Sunday, May 21, 2017

14-7-17

कल्याणच्या जवळ नेतिवली जवळ एक airstrip आहे . British लोकांनी बांधलेला आहे 


Navi Mumbai मध्ये नवीन airport बांधायचे बऱ्याच दिवसांपासून घाटत आहे पण प्रगती काही नाही कारण जागाच चुकीची आहे . त्या जागेतून २ नद्या जातात . त्यांचा प्रवाह बदलावा लागेल . 


त्या नद्यांचं काही सांगता येत नाही . त्या मनाला येईल तसं वागतात . एखाद्या दिवशी plane मधून उतरायचो आणि नेमकं नद्यांना पूर येऊन वाहून जायचो . 

तर कल्याण जवळच्या airstrip चा विचार व्हावा.  British  लोकांचं एक आहे . त्यांचा जागेचा choice अफलातून आहे . काय एक एक जागा निर्माण केल्या आहेत . ह्या airstrip कडे कल्याण मधून यावे लागणार नाही . पनवेलहून शिळ फाट्याहून येता येईल . 
मनात आणलं तर होऊ शकेल . कल्याणच्या लोकांना job opportunities खूप होतील ,development पण होईल . मुंबईच्या airport वरचं load पण कमी होईल . 

11-7-14

'बेटी बचाव ' योजने साठी काय करता येईल ?

ज्या बाईला फक्त मुली आहेत तिला नातेवाईकांनी ,शेजाऱ्यांनी ,सगे-सोयर्यांनी टोमणे मारणं बंद करावे . 
"असता एक मुलगा तर बरं झालं असतं "
"वंशाला दिवा नाही " वगैरे वगैरे . 
असं बोलणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे . 

त्या बाईला आपल्या मुलींबरोबर आनंदाने राहायचा हक्क आहे . 
अशा कुटुंबांना आजूबाजूचे टोमणे मारून नकोजीव  करतात . अशाने ती बाई सतत depressed राहते व मुलींकडे नीट लक्ष देत नाही . घरात सर्व असून पण उदासी असते . हे आधी बंद झाले पाहिजे . 

2-7-14

Prime Minister Narsimha Rao १९९१----१९९६ मध्ये सत्तेवर होते . Manmohan Singh तेंव्हा Finance minister होते . त्यांनी economy open up केली तेंव्हा पासून आपला देश बदलून गेला . 
Lifestyle बदलली , computers आले , It parks आले , fast foods आले ,प्रचंड पैसा आला आणि सगळे जग open झाले . 
आपल्या पद्धतींना कंटाळलेल्या लोकांनी पटापट दुसऱ्या देशातल्या पद्धती उचलल्या . आपला देश म्हणजे बावळट , इथे काही scope नाही ,कमवायचे ते dollar मध्ये ,. खूप लोक परदेशात जॉब्स साठी गेले . ते जेंव्हा परत यायचे तेंव्हा "तिकडे असं असतं ,तिकडे तसं असतं " खूप कहाण्या सांगायचे . इथे "India मध्ये काही सुधारणा नाही ……. वगैरे वगैरे ".  इथे राहिलेल्या लोकांना तिकडे २४ तास light आणि पाणी असतं आणि रस्ते चांगले असतात ह्याचंच कौतुक . 

Foreign च्या गोष्टी घेताना सगळ्या वरवरच्या घेतल्या  pizza burger घेतला , jeans and T - shirt , perfumes ,chocolates ,cars  हां आणि  दारू पिणं घेतलं . हल्ली  तर कुठल्याही २ माणसांना दारू प्यायल्या शिवाय बोलताच येत नाही . 
आहार shastra , दिनचर्या ,ऋतुचर्या काही राहिलंच नाही . 
मागे patient लोकांचे जगणे सोपे होते व आजार पण बहुतेक सोपे होते , फार औषधं लागायची नाहीत आणि खर्च पण यायचा नाही . 
आता बहुतेक patient लोकांना diabetes . BP , cholesterol , kidney , acidity ,constipation problems असतात , psychiatry ,skin , dental ,homeopathy , आयुर्वेद हे  side by side चालूच असतं . घरातली tensions असतात आणि वेळ पण नसतो . त्यातून त्यांना बरं करायचं असतं . त्यातून ते पथ्य पाळत नाहीत , औषधं नीट घेत नाहीत , papers सांभाळत नाहीत . सारखे doctor बदलतात  आणि पुढच्या डॉक्टरला आधी काय झालंय हे सांगत नाहीत . आजकाल practice करायची म्हणजे पोटात गोळाच येतो . 
एक उदाहरण सांगते --एक २० वर्षाची ८०kg  वजनाची मुलगी आली होती , घट्ट synthetic material चा top आणि घट्ट jeans , आई वडील दोघं खूप कमावणारे ,दोघांच्या बोलण्यात माज , तोच माज मुलीच्या बोलण्यात . त्या मुलीला सबंध अंगावर खूपच skin infection झालं होतं , तिला सांगितलं treatment देते पण जरा सैल cottonचे कपडे घाल , उन्हाळा प्रचंड आहे आणि मसाल्याचे आणि तेलकट पदार्थ खाऊ नको . ती म्हणाली महागाची औषध देना म्हणजे हे करायला नको . 
Patient बरोबर communication करता आलं तर कितीतरी operations सहज पार पडतात आणि नाही झालं तर छोट्या छोट्या गोष्टी पण बऱ्या होत नाहीत . 

आजकाल बहुतेक मुलींना स्वयंपाक येत  नाही , शिकण्याचा कंटाळा , सासूशी पटवून घ्यायचा नाही . लग्न होतात ,मुलं होतात पण त्यांना काय खाऊ घालायचं ,कसं सांभाळायचं माहीत नसतं , मग  ती मुलं सारखी आजारी पडतात ,किरकिर करतात , शांत झोपत नाहीत , वाढ नीट होत नाही मग  सारखं  डॉक्टर कडे न्यायचं  आणि  बिलं भरायची . 
डॉक्टर ना दोष देणं ही पद्धतच पण त्यांची बाजू पण आहे. 

Saturday, May 20, 2017

6-8-14

आपल्या देशात बिगर शेतकऱ्यांना शेतजमीन विकत घेता येत नाही . फार पूर्वी हा कायदा शेतकऱ्यांना कोणी फसवू नये म्हणून केला गेला होता . हे थोडेसे काश्मीर सारखेच वाटतय . 
आता भारतात प्रचंड पैसा काही investors कडे तरी आहे . ते परदेशात invest करत आहेत . 
अशा investors ना शेती घेता आली तर पैसा येईल , नवीन technology आणता येईल . शहरातले लोक गावाकडे आले गेले तर त्यांना ग्रामीण भागात interest निर्माण होईल व आपले resources अजून efficiently कसे वापरता येतील यावर विचार व कृती होईल . 
मूळ शेतकऱ्यांना नुकसान न पोचवता हा कायदा modify करता येऊ शकेल का?

खूप नवीन opportunities , creativity व action होऊ शकेल 

16-6-14

खूप वर्षांपूर्वी डॉ मोहन आगाशे कल्याणला एका कार्यक्रमाला आले होते . त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलेले २ points आठवले .

 १) Young असताना अंगात शक्ती खूप असते ,absorbing capacity खूप असते आणि वेळ भरपूर असतो . तेन्ह्वा खूप वाचलं पाहिजे , खूप गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत आणि स्वतःला develop केले पाहिजे . 

पुढे वेळ मिळत नाही व नवीन शिकणे होत नाही . 

२)माणसाला नेहेमी २ professions असले पाहिजेत , त्याने perception चांगले येते  व personality चांगली होते व एका profession चा दुसऱ्यात उपयोग होतो .  
एक   प्रश्न मला 'Lagaan 'बघताना पडला होता . Aamir Khan ला नाच करताना चांगली  हट्टी कट्टी  माणसे मिळाली होती  मग cricket साठी लुळे-पांगळे का घेतले ?
या घरचं रोप त्या घरी रुजलं पाहिजे . मागे मुलींना तुम्ही दुसऱ्या घरी जाणार आहात हे सतत सांगितलं जायचं त्या प्रमाणे कामाचं training दिलं जायचं . मुलगी ही जर export होणार असेल तर तिच्या qualities पण export qualities पाहिजेत , 
याचा अर्थ असा नाही कि सासरच्यांनी मुलीला कसही वागवलं  तरी काही करु नये ,पण सारखे मोडणारे संसार बघून वाईट वाटते .