Wednesday, June 7, 2017

16-11-17

"काय करायचे आहेत एवढे पैसे ?"

आज हे वाक्य बऱ्याच वर्षाने ऐकलं .

मी surgery पोस्ट करत असताना (८७-८८) आम्हाला stipend मिळायचा , तो होता १९००/-. त्यातले आमचे २००/३००/- उरायचे . मग वाढून तो २३००/- झाला , तेंव्हा माझा colleague म्हणाला होता " इतना पैसा  लेके क्या करनेका ?"

मधल्या काळात हे असं वाक्य गायबच झालं होतं .

आज हे वाक्य परत ऐकलं . आमच्या बाजूला राहणाऱ्या एक बाई रांगेत उभं राहून ४५००/- घेऊन आल्या आणि कौतुकाने दाखवत होत्या , तेंव्हा त्यानाच शेजारी म्हणाले " तुम्हाला काय करायचे आहेत एवढे पैसे ?"

त्या पण म्हणाल्या " हो बरोबर आहे "

इति .....

17-11-16

मला वाटतं आता ह्या practical knowledge चे classes घ्यायला हवेत :--

१)  Management of finances .
2) Understanding law
3) Safe driving rules
4) Laws regarding marriage and divorce .
5) Home science
6) Baby care
7) Town planning
8) Taking care of your documents.

असं अजून कितीतरी .

आपल्याला कुठल्या गोष्टीतलं कळत नसेल तर ते समोरच्याला लगेच समजतं मग फसवलं जाण्याची शक्यता वाढते . माहिती आणि ज्ञान असेल तर  chances कमी होतात .

18-11-16

I came across a nice line " India is rebooting " .

Somewhere I have begun to feel that people are enjoying this.

खूप वर्ष आपलं तेच तेच चाललं  होतं  , तेच ते सणवार , तीच तीच जातीवरून भांडणं  , सगळं एकदम बंद .

Changing scenario :---

ज्या लोकांना पर्स मध्ये नोटांची गड्डी , इकडे तिकडे १-२ लाख आहेत , बाजूला एकI बॉक्स (सॉरी खोका ) मध्ये कोटी आहेत , याची सवय होती आतI त्यांच्या घरातले dialogue ------

" अगं माझ्याकडे ५६०/- आहेत , तुझ्याकडे किती आहेत ?"
" माझ्याकडे ३२०/- आहेत "
"तुला हवेत का , हे घे १००/-"
" अहो मला काय करायचे आहेत , तुम्हीच ठेवा . बाहेर जIल तर येतIना भाजी आणा १/२ किलो , आणि चिमणलाल कडून आणा , आपलं अकाउंट आहे त्याच्याकडे "
" आपल्या सखूबाईला ५०००/- advance दिला होता नं , तिने सांगितलं आहे  ५००/-चा  EMI  करा "
" काल चप्पल तुटली म्हणून चांभाराकडे गेले , त्याने २०/- मागितले , तर माझ्याकडे नव्हते , मी त्याला म्हटलं , सकाळीच शिरा  केला आहे , देऊ का ? , आर चालेल म्हणाला "


आमचे डॉक्टर लोक जे नोटांची पुडकी घेऊन घरी येत होते ते आता काय वाट्टेल ते घेऊन घरी येतील .

तांदूळ , तेलाचा डब्बा . एखाद्या काकूने दिलेले बेसनाचे लाडू , Tata sky recharge coupon. एखाद्या सुग्रण मावशींकडून १० दिवस रात्रीचा डब्बा पाठवायचे  वचन .

परवा   मलाच एका यवन ( म्हणजे मुसलमान ) पेशंटने , पैसI नाही है  , ये रखो हमारे बेकरी  के प्रॉडक्ट्स है म्हणून एक पिशवी दिली . त्यात सुपर quality चे , खारी , टोस्ट आणि वेगवेगळी नानकटाई होती . माझी खूप दिवसाची ब्रेकफास्ट आणि midnight snack ची सोय झाली .

" अगं परवा आपण अँपेंडिक्सचे ऑपेरेशन  केलं  ना त्याने इंदोरचे तिकिटं आणि हॉटेल बुकिंग दिलं  आहे . तो म्हणाला मीच जाणार होतो , तर तुम्ही ऑपेरेशन केलंत  , आता तुम्ही जा "
" अहो इंदोरला जाऊन काय करणार ? कुणी ओळखीचं  पण नाहीये "
" काय करायचंय ओळखीचं , आपणच जाऊ , नाहीतर आपण कशाला गेलो असतो ? आता हवा पण छान आहे , चल शहर बघू , तिथली खाऊ गल्ली प्रसिद्ध आहे तिथे जाऊ ,चोरल नदीची वळणं  पाहू , बापूभैय्या देवासकरांचा  वाडा आहे का पाहू , तुला मस्त इंदुरी साड्या  घेऊ !! चल "
अगं चल !!

( पुल देशपांडे यांचे 'तुझे आहे तुजपाशी ' वाचले असेल तरच काही references कळतील )





My dear friends , I am very happy to share with you that ....

फेसबुक वर मी 'मैत्र ' या ग्रुप मध्ये आहे . त्यांनी माझ्या एका लेखाला बक्षीस दिले आणि हे पुस्तक काल मला पोस्टाने आले .
खूपच आनंद झालंय  . खूप वर्षांने असे बक्षीस मिळाले आहे .

मी काही लेखिका नाही पण मनात येईल ते लिहिते . आतापर्यंतच्या माझ्या अनुभवविश्वातून जे share करावेसे वाटते ते करते .
मी लिहिते ते आवडतं आणि भरभरून दाद पण मिळते , त्यामुळे अजून हुरूप येतो .

या मैत्र ग्रुपची मी अत्यंत आभारी आहे.

आता आपला देश एका अभूतपूर्व अर्थक्रांतीतून जात आहे , त्या अनुषंगाने मला या पुस्तकाचे नाव पण समर्पक वाटले . अजून वाचले नाही . वाचल्यावर त्याबद्दल लिहीन .

ज्या लेखाला बक्षीस मिळाले त्याची लिंक देत आहे .

सुप्रभात
नमस्कार मैत्रगण
ऑक्टोबर महिन्यातल्या दोन सर्वोत्कृष्ट पोस्टच्या लेखकांची नावे आज जाहीर करताना मनापासून आनंद होतो आहे...
...
आपल्या या समुहावर खरोखरीच चांगले लेखन करणारे मैत्रगण असल्यामुळे कोणती पोस्ट निवडावी असा प्रश्न अर्थातच पडला.
या मंचावर वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, चालना मिळावी, काही नवे सकारात्मक विचार मांडले जावेत हा हेतू, ही पुरस्कार योजना जाहीर करण्यामागे असल्याने त्या दृष्टीने विचार करून पोस्ट " कोणी " लिहिली आहे यापेक्षा पोस्टमध्ये " काय " लिहिले आहे याचाच विचार सर्वोत्कृष्ट पोस्ट निवडताना प्रामुख्याने केला गेला...
विजेते : -
1) मुकुल रणभोर " तुंबाडचे खोत " 07.10.2016
2) डॉ वैष्णवी देव " साधारण वीस वर्षापूर्वीची गोष्ट "
16.10.2016
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..
अर्चना बापट

Thursday, June 1, 2017

11-11-16

अमेरिकेतल्या लोकांना ट्रम्प निवडून आलेत या आनंदा पेक्षा हिलरी ठरल्याचे दुःख जास्त आहे . त्या निवडून आल्या असत्या तर अभूतपूर्व जल्लोष झाला असता . ट्रम्प निवडून आलेत तर त्यांची पार्टी पण काही जास्त आनंदी आनंद करत नाहीयेत .  त्यांना पण हे अपेक्षित नसेल , धक्काच बसला . आणि खूपच फरकाने निवडून आले .


मीडियाने हिलरी निवडून येणार हे वारंवार ठसवले , वेगवेगळॆ polls मध्ये ती किती पुढे आहे सारखे सांगितले जात होते . ते पण बिकाऊ मीडिया आहेत का त्यांना लोकांची नस  कळलीच नाही ?



14-11-16


माझ्या काही आयडीयाज :--

हे पैसे पैसे ऐकून व्याप झालाय .

एवढा पैसI होता तर कितीतरी सोयी झाल्या असत्या .

असो .

तरीपण आपल्या आयडिया लोकांपुढे मांडायला काय हरकत आहे .

१) कल्याणला गणेशघाटावर जिथे लोक फिरायला जातात , बाजूला कचऱ्याचा डोंगर झालाय . त्याची विल्हेवाट लावायचंही सोय. मोठ्ठा incinerator घेतला असता . वारंवार होणार दुर्गंधीचा त्रास वाचला असता .


२) एक खूप मोठ्ठी छान बIग केली असती , एकदम  designer . लोकांना फिरIयला जायला जागा नाही , मुलांना खेळायला , जेष्ठ नागरिकांना पाय मोकळे करायला , यंग लोकांना प्रेम करायला (लग्नानंतर ) थोडं मन मोकळं होतं , भांडणं कमी होतात .

३) मस्त वृध्दIश्रम काढायचा होता , एकदम स्टयलिश , बुढे लोक ताबियेतीत राहिले असते . आता मुलं परदेशात  आईवडील एकटे असे खूप आहेत .

४) मुलींसाठी एक collage काढायचं होतं , Nirmala Niketan सारखं , home science शिकवणारं . आमच्या वर्गातल्या शाळेतल्या बऱ्याच मुली तेंव्हा या institute मध्ये गेला होत्या . संसाराला एकदम पक्क्या झाल्या . ह्यांचे नवरे जगभरात नोकरीसाठी गेले . ह्या पण कुठल्या कुठल्या देशात जाऊन खंबीरपणे नवर्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि मस्त संसार केले .

५) Art gallery काढायची . कल्याणमध्ये कलाकार खूप आहेत पण त्यांना exposure मिळत नाही . त्यांना platform मिळाला असता . Creativity आणि innovation झालं असतं .


कल्याणला अजून चारीबाजूला भरपूर जागा आहे , बरेच काही होऊ शकते

अजून खूप .........


होईल सगळं होईल .........





शिक्षणाचे आणि मार्कांचे अवडंबर :---

आमच्या ओळखीचे २ भाऊ आहेत , बरेच वयाने मोठे आहेत आमच्यापेक्षा . त्यातला मोठा तो सतत नापास व्हायचा आणि धाकटा मेरिट मध्ये पIस व्हायचा . कौतुक नेहेमी धाकट्याचे व्हायचे आणि मजा म्हणजे धाकटा पIस झाल्याचे पेढे मोठा आणायचा .

धाकटाचे करिअर सुरळीत झाले , ग्रॅड्युएशन झाले , चांगल्या कंपनीत नोकरी , quarters सगळं व्यवस्थित .

मोठ्याने खूप struggle केला . ग्रॅड्युएशन झाले नाहीच . मग इकडे नोकरी कर , तिकडे कर . पडेल ते काम कर . पण यात तो तावून सुलाखून निघाला . त्याच्या नशिबाने त्यावर विश्वास टाकणारी सहचारिणी मिळाली . तिचा त्याला फार आधार होता .

मग त्याला चालवायला एक युनिट मिळालं , आणि ते त्याने इतकं firstclass चालवून दाखवलं . त्याला इकडे तिकडे करून सगळे loopholes माहित होते .
बिझनेस करायचा असेल तर काय काय लबाड्या होऊ शकतात आणि कसा कसा तोटा होऊ शकतो हे पण माहित हवं . नुसतं काम करत राहिलं आणि मागून सगळं लंपास होत राहिलं तर काय उपयोग ?

तर असा हा माणूस , चांगलाच यशस्वी झाला , मग एकाचे दोन युनिट झाले , व्यवसाय वाढला . बऱ्याच जणांना नोकऱ्या दिल्या . आईवडिलांना सांभाळलं , बाकी नातेवाईकांना मदत केली , समाजात प्रतिष्ठा मिळवली .

धाकटा आपण बरं आपला संसार बरा असा होता , जास्त कोणाला थारा द्यायचा नाही . घरच्यांच्या मते तो आप्पलपोटI होत , पक्का मतलबी .

यशस्वी होण्याचा काही एकाच मंत्र नाही .

परीक्षेत यशस्वी होणे हे चांगलेच आहे पण नाही झाले तरी सगळे रस्ते बंद होतात असे नाही .

उलट या लोकांना अजून इतर क्षेत्र धुंडाळण्यास मिळतील . त्यात ते प्रगती करू शकतात . त्यात त्यांना जास्त मजा येईल .

हे नाही म्हणून काहीच नाही असे नसते , उलट जग explore करायची संधी मिळेल . आणि जे तावून सुलाखून निघतात ते जास्त जीवन जगतात . ते भयंकर वाटेल but it helps in the long run .

आमचे डॉक्टर लोक पण बऱ्याचदा नापास झालेले असतात . इतक्या परीक्षा असतात कि अधूनमधून नापास होतातच , पण मग अजून अभ्यास होतो आणि मजा म्हणजे हे डॉक्टर्स अधिक चांगले डॉक्टर होतात कारण त्यांना दुखियारे लोक जास्त चांगले समजतात

Don't worry my dear young boys and girls , there is space for everyone .

जे असेल ते असो , जिगर ठेवायची , पुढे जायचं . जहाँ और भी है !!