Wednesday, May 31, 2017


1-4-17

काही असे पेशंट येतात , BP वाढलंय , Bl sugar  वाढलीय  , का ? तर गोळ्या घेतल्या नाहीत . का ? तर संपल्या , मग आणल्या का नाहीत ? विसरलो , कंटाळा केला , पैसे नव्हते , वाटलं नाही घेतल्या तर काय होईल ? काही नाही होणार .
मग जे काही होतं ते एवढं महाग पडतं कि गोळ्या  घेतल्या असत्या तर बरं झालं असतं  असं वाटतं . चांगलाच पश्चाताप होतो .
कधी कधी epilepsy चे पेशंट पण मनानेच अशाच कारणाने गोळ्या बंद करतात . मग त्यांना कुठेही आकडी convulsion येतं . त्यावेळी ते कुठेही असू शकतात .
रस्त्यात , गॅस जवळ , काही काम करताना, कुठेही . त्यांना त्या वेळी ट्रीटमेंट मिळेल असे नाही . त्यांच्या किंवा त्यांच्यामुळे दुसऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा इजा होऊ शकते .
ह्या लोकांना जर घरपोच दर महिन्याला किंवा १५ दिवसांनी ही औषधे मिळाली तर खूपच प्रॉब्लेम व complications कमी होतील .
समजा त्यांनी एखाद्या website किंवा NGO कडे नोंदणी केली तर ते हि जबाबदारी घेऊ शकतात .
खूप सिनियर citizens  हल्ली एकटेच राहतात , त्यांना पण हि सुविधा उपयुक्त ठरू शकेल .पैसे असतात पण आणून द्यायला कोणी नसतं ..
ज्या NGO लोकांना काम करायचे असेल त्यांना हे जमेल


4-4-17

अशा खूप पोस्ट येतात:----

शहरातल्या लोकांना  खेड्यातले जीवन कळत नाही ,
शेतकरी लोकांचे हाल AC मध्ये  बसणार्यांना कळत नाहीत ,
जज्ज लोकांना आरोपींचे दुःखच कळत नाही .

डॉक्टर लोकांना पेशंटचे व्याप कळत नाहीत ,

मुलीच्या बापाचे दुःख कोणाला कळत नाही

विदर्भाच्या समस्या उर्वरित महाराष्ट्राला कळत नाहीत .

नोकरी करणाऱ्या बाईचे हाल घरी बसणाऱ्या बायकांना कळत नाहीत .

शिक्षक , छोटे दुकानदार , LIC agent , पोलीस , सीमेवरचे सैनिक , पत्रकार , कोणीही . कुणी त्यांना समजूनच घेत नाही .
(डॉक्टर लोकांना पण कुणी  समजून घेत नाही) .

तर काय बरं करावे ?

मला वाटतं सामाजिक churning झालं पाहिजे . म्हणजे   AC मध्ये बसणार्यांनी बाहेरचे  जग बघावे , उन्हातान्हात फिरणार्यांनी  ऑफिस मध्ये एका जागी बसून दाखवावे .

मला पण डॉक्टरकीचा कंटाळा आला आहे . Actually I think I am a good doctor and proud of it too , but I would like to do something different .


मला शेतकऱ्यांची पत्रकार व्हायला आवडेल . कसं आहे नेमकं यांचं जीवन  समजून घ्यायला आवडेल .

बघू जमतंय का ?

नुसता वाद घालण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्यावे नाही का ?












शहरातल्या लोकांना शेतीतलं काही कळत नाही , खरं आहे ते , शहरातल्या लोकांची शेती म्हणजे बाल्कनीतल्या कुंड्यांना  आठवणीने पाणी घालणे . तेवढं केलं तरी खूप .
आता काही जणांचे बंगले , बागI आहेत पण आता फार कमी .

आता हे शेतकरी आणि कर्जमाफी आपला विषय नाही , मान्य !! पण सारखं सगळ्या चॅनेल वर हीच चर्चा , कानावर पडतंच .  आणि सरकार का नाही म्हणत आहे हे पण समजत नाही .

१) सरकारला नगद पैशापेक्षा . सुविधा निर्माण करायच्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यालाच फायदा होईल .

२) शेतकऱ्याला Income tax  माफ आहे , बरोबर आहे पण मग एक विवरणपत्र किंवा वर्षाचा खर्चाचा अहवाल सादर करू शकतात . टॅक्स नका भरू .

३) शेतकऱ्याला सांभाळून घ्यायचं असेल आणि तो सारखा सारखा संकटात सापडत असेल तर काय चुकतंय ते बघायला नको का ?

४) हल्ली बँकI कशा 'Relationship manager ' एकेकI  क्लायंटला   allot करतात तास एक accounts  and auditor type चा माणूस शेतकऱ्याला allot करावा . त्याने ते कुठे खर्च करतात काय चुकतंय हे सरकारच्या लक्षात  आणून द्यावे म्हणजे उपाययोजना करता येतील .
ते regular saving करतात का ?  शेतकऱ्याला एकदम पैसI मिळतो  तेंव्हा वेडावाकडा उडवला जाऊ शकतो का ?

शहरातल्या लोकांचा महिन्याचा पगार असतो ,त्यात ते आपलं बजेट बरोबर बसवतात .


५) ३३००० कोटी हि काही लहान रक्कम नाही , हि रक्कम tax payer च्या खिशातलीच जाणार आहे , तेंव्हा taxpayer ला अधिकार आहेत प्रश्न विचारायचे .

६) दारूच्या व्यसनIपायी  हे प्रकार होत असतील तर व्यसनमुक्ती केंद्रे उभारावीत .

७) लग्नात अफाट खर्च करत असतील तर सामाजिक समुपदेशन व्हावे , लग्न करून मुलगी आणायची आणि कर्जापायी तिच्या बापाने आत्महत्या करायची हे आजच्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या तरुणाला शोभत नाही .

८) मूळ प्रॉब्लेम कुठे आहे हे मोकळेपणाने सांगितले तर उपाय शोधता येतिल .

९)  रावसाहेब दानवेंच्या मुलाचे लग्न झाले त्यावर गदारोळ झाला , तेंव्हा टीव्ही वरच्या चर्चेत सतत हेच सांगितले कि खर्च मुलीकडच्यांनी केला , ते सधन शेतकरी आहेत .

१०) गेल्यावर्षी तूर डाळीचा तुटवडा होता , या वर्षी अफाट पीक आले आहे , मग निर्यातीची परवानगी का मिळत नाही ? हे decision पटपट घेता आले पाहिजेत

११) कुठलीही मोठ्या कामाचा जसा project report असतो तसI महाराष्ट्रातल्या शेतीचा हवा . कोण कुठलं पीक घेतो आहे , उत्पन्न साधारण किती असेल , किती किंमत येईल  . हे सगळं computerize करता येऊ शकतं .

१२) करायचं असेल तर खूप करता येईल , logical and data based  चर्चा असतील तर , emotional नकोत.















8-4-16

मध्ये आमच्या एका ग्रुप चे get- together झाले . सगळे साधारण  ६० वयाचे .
सुरुवात झाली तेंव्हा सगळे सारखेच होते साधारण ३५-४० वर्षांपूर्वी पण मग सगळ्यांच्या वाट बदलल्या .

१) काही भारतातच राहून छोटे मोठे व्यवसाय करणारे

२) Government servant

३) कॉर्पोरेट जगात वावरणारे

४) परदेशी स्थायिक


सगळ्यांचा mindset वेगळा वेगळा झालाय .
Approach  to various things in life  फार बदलला आहे .

Basically पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे .

'Doing very well in life ' ची व्याख्या पण वेगवेगळी आहे .

जे भारतातच राहिले आणि आपापले उद्योगधंदे सुरु केले , त्यांचे सुरुवातीला फार हाल झाले आहेत . They were looked down upon.  पण आता बघितलं तर एवढी काही वाईट कंडिशन नाहीये असे वाटते

स्वतःचा व्यवसाय करणारे फार forthright आणि स्पष्ट बोलणारे वाटले . Corporate जगातले फार सांभाळून बोलतात , अगदी cautious .

सरकारी नोकर काहीच बोलत नाहीत .

परदेशात राहणारे पण मोजून मापून बोलतात .

एक observation .








आतले आणि बाहेरचे :==

बऱ्याच वर्षांपूर्वी एक कथा आली होती 'आतले आणि बाहेरचे '

एका ट्रेन मध्ये एका माणसाला चढायचं असतं , ट्रेन मधली माणसं त्याला आत येऊ देत नाहीत , दार आतून बंद करतात , कसाबसा हा चढतो .

मग अजून माणसे येतात मग हा पण त्या लोकांना चढू देत नाही , कारण हा आता आतला झालेला असतो आणि आता बाहेरचे त्याला नको असतात .

****************************************************************

आपल्या दैनंदिन जीवनात पण आपण system च्या आतले आहोत का बाहेरचे ह्यावर आपला दृष्टिकोन असतो .

एखाद्या कंपनीचा मालक कंपनीचे प्रॉफिट वाढवायला कामगारांकडून कमीतकमी पैशात जास्तीत जास्त काम काढून घेईल , कामगार लोक जास्तीतजास्त पगार व बेनेफिट मिळवायचे प्रयत्न करतील . दोघांचे equation एकमेकांना पटले तर कंपनी चालेल नाहीतर बंद पडेल .
मालकाने कमी पगार दिला तर कामगार सोडून जातील आणि कामगारांनी फारच त्रास दिला तर मालक कंपनी बंद करेल .

समजा मी कस्टमर आहे , तर मला जास्तीत जास्त सुविधा किंवा वस्तू कमीत कमी पैशात हव्या असतात पण देणार्याला त्या किमतीत परवडत नसलं तर तो quality खराब करेल , त्याने दोघांना त्रास होईल .

समजा कोणाला लोकांना जेवण द्यायचे आहे , तो काँट्रॅक्टरला पैसे अजून कमी करा , अजून कमी करा सांगतो , मग कॉन्ट्रॅक्टर पण बेक्कार जेवण देतो .

समजा मी कुठल्या कंपनीचे shares घेतले आहेत तर माझी अपेक्षा असणार कि त्या कंपनीने मला प्रॉफिट काढून द्यावा पण त्यांच्या गिऱ्हाईकांची म्हणणे असेल कि स्वस्तात माल मिळावा .

शेतकऱ्यांना वाटते कि आपल्या मालाला जास्तीतजास्त भाव मिळावा पण लोकांना वाटतं कि धान्य , भाजीपाला दूध स्वस्त मिळावे . हे महाग झाले कि ते कमी जेवतात किंवा शिळं खातील .

सासूला वाटते कि सुनेनी जास्तीतजास्त काम करावे , सुनेला तसे आजिबात वाटत नाही , समजून नाही घेतलं कि आहेच पुढचं .

हे अगदीच सोप्पं झालं . प्रत्येक गोष्टीची link , chain असते .

कोणी एकाने जास्त हिसकावलं किंवा अडवून धरलं तर सगळी लिंक खराब होऊ शकते .

कुठल्याही व्यायसायाची किंवा बिझनेस ची ताकत नुसत्या प्रॉफिट वर नसते तर तो वर्षानुवर्षे , पिढ्यानपिढ्या चालू राहिला पाहिजे .

जुन्या मुंबईत वालधुनी , Princes street , मंगलदास मार्केट , हिंदमाता मार्केट कितीतरी पिढ्या चालू आहेत . जुने गिर्हाईक कुठून कुठून येतात , तेच नवीन कस्टमर घेऊन येतात . फार माफक भाव असतो .

काही वर्षांपूर्वी आपल्याला फायदा आहे म्हणून जवळच्या ओळखीच्या लोकांना , मित्रांना चुकीच्या ठिकाणी investment चे सल्ले दिले गेले , त्या व्यक्तीला तेंव्हा प्रॉफिट झालं पण सगळ्यांचे संबंध तुटले आणि नाव पण खराब झाले .

फार तुटेपर्यंत ताणू नये , जरा समजुतीने घ्यावे .

तो अमिताभ बच्चन एकदम शहाणा आहे , कुठल्याही जाहिरातीत दिसतो . एकदा म्हणाला होता ' Any transaction should be affordable ' . परवडलं आणि पटलं तरच व्यवहार होतात . तो पैशासाठी अडवत नसेल , त्रास देत नसेल आणि वर cooperate पण करत असेल , मग सगळ्यात जास्त busy तोच असणार .


रात्री जागणारे * सकाळी उठून बसणारे
दुपारी झोपणारे * दुपारी फ्रेश असणारे व कामे करणारे
सकाळी फ्रेश * संध्याकाळी फ्रेश
veg * nonveg
झोपताना AC , पंख लागणारे * आजिबात काही नको असलेले
गरम चहा पिणारे * चहा गार झाल्यावर पिणारे
अशा लोकांचे एकमेकांशी आजिबात पटत नाही पण उप्परवाला अशाच जोड्या जमवतो

Tuesday, May 30, 2017

8-4-17

ऊन आहे, ऊन आहे, किती ऊन आहे  !! खूप म्हणून झाले , आता एप्रिल मध्ये ऊन असणारच .

One should take advantage of the  ऊन .

मी घातले पांघरुणं , ब्लॅंकेट  सगळे उन्हात ठेवले ४-५ तास , मस्त कडक झालेत . ऊन is the best disinfectant . काही वास वगैरे असतात ते पण जातात .

हॉस्पिटलच्या पण गाद्या , चादरी , ब्लॅंकेट  उन्हात घातले .


आमच्या सासूबाई तर उन्हाळ्यात काय काय करायच्या ! , त्यांचा तर timetable असायचा . बटाटयाचा कीस , पापड्या , पापड, आणि अजून बरंच काही . हल्ली सगळं मिळत बाजारात म्हणून घरोघरी करणं कमी झालंय , पण मजा यायची दिवसभर . ते उन्हात घालायचं , मग संध्याकाळी आत आणायचं . राखण करायची .

अंबाजोगाईला तर प्रचंड आंबे , शेकड्याने . तिकडे रस काढून आटवून , त्याच्या पोळ्या करून उन्हात वाळवून ठेवायचे .

कुरडया ,पापड्या , सांडगे , भरल्या मिरच्या  काय काय करायचे .

उन्हाळ्यात कधी करमलं  नाही असे झालेच नाही .