Friday, July 21, 2017

नवीन शोध ;--

टीव्ही  समोर बसले होते , हातात मोबाईल होता त्यात youtube  चालू होतं . टीव्ही चालू केला आणि चुकून मोबाईलचे बटण दाबले गेले तर  मोबाईल वर चालू असलेला विडिओ टीव्हीवर दिसू लागला . 

अरेच्चा असे कसे झाले ?

तर घरात वायफाय आहे आणि तुमचा टीव्ही वायफाय  enabled  असेल तर मोबाईल मधले youtube चे विडिओ 'Watch on tv ' चे बटण दाबून टीव्हीवर बघता  येतात . 

***************************************************************************

Today's discovery .
Sat in front of the tv and switched it on , I had my mobile in my hand and something on youtube was going on . Inadvertently pressed a button and the video was displayed on tv !!
So if you have wifi and a wifi enabled tv , you can project youtube videos on tv by pressing a 'watch on tv button '.
Maybe this is an old thing but I discovered it today and I am thrilled .

Tuesday, July 18, 2017

एकदा husband ला म्हटलं चल तुला नवीन शर्ट घेऊ . तो as usual "कशाला ? काही नको " असं म्हणाला . मलाच हौस म्हटलं चल ठाण्याला जाऊ ,एवढे mall झालेत चल .
By the way --ठाणे माझे माहेर --आणि जगातले बेस्ट शहर --कारण एक तर ते माझे माहेर आहे , आता तिथे कोणी नाही पण अजूनही मला ठाण्याला जायचं म्हटलं कि प्रचंड आनंद होतो .
ठाण्याचा layout सोपा आहे आणि तिथे कामं पटापट होतात .
...
तर मग आम्ही mall मध्ये branded शर्ट घ्यायला गेलो . तर तिथला एकही शर्ट त्याला होईना , मोठी size फारच सैल , लहान size फारच घट्ट . बरंच हिंडलो पण सगळीकडे तेच .
त्याच्या भाषेत तो 'तुंदिलतनू ' आहे , म्हणजे ढेरीवाला . ती ढेरी काही आता जाणार नाही . आणि त्या mall मधले salesman वयाने कमी ,एका पेक्षा एक बारीक बारीक , नुसती हाडं हाडं , ते अश्या विचित्र नजरेने बघायचे .
आमचा गडी हिरमुसला , थोडा फुगून बसला . आता काय करायचं ?
मी आणलं होतं मग आता ?
मग म्हटलं थांब आपण माझ्या ठाण्यात जाऊ . आम्ही नौपाड्याला गेलो . तिथे गोखले रोड , राममारुती रोड वर जुनी readymade ची दुकाने आहेत तिकडे जाऊ .
मग अशाच एका दुकानात गेलो .कुणीच नव्हतं ,आम्हीच .
Salesman वयाने मोठा होता .
त्याने अंदाज घेतला , AC लावलं , थंड मागवलं , बसायला दिलं (Mall मधे बसायला जागा नसते )
मग त्याने एक एक शर्ट दाखवायला सुरुवात केली . अहा !, काय variety होती . आणि सगळे बरोब्बर मापाचे . मस्त designer ,fitting ला perfect .
मी विचारलं तुमच्याकडे कसे काय , mall मधे आजिबात मिळाले नाहीत . तो म्हणाला तुमच्याकडे बघूनच मला कळले कि तुम्ही तिकडून आलात . आम्ही हे खास आपल्या लोकांची मापं असतात तसे बनवून घेतलेत .
Customerला समजून घेऊन service देणं आणि आम्ही करतो तेच बरोबर असं म्हणून आपले products माथी मारणं हे दोन्ही बघितलं .
हे जुने दुकानदार फार हुशार आहेत , उगाच नाही एवढे mall झाले तरी त्यांना टक्कर देत उभे आहेत.
आमचे काम झाले , आमचा गडी खुश झाला . आणि मी पण ठाण्यासारखे जगात शहरच नाही हे पुन्हा पुन्हा म्हणायला मोकळी झाले .

गुरुपौर्णिमा

आम्ही सर्जरी पोस्ट करत असताना बॉस लोक मोठ्या कॉम्प्लिकेटेड केसेस करायचे , मग कमी कठीण थोड्या जुनिअर लोकांना आणि सोप्या अगदी नवशिक्या लोकांना . उतरंड असायची .

शिकत असताना सोप्पी ऑपरेशन्स पण कठीण वाटतात मग हळू हळू जमत जातात मग जशी प्रगती करता तशी मोठी मोठी ऑपरेशन्स वाट्याला येतात .

...

एकदा आमच्या बॉसने अगदी सोप्पं ऑपेरेशन केलं , ते इतकं छान केलं , अगदी नजाकतीने . कधी सुरू झालं आणि कधी संपलं कळलं सुद्धा नाही. इतकं स्टIयलिश ? आम्हा जुनिअर लोकांना अचंबाच वाटलंI होता.

तेंव्हा आमचा एक सिनिअर म्हणाला होता " किती वर्षाची तपश्चर्या असते तेंव्हा कुठे ही सहजता येते , मुद्दाम मोठे लोक सोप्प्या गोष्टी कशा करतात ते बघायचं कारण आपल्याला त्या कळत असतात , आणि त्या सोप्या गोष्टी ते किती अप्रतिम करतात ते टिपायचं कारण आपल्याला ती लेव्हल गाठायची आहे.

Always have high aims in life , the struggle to reach there is very interesting and satisfying.

आयुष्यभर शिकणे आणि शिकवणे यापेक्षा आपल्या गुरूंना दुसरी काय मानवंदना देऊ शकतो ?

एक पेशंट आला , चांगला दांडगा मिशावाला . पोटात दुखतंय म्हणून परस्पर सोनोग्राफी करून आला होता . यात त्याला cholelithiasis होतं म्हणजे gallbladder मध्ये खडे होते आणि तिथेच दुखत होतं .
त्याने विचारले काय झालंय ?
Gallbladder मध्ये स्टोन्स आहेत.
...
मग ?
ऑपेरेशन करावं लागेल .
कुठलं ?
Cholecystectomy .
म्हणजे काय ?
पित्तIशयाच्या पिशवीत खडे झालेत , तिथेच दुखतंय म्हणून ती पिशवी काढावी लागेल .
नाही काढली तर ?
दुखत राहील आणि अजून वेगळे प्रॉब्लेम पण होऊ शकतील .
खडे विरघळणारे औषध द्या. मला पिशवी काढायची नाही
असं औषध नसतं ,ऑपेरेशनच करावे लागेल . तात्पुरतं दुखणं कमी व्हायचं देता येईल .
पण असं औषध देणारे असतात , आहेत .
मला तरी माहीत नाही .
मग तो माझ्याकडे संशयाने पाहू लागला . त्याला वाटलं असेल की आपण बरे सापडलेली दिसतोय , मुद्दाम औषध देत नाहीयेत , ओपरेशन सांगत आहेत पैसे काढायला . तो एवढा दांडगा माणूस संशयाने माझ्याकडे बघत होता .
मग म्हणाला " मी ऐकलंय की पिशवी काढल्यावर त्रास होतो . मी माझी पिशवी काढू देणार नाही
छे , आजिबात नाही उलट तुम्हाला त्रास होतोय तो जाईल .
एक नाटक पण आलं होतं त्यावर .
कधी ? Cholecystectomy वर ? मला नाही माहीत . म्हटलं ह्याच्या डोक्यात काय आहे देवजाणे .
हो आलं होतं . डॉक्टर एकI पेशंटची पिशवी काढतात मग तिला त्रास होतो . मी माझी पिशवी काढू देणार नाही .
अहो ती गर्भाशयाची पिशवी ,ती बायकांनाच असते , तुमचं वेगळं आहे, तुम्हाला काही नाही होणार .
पण त्याच्या डोक्यात संशयाचं भूत चांगलंच जोरदार होतं .
हा एवढा राक्षसी चेहऱ्याचा माणूस समोर बसून " मी माझी पिशवी काढू देणार नाही " म्हणत असताना खरं तर मला जाम हसू आलं , हसले असते तर त्याला राग आला असता आणि त्याने एक पंच मारला असता तर मी गIरदच झाले असते .
मग ?
मला ऑपेरेशन करायचं नाही .
ठीक आहे .
अशा पेशंटना जास्त समजवायला गेलं तर त्यांना जास्तंच संशय येऊ लागतो .
मेडिकलच्या जगावर नाटकं सिनेमे येतात पण त्यातून आम जनता त्यांना हवा तो अर्थ काढते आणि जास्तच confuse होते .

Saturday, July 15, 2017

माझ्याकडे २ मुली नोकरी मागायला आल्या होत्या, साधारण २० वर्षाच्या . १०वि पास ? दिसायला स्मार्ट होत्या , आम्हालाही गरज होती म्हणून ठेवल्या . कुणी आलं तर या बसा करतील ,नाव लिहून घेतील ,थोडा हिशोब लिहितील आणि Xerox काढून आणतील एवढी माफक अपेक्षा होती .

मग कळलं मराठी येत नाही ,English च तर नावच नको , आकडे लिहिता येत नाहीत , ३२५ --३००२५ असा लिहिलं कागद punch करायला सांगितले तर एकेका कागदावर खूपच भोकं पाडून ठेवली . काही बोललं तर राग पटकन येणार , आपल्याला येत नाही तर शिकून घ्यावं हे... तर आजिबातच नाही .

नखरे , mobile, boyfriend ला phone हे व्यवस्थित .

एवढे advanced dumbo पहिल्यांदाच पहिले . मलाच २ सापडल्या तर अजून किती असतील ?

ह्या मुलींना कोणी काहीच शिकवलं नाही , शाळेत नाही आणि घरी पण नाही .

मी दम भरला तर माझ्याशीच खूप भांडल्या .

मी काय फार तर कामावर ठेवणार नाही , पण त्यांच्या फायद्या साठी तरी त्यांना आलं पाहिजे .

मला वाटतं असे कमी IQ चे असतील , त्यांना लिहिणे वाचणे आणि बेरीज वजाबाकी येव्हाड्यचीच शाळा असावी , बाकी जशी प्रगती दाखवतील तसं शिकवावं .

त्या कदाचित स्वयपांक चांगला करतील , मुलं चांगली सांभाळतील किंवा कलाकुसरीची कामं चांगलं करतील किंवा अजून काही ,पण ते त्यांचं त्यांनाच किंवा त्यांच्या आईवडिलांना शोधावं लागेल .

किंवा ultimate लग्न करून टाकतील .

Thursday, July 13, 2017

हल्ली मुलं दोन -अडीच वर्षाची झाली कि त्यांना playgroup , nursery च्या शाळेत पाठवतात . बहुतेक घरात भावंड नसतं किंवा सांभाळायला कुणी नसतं किंवा जर दुसऱ्या मुलांची ,माणसांची सवय व्हावी हे पण कारण असतं .

पण मुलं अजून छोटी असतात , प्रतिकार शक्ती (immunity )पूर्ण विकसित नसते . ती ५ वर्षांपर्यंत होते . म्हणून Immunisation ५ वर्षांपर्यंत चालतं (पुढे पण असतं पण ५ वर्षांपर्यंत महत्वाचे ).

या वयात मुलांना अधूनमधून आजारपण येतच असतं . थोडी तब्येत नरमगरम वाटली , रडू रडू करत असेल , अंग ...थोडं कोमट ,थोडी सर्दी असं असेल तर शाळेत पाठवू नये .

घरी एक दिवस राहिले , गरम वरण भात खाल्ला , चांगली झोप झाली कि बरे होतात.

बरं नसताना शाळेत पाठवलं कि एक दिवसाचे दुखणे ४ दिवसांवर जाते . त्या पेक्षा एक दिवस बुट्टी मारलेली बरी .

आणि अशी आजारी मुलं शाळेत आली कि अजून १०-१२ मुलं cross - infection होऊन आजारी पडतात .

मुलं सारखी सारखी आजारी पडली तर तब्येत कमजोरच राहते , पुढे मोठेपणी त्रास होतो .

मुलाच्या आईला नोकरी असेल तर तिला पण दांड्या मारून चालत नाही . तर मुलं होऊ द्यायची असतील तर backup चांगला पाहिजे .

त्यामुळे political कारणासाठी तरी माता लोकांनी घरातल्या senior मंडळींशी संबंध चांगले ठेवावेत . अशा वेळेला उपयोगी पडतात .

काल एक पेशंट येऊन माझ्याशी बरीच भांडून गेली .जुनी पेशंट आहे ५०+. ७-८ महिन्यांनी आली होती.
आली तीच आक्रमक " मला असं सारखं सारखं का होतं ?"
" काय होतं?"
"सारखं पोट बिघडतं , माझ्या सगळ्या टेस्ट करा "...
सारखं म्हणजे कधीपासून ?
झाला १ महिना
बऱ्याच दिवसांनी आलात मग एवढे दिवस बऱ्या होतात का ?
हो बरी होते .
मग आता काय झालं एवढं एक महिन्यात ?
अहो हा पावसाळा सुरू झाल्यापासून दर रविवारी आम्ही मॉन्सून पिकनिनला गेलो , तर माझं जरा वेडं वाकडं खाणं झालंय आणि २ दिवसांपूर्वी कटलेट केले होते ते खूपच खाल्ले आणि तेंव्हा पासून पोट टम्म झालंय .
अहो अपचन झालंय , Infection झालं असेल , treatment केल्यावर होईल बरं .
नाही माझ्या सगळ्या टेस्ट करा , मला असं का होतं .
अहो कितीतरी वेळा टेस्ट केल्यात , सगळ्या नॉर्मल येतात , आणि नॉर्मल आल्या की परत तुम्ही येऊन माझ्याशी भांडता , सगळ्या टेस्ट नॉर्मल असून मी का आजारी पडते .

मग आता मी काय करू ?
हे बघा तुम्ही आता ५०+ आहेत , या वयात पचनशक्ती कमी होते , तर तब्येतीला झेपेल एव्हढंच खा .
मग मी काय मजा करायची नाही का ? काही खायचं नाही का ?
अहो मजा करा पण झेपेल एवढीच करा , तुम्ही नेहेमी जसं खाता पिता तसं सांभाळत करा मग बऱ्या राहाल . काहीकाही जणांना उलटं सुलटं वागलं तरी त्रास होत नाही काही जणांना होतो . प्रत्येकांनी आपापलं सांभाळावं .
मग मी खाऊ तरी काय ?
पुन्हा तेच , आता ५०+ बाईला काय खावं काय नको हा सल्ला द्यायचा म्हणजे कठीण आहे .

मला त्या बाईचं दुःख कळलं , तिला कसंही वागायचं आहे , पथ्य पाळायचं नाही आणि आजारी पण पडायचं नाही आणि आपल्याच चुकीमुळे आपण आजारी पडलो हे मान्य करायचं नाहीये आणि सगळं ठपका डॉक्टरांवर टाकायचाय .
ऐसा नही होता है । फिर डाक्टर के चक्कर लगIने पडते है ।

मी एक पाहिलं आहे , जे लोक नियमितपणे वIरीलI जातात ते असे आजारी पडत नाहीत , आमच्या ओळखीचे असे लोक आहेत . त्यांचं endurance , immunity चांगली असते आणि ते सांभाळून जगतात .