Tuesday, June 13, 2017

ज़िंदगी में प्यार का पौधा लगाने से पहले ज़मीन परख लेना दोस्तों..
हर एक मिटटी की फितरत में वफ़ा नही होती..
*
*...
*
तलाश सिर्फ सुकून की होती हैं...

नाम रिश्ते का चाहें कुछ भी हो...
*
*
*Copied from here and there.....

आमचं लग्न झालं तेंव्हा आमच्या सासूबाई ज्या वयाच्या होत्या त्या वयाची मी आता आहे . ५४ .

त्या एकदम सुगरण होत्या , अन्नपूर्णा , काहीही केलं तरी चविष्ट व्हायचं . त्यांच्या हाताखाली काम करून मी पण बरंच शिकले . दम पण खूप भरायच्या , पण माझी आईच मला एवढी फायरिंग द्यायची कि ह्यांचं दम भरणं मला नॉर्मल वाटायचं . It's ok type . पुन्हा मेडीकलला बोलणी खाण्याला अंतच नसIयचा त्यामुळे कधी मनावरच घेतलं नाही .

हल्ली जरI बोललं कि काय राग येतो लोकांना , फारच झालंय मानपान .

...

तर असो !

तर मी साखरांबा केलाय . सासूबाई कैरीचा कीस काढून त्याचI साखरांबा करायच्या आणि त्यात वेलदोडे घालायचे आणि फोडी करून गुळांबा करायच्या त्यात लवंग घालायची .

मी एकाच केलाय दीड किलोचा ,साखर पण घातली आणि गुळ पण घातला , वेलदोडे, लवंग केशर सगळं घातलं, मस्त झालाय .

ह्यात एक tip आहे , कैऱ्या किसून झाल्यावर , साखर , गुळ जे काय घालायचं असेल ते घालून एक-दीड तास तसेच ठेवायचे म्हणजे साखर मुरते नाहीतर कैऱ्या आणि साखर गुळ एकजीव होत नाहीत .

काहीजण एक पाऊस पडल्यावर करतात, काही आधी --Two schools of thought . पाऊस पडल्यावर केला तर म्हणतात जास्त टिकतो पण मला वाटतं कैऱ्यांचा करकरीतपणI कमी होतो आणि पाऊस पडल्यावर चिखलात जाऊन आणायला कंटाळा येतो .

So that's that ......

नवीन मुलींनी पण करायला हरकत नाही , सोप्पा आहे , आधी अर्धा किलोचा करायचा , जमलं तर मग जास्त . डरनेका नही करनेका । .

ह्याच्या मागचं logic असं असेल कि पावसाळ्यात बाहेर जायला जमलं नाही तर घरात जरI चवीसाठी असावं. आता लोणचं पण करणार आहे . हल्ली विकत सगळं मिळतं पण आपण करायची गम्मत वेगळीच .

काल  आमच्या मेडिकल क्लबच्या कार्यक्रमात कल्याणचे  DCP शिंदे साहेब आले होते . 
पोलीस खात्यात बरेच बदल होत आहेत . 
काही पोलीस स्टेशनची  अवस्था अगदी वाईट होती ,त्यांना चांगल्या जागा मिळवून दिल्या आहेत 

पोलिसांना लोकांशी communicate , संवाद साधण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे . 

पोलीस स्टेशन वर कुठल्या  कुठल्या सेवा मिळतात हे फलक लावण्यात आले आहेत . 

कोणी पोलीस स्टेशनला गेले तर एक संपर्क अधिकारी असतो , तो त्यांना योग्य त्या अधिकाऱ्याकडे  पाठवतो . 

पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना एक feedback form  भरून घेतला जातो आणि दुसऱ्या दिवशी डिपार्टमेंट कडून फोन जातो कि तुमचं काम झालं का ? अनुभव कसा होता ?


ह्या साठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबानी पण विशेष कौतुक केलं . 

व्वा !! फार छान . 

असे बदल झाले तर आम जनतेला मोठा दिलासा मिळेल 

मला ते क्रिकेट आजिबात आवडत नाही , आता नाही आवडत . काय करणार ?

ते क्रिकेट म्हणजे ' Waste of time , money and resources for a disproportionately small number of people '

फायदा म्हणजे खूपंच  माणसे एका जागी बसून राहतात आणि पैसा generate होतो . 

एकदा आम्ही  सगळे घरातले टीव्ही समोर बसून match बघत होतो . सासरे तर असे बघायचे मॅच अगदी डोळे घालून , कि आपली पापणी लवली तरी आभाळ कोसळेल  होईल !! हल्ली नवरा तसI  वागतो . 

मुलगा छोटा ३ वर्षाचा  मंIडी घालून बसला होता , बराच वेळ बघितलं बघितलं आणि म्हणाला बॅट बॉल  खेळतायत . 

मी जाम जोरात हसले , सासर्यांना खूप राग आला , म्हटलं छोट्या मुलांच्या तोंडून सत्य बाहेर पडतं . 

तर हे अवडंबर झालेलं आणि स्तोम माजवलेलं क्रिकेट . 

********************************************************************************

मुलींसाठी खेळायला ग्राउंड नाहीत , एक बाग होती कल्याणमध्ये मनोवी गार्डन , तिथे बिल्डिंग झालीय , अशी बागेत बिल्डिंग करतात काय ?

मुलींना खेळायला सुरक्षित जागा नाहीत म्हणून माता त्यांना बस घरात करतात , बसून बसून त्या बोजड होतात , शरीराची योग्य ती वाढ  होत नाही , स्नायू बळकट होत नाहीत , म्हणून मग कामं करताना कंटाळा येतो आणि सगळ्यात शेवटी डेलिव्हरीच्या वेळेला कळI  सोसवत नाहीत आणि देववत नाहीत , प्रत्येक कळेला गगनभेदी किंकाळी फुटते  , मग डॉक्टर सीझर करतात आणि लोक डॉक्टरांच्या नावानेच ठणाणा करतात . 

मुलींसाठी ग्राउंड हवेत , सायकल चालव , पकडापकडी , खोखो , लंगडी असे  खेळ खेळल्या तर हातपाय मोकळे होतात , भूक लागते , शरीर बांधेसूद रहाते  आणि नैसर्गिक फिटनेस राहतो . अभ्यास करायलाच हवा पण शरीराला पण व्यायाम हवा . 

ह्यासाठी townplanning वाल्या लोकांनी विचार करायला हवा , दिसली मोकळी जागा कि देऊन टाक बिल्डरला असे करू नये . पुढच्या पिढीचा पिढीचं पण विचार करावा . 










So  पावसाळा has set in officially , time to move on !!

आपल्याकडे ऋतू बदलले कि rules बदलतात . 

आधी wardrobe बदलायचा , उन्हाळ्यात जे cotton चे ड्रेस व साड्या स्टयलिश वाटायच्या ते आता अगदी मान टाकल्यागत होऊन जातात , personality अगदी डाउन होते . 
सिल्कला तर हातंच  लावायचा नाही , भिजले तर गेले . 
आता फक्त सिन्थेटिक , खराब होत नाहीत आणि वIळतात पण पटपट . 

ते सदा जीन्स घालून बसणारे काय करतील , भिजली तर दिवस  दिवस वIळत नाही . ते एक dryer मिळतं वेगळं , ते वॉशिंग मशीन बरोबर येतं ते नाही , वेगळं मिळतं . मस्त कोरडे होऊन येतात कपडे . 


आम्ही सिंगापूरला गेलो होतो , तिथे वर्षभर कधीही पाऊस पडतो . तिथे ते थ्री फोर्थ्स  पँट्स , pedal pushers घालतात , . प्रॅक्टिकल फॅशन . नऊवारी साड्या पण adjustable असतात 

आता आहारात बदल करायला हवा . आंबे बंद ,केळ्याचे  शिकरण चालू . पावसाळी आंबे असतात . 
पालेभाज्या बंद , वर लटकणाऱ्या भाज्या चालू , दोडकी , वांगी , पडवळ etc 

श्रIवणात  ती कोवळी कोवळी रताळी येतात , फार छान लागतात , कीस फार छान होतो मऊमऊ . 

Looking forward to enjoying पावसाळा !!!

मी '८९ ला प्रॅक्टिस सुरु केली . सुरुवातीचे काही महिने सामसूमच होती मग हळूहळू प्रॅक्टिस वाढू लागली . पैसे जमू लागले . 

मी माझे पैसे  माझ्या पर्स मध्येच ठेवायची , आणि काय व्हायचं कुठे चांगला ड्रेस दिसला कि घे , साडी घे , पर्स घे असं व्हायचं . जमवलेले पैसे काही क्षणात गायब . बरच दिवस हे असं चाललं होतं . मग एकदा म्हटलं हे काही बरोबर नाही , अशाने आपण कफल्लकच राहू . 

कुछ तो करना पडेगा !

बँकेत अकॉउंट काढून पैसे भरणं कंटाळवाणं होतं . 

मग नवऱ्याने एक आयडिया सांगितली   'Daily collection ' 
तेंव्हा आमच्या सारखे daily income वाले खूप होते , तर बँकेचेच लोक daily कॉलेकशनला यायचे . तुम्ही जमतील तसे द्या . रोज १००/२०० ( तेंव्हा आकडे असेच होते ) 

मग ते बरं पडलं , रोज थोडे पैसेबजूला टाकायचे . एक वर्षाचे अकाउंट ,वर्षाने पैसे मिळायचे . मग त्यातून काही मोठं घेता यायचं . हळूहळू instruments घेत गेले , स्कूटर घेतली आणि मजा म्हणजे हॉस्पिटलची जागा पण ह्या daily collection च्या पैशातूनच बुक केली . 

ह्यामुळे 'Fiscal discipline ' , आर्थिक शिस्त लागली .. 

एक डॉक्टर भेटले होते , छान प्रॅक्टिस आहे पण म्हणाले पैसे कुठे जातात कळतंच  नाही . आजकाल इंस्ट्रुमेंट्स एकापेक्ष एक भारी आले आहेत , एकदम sophisticated , बघितल्या क्षणी मोह होतो , घेतली जातात पण भयंकर महाग , त्यांचा maintainance , annual service चार्जे पण खुपंच असतो . . पैशाला काय वाट हव्या तेवढ्या फुटतात . 

ह्याचा फायदा कर्ज घेतल्यावर होतो , आधी कर्जाचा हप्ता , सगळी देणी , बिलं आणि पगार , उरलेले आपल्याला . 
वेळेवर कर्ज फेडलं तर क्रेडिट score वाढतो आणि परत विना अडथळे पुन्हा कर्ज मिळतं . 

आमचे डॉक्टर लोकांच्या बऱ्याच गोष्टी कर्जावरच  चालतात . 

आपल्याला हवे असतात तेंव्हा पैसे नसतात , मग कर्ज घ्यायचं आणि फेडायचं . 


बँक आपल्याला कर्ज देतात ते त्यांच्या कडच्या लोकांनी ठेवलेल्या ठेवीवर , कर्ज फेडलं नाही तर बँकI  बुडतील आणि ज्यांनी विश्वासाने पैसे ठेवले असती ते नुकसानीत  जातील .

जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांनी आर्थिक शिस्त लावून घेणे गरजेचे आहे , त्यातूनच ते मोठे होत जातात . छोट्या लोकांची काही union नसते , राजकीय पाठबळ पण नसतं , आपणंच आपली काळजी घायची असते . 















13-6-16

Lifestyle disordes :--

ह्या category खाली हल्ली खूपच आजार येतात , म्हणजे जीवनशैलीच्या चुकींमुळे होणारे आजार . जो पर्यंत जीवन शैलीत सुधारणा होत नाहीत तो पर्यंत हे बरे होत नाहीत .

पेशंटची जीवनशैली नेमकी कशी आहे हे त्यांनाच माहित असते , डॉक्टर काही त्यांच्या बरोबर नसतात , ते फक्त प्रश्न विचारू शकतात आणि सल्ले देऊ शकतात . बर्याच गोष्टी लोकांनी आपल्या आपणच बदलायच्या असतात .

...

नुसत्या औषध गोळ्यांनी हे आजार बरे होत नाहीत जो पर्यंत मूळ कारण जात नाही ,मग लोकांची चिडचिड सुरु होते . " एवढी औषधे घेतली तरी काही फरक नाही "

खरे म्हणजे हे आजार ओढवलेले असतात, आपल्या जीवन शैलीत बदल केला तर लगेच बरे होतात (जास्त झाले नसतील तर ) पण डॉक्टरांशी खरं बोलला पाहिजे आणि सांगितलेलं ऐकलं पाहिजे .

हल्ली बरेच पेशंट म्हणतात " फुकटचे सल्ले नका देऊ , मी काही बदलणार नाही , तुम्ही फक्त औषधं द्या , आणि पथ्य पाणी काही सांगू नका , करणार नाही "

१) हल्ली खूपच पेशंट पाय दुखतात म्हणून येतात , पाय दुखणं वेगळं आणि गुडघे दुखणं वेगळं . हल्ली बरेच लोक गाडीत . बसमध्ये किंवा tv ,कॉम्पुटर समोर खूप वेळ बसून असतात , बहुतेकांकडे आजकाल सोफा , dining table आणि पलंग असतो . म्हणजे पाय सतत खाली सोडलेले असतात , आणि कंबर हलत नाही . एकाच जागी एकाच position मध्ये अनेक तास बसून असतात .

त्याने गुडघ्या खाली पोटऱ्या असतात त्यात रक्तIचे चलनवलन कमी .किंवा बंद होते आणि मग पाय आदी जड होतात , सूज येऊ शकते आणि मग दुखू लागतात . तिथल्या रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि मग 'Varicose veins ' किंवा 'Chronic venous syndrome ' होतो .

खूप वेळ उभ्याने स्वयंपाक करणाऱ्या बायकांना पण हे होते .

बर्याच लोकांना कळत पण नाही कि आपले पाय दुखत आहेत , हे इतके हळूहळू होते कि लक्षातच येत नाही मग कधीतरी जाणीव होते कि इथे प्रोब्लेम आहे . ह्या लोकांना नुसतं थकल्यासारखा feel असतो .

ह्यव उपाय म्हणजे logical आहे कि एवढ्या वेळ एकाजागी बसू नये , मध्ये मध्ये चालून यावं किंवा पाय हलवावे , घोटे वरखाली करावे म्हणजे पोटरीचे स्नायू काम करतील आणि रक्त परत फिरू लागेल.

झाल्यावर treatment घेण्यापेक्षा preventive medicine वर भर दिला पाहिजे .

हा एक आजाराचा प्रकार झाला असे कितीतरी आहेत , एक पुस्तक पण लिहिता येईल