रेकफास्ट आणि midnight snack ची सोय झाली .

" अगं परवा आपण अँपेंडिक्सचे ऑपेरेशन  केलं  ना त्याने इंदोरचे तिकिटं आणि हॉटेल बुकिंग दिलं  आहे . तो म्हणाला मीच जाणार होतो , तर तुम्ही ऑपेरेशन केलंत  , आता तुम्ही जा "
" अहो इंदोरला जाऊन काय करणार ? कुणी ओळखीचं  पण नाहीये "
" काय करायचंय ओळखीचं , आपणच जाऊ , नाहीतर आपण कशाला गेलो असतो ? आता हवा पण छान आहे , चल शहर बघू , तिथली खाऊ गल्ली प्रसिद्ध आहे तिथे जाऊ ,चोरल नदीची वळणं  पाहू , बापूभैय्या देवासकरांचा  वाडा आहे का पाहू , तुला मस्त इंदुरी साड्या  घेऊ !! चल "
अगं चल !!

( पुल देशपांडे यांचे 'तुझे आहे तुजपाशी ' वाचले असेल तरच काही references कळतील )





My dear friends , I am very happy to share with you that ....

फेसबुक वर मी 'मैत्र ' या ग्रुप मध्ये आहे . त्यांनी माझ्या एका लेखाला बक्षीस दिले आणि हे पुस्तक काल मला पोस्टाने आले .
खूपच आनंद झालंय  . खूप वर्षांने असे बक्षीस मिळाले आहे .

मी काही लेखिका नाही पण मनात येईल ते लिहिते . आतापर्यंतच्या माझ्या अनुभवविश्वातून जे share करावेसे वाटते ते करते .
मी लिहिते ते आवडतं आणि भरभरून दाद पण मिळते , त्यामुळे अजून हुरूप येतो .

या मैत्र ग्रुपची मी अत्यंत आभारी आहे.

आता आपला देश एका अभूतपूर्व अर्थक्रांतीतून जात आहे , त्या अनुषंगाने मला या पुस्तकाचे नाव पण समर्पक वाटले . अजून वाचले नाही . वाचल्यावर त्याबद्दल लिहीन .

ज्या लेखाला बक्षीस मिळाले त्याची लिंक देत आहे .

सुप्रभात
नमस्कार मैत्रगण
ऑक्टोबर महिन्यातल्या दोन सर्वोत्कृष्ट पोस्टच्या लेखकांची नावे आज जाहीर करताना मनापासून आनंद होतो आहे...
...
आपल्या या समुहावर खरोखरीच चांगले लेखन करणारे मैत्रगण असल्यामुळे कोणती पोस्ट निवडावी असा प्रश्न अर्थातच पडला.
या मंचावर वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, चालना मिळावी, काही नवे सकारात्मक विचार मांडले जावेत हा हेतू, ही पुरस्कार योजना जाहीर करण्यामागे असल्याने त्या दृष्टीने विचार करून पोस्ट " कोणी " लिहिली आहे यापेक्षा पोस्टमध्ये " काय " लिहिले आहे याचाच विचार सर्वोत्कृष्ट पोस्ट निवडताना प्रामुख्याने केला गेला...
विजेते : -
1) मुकुल रणभोर " तुंबाडचे खोत " 07.10.2016
2) डॉ वैष्णवी देव " साधारण वीस वर्षापूर्वीची गोष्ट "
16.10.2016
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..
अर्चना बापट

Thursday, June 1, 2017

11-11-16

अमेरिकेतल्या लोकांना ट्रम्प निवडून आलेत या आनंदा पेक्षा हिलरी ठरल्याचे दुःख जास्त आहे . त्या निवडून आल्या असत्या तर अभूतपूर्व जल्लोष झाला असता . ट्रम्प निवडून आलेत तर त्यांची पार्टी पण काही जास्त आनंदी आनंद करत नाहीयेत .  त्यांना पण हे अपेक्षित नसेल , धक्काच बसला . आणि खूपच फरकाने निवडून आले .


मीडियाने हिलरी निवडून येणार हे वारंवार ठसवले , वेगवेगळॆ polls मध्ये ती किती पुढे आहे सारखे सांगितले जात होते . ते पण बिकाऊ मीडिया आहेत का त्यांना लोकांची नस  कळलीच नाही ?



14-11-16


माझ्या काही आयडीयाज :--

हे पैसे पैसे ऐकून व्याप झालाय .

एवढा पैसI होता तर कितीतरी सोयी झाल्या असत्या .

असो .

तरीपण आपल्या आयडिया लोकांपुढे मांडायला काय हरकत आहे .

१) कल्याणला गणेशघाटावर जिथे लोक फिरायला जातात , बाजूला कचऱ्याचा डोंगर झालाय . त्याची विल्हेवाट लावायचंही सोय. मोठ्ठा incinerator घेतला असता . वारंवार होणार दुर्गंधीचा त्रास वाचला असता .


२) एक खूप मोठ्ठी छान बIग केली असती , एकदम  designer . लोकांना फिरIयला जायला जागा नाही , मुलांना खेळायला , जेष्ठ नागरिकांना पाय मोकळे करायला , यंग लोकांना प्रेम करायला (लग्नानंतर ) थोडं मन मोकळं होतं , भांडणं कमी होतात .

३) मस्त वृध्दIश्रम काढायचा होता , एकदम स्टयलिश , बुढे लोक ताबियेतीत राहिले असते . आता मुलं परदेशात  आईवडील एकटे असे खूप आहेत .

४) मुलींसाठी एक collage काढायचं होतं , Nirmala Niketan सारखं , home science शिकवणारं . आमच्या वर्गातल्या शाळेतल्या बऱ्याच मुली तेंव्हा या institute मध्ये गेला होत्या . संसाराला एकदम पक्क्या झाल्या . ह्यांचे नवरे जगभरात नोकरीसाठी गेले . ह्या पण कुठल्या कुठल्या देशात जाऊन खंबीरपणे नवर्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि मस्त संसार केले .

५) Art gallery काढायची . कल्याणमध्ये कलाकार खूप आहेत पण त्यांना exposure मिळत नाही . त्यांना platform मिळाला असता . Creativity आणि innovation झालं असतं .


कल्याणला अजून चारीबाजूला भरपूर जागा आहे , बरेच काही होऊ शकते

अजून खूप .........


होईल सगळं होईल .........





शिक्षणाचे आणि मार्कांचे अवडंबर :---

आमच्या ओळखीचे २ भाऊ आहेत , बरेच वयाने मोठे आहेत आमच्यापेक्षा . त्यातला मोठा तो सतत नापास व्हायचा आणि धाकटा मेरिट मध्ये पIस व्हायचा . कौतुक नेहेमी धाकट्याचे व्हायचे आणि मजा म्हणजे धाकटा पIस झाल्याचे पेढे मोठा आणायचा .

धाकटाचे करिअर सुरळीत झाले , ग्रॅड्युएशन झाले , चांगल्या कंपनीत नोकरी , quarters सगळं व्यवस्थित .

मोठ्याने खूप struggle केला . ग्रॅड्युएशन झाले नाहीच . मग इकडे नोकरी कर , तिकडे कर . पडेल ते काम कर . पण यात तो तावून सुलाखून निघाला . त्याच्या नशिबाने त्यावर विश्वास टाकणारी सहचारिणी मिळाली . तिचा त्याला फार आधार होता .

मग त्याला चालवायला एक युनिट मिळालं , आणि ते त्याने इतकं firstclass चालवून दाखवलं . त्याला इकडे तिकडे करून सगळे loopholes माहित होते .
बिझनेस करायचा असेल तर काय काय लबाड्या होऊ शकतात आणि कसा कसा तोटा होऊ शकतो हे पण माहित हवं . नुसतं काम करत राहिलं आणि मागून सगळं लंपास होत राहिलं तर काय उपयोग ?

तर असा हा माणूस , चांगलाच यशस्वी झाला , मग एकाचे दोन युनिट झाले , व्यवसाय वाढला . बऱ्याच जणांना नोकऱ्या दिल्या . आईवडिलांना सांभाळलं , बाकी नातेवाईकांना मदत केली , समाजात प्रतिष्ठा मिळवली .

धाकटा आपण बरं आपला संसार बरा असा होता , जास्त कोणाला थारा द्यायचा नाही . घरच्यांच्या मते तो आप्पलपोटI होत , पक्का मतलबी .

यशस्वी होण्याचा काही एकाच मंत्र नाही .

परीक्षेत यशस्वी होणे हे चांगलेच आहे पण नाही झाले तरी सगळे रस्ते बंद होतात असे नाही .

उलट या लोकांना अजून इतर क्षेत्र धुंडाळण्यास मिळतील . त्यात ते प्रगती करू शकतात . त्यात त्यांना जास्त मजा येईल .

हे नाही म्हणून काहीच नाही असे नसते , उलट जग explore करायची संधी मिळेल . आणि जे तावून सुलाखून निघतात ते जास्त जीवन जगतात . ते भयंकर वाटेल but it helps in the long run .

आमचे डॉक्टर लोक पण बऱ्याचदा नापास झालेले असतात . इतक्या परीक्षा असतात कि अधूनमधून नापास होतातच , पण मग अजून अभ्यास होतो आणि मजा म्हणजे हे डॉक्टर्स अधिक चांगले डॉक्टर होतात कारण त्यांना दुखियारे लोक जास्त चांगले समजतात

Don't worry my dear young boys and girls , there is space for everyone .

जे असेल ते असो , जिगर ठेवायची , पुढे जायचं . जहाँ और भी है !!