Sunday, August 6, 2017

हा फोर्टचा फोटो वाटतोय ना ?
This is Edinburgh !!
आमचा तिथला guide एक खडूस इंग्लिश म्हातारा होता , अगदी इरसाल . भारतात राहिलेला होता
...
म्हणाला " तुमच्या भारतीय पुरुषांचे बरे असते , तुमच्या बायका त्याच त्याच साड्या , अगदी लग्नातल्या पण नेसतात , आमच्या बायकांना सारखे नवीन कपडे लागतात " " Very expensive to have a wife"
म्हणावं वाटलं --हल्ली आमच्या बायकांना पण सारखे नवीन कपडे लागतात .
तिथल्या स्टेशन जवळ एक मोठा घड्याळ असलेला tower आहे . त्याने सांगितले कि ते घड्याळ १०
मिनिटे पुढे असते , लोकांची ट्रेन चुकू नये म्हणून .
आपल्याकडे पण बऱ्याच घरात असेच ५-१० मिनिटे पुढे असलेले घड्याळ असते .
हे पण British संस्कार ?

हवेत जाम गारठा आहे . हल्ली बऱ्याच घरात marble किंवा marbonite ची फरशी असते , ती गारगार पडते . मग त्यावर चालून चालून पाय दुखतात ,especially बायकांचे .

तर बऱ्याच जणी चप्पल घालतात पण पायमोजे घातले तर अजून बरे वाटते . हल्ली बायकांसाठी खास पायमोजे आले आहे , ते बरे पडतात .

बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही अलिबागच्या जवळ नागावला 'शिंत्रेवाडीत' गेलो होतो . त्यांचं एक जुनं घर म्हणजे वाडी आहे आणि एक नवीन पिकनिकला येणाऱ्यांसाठी आहे . तर नवीन तयार नव्हतं म्हणून आम्हाला जुन्या घरी थोडा वेळ उतर...वलं होतं .

अनपेक्षित धनलाभ या कॅटेगरी खाली तो अनुभव होता . इतकी सुंदर सुबक वाडी , well maintained . खूपच फळझाडे , फुलझाडे , झाडावर फणस , विहीर , छोटे हौद , पIट काढलेले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिथे एक आजी होत्या , सगळीकडे बारीक लक्ष ( माझ्या दृष्टीने अशी माणसे एक नंबर ). त्या इतक्या छान वागल्या आमच्याशी . खूप वेळा असं होतं कि आपल्याला एखादे ठिकाण तिथे अनुभव कसा येतो किंवा माणसं कशी वागली होती यावरूनच आवडतात .

तर त्यांनी आपलं घर दाखवलं . मोठं होतं ८-१० खोल्या असतील . चारी बाजूनी व्हरांडा , आणि शहाबादी फरशी . स्वयंपाक घरात घेऊन गेल्या . पण तिथे शेणाने सारवलेले होते . तर त्या म्हणाल्या शेणाने सारवलेले उबदार राहते . बायकांचा बराच वेळ स्वयंपाकघरात जातो , फरशी लावली तर जमीन गार पडते आणि मग पाय दुखतात . हा जुन्या लोकांचI उपाय .

आता ती शहाबादी फरशी गेली आणि ते शेणाने सरावलेले घर तर कधीच गेले पण बायकांचे पाय दुखणे मात्र चालू आहे . त्यांनी आपापली तब्येत जपावी .

Monday, July 31, 2017

Lipstick under my burkha :--
हा सिनेमा मी पहिला नाही पण माझी एक मैत्रीण बघून आली आणि तावातावाने म्हणत होती कि स्त्रियांना पण extra marital affairs करायचा अधिकार असला पाहिजे , पुरुष करतात तर आम्ही का नाही ?
ह्यावर बराच उहापोह झाला .....
म्हटलं करायचं असेल तर करा पण त्यासाठी हौस पाहिजे , ताकत हवी , efficiency आणि memory चांगली पाहिजे . येरागबाळ्याचे काम नाही .
आम्ही एक हा extramarital प्रकार जवळून पहिला होता , त्या हौशी सद्गृहस्थाची जाम पळापळ व्हायची , त्यात तो धांदरट आणि विसरभोळा . चुकीच्या ठिकाणी चुकीचे बोलायचा , कुणाला काय सांगितले आहे ते लक्षात राहायचे नाही , मग बायको पकडायची आणि मग आकांडतांडव .
म्हणजे असे आपल्या चहा पिणाऱ्या बायकोला परवा तू कॉफी छान केली होतीस असे म्हणायचे नाही . वगैरे वगैरे . पुन्हा लक्षात ठेवायचे हिला आज ४ वाजता भेटायचे आहे , तिला उद्या फिरायला न्यायचे आहे वगैरे वगैरे .
पुन्हा दोन घरोबे केल्याने खर्च वाढतात त्यामुळे उत्पन्न वाढवावे लागते , तो वाढीव खर्च tax deductible नाही . ट्रॅफिक पण खूप वाढले आहे , कुणाला ४ वाजता येतो म्हटले तर पोचायलाच ७ वाजायचे , तोपर्यंत परत यायची वेळ व्हायची
असो !!

आता बायकांचे , पुरुष करतात म्हणून आम्हाला पण extramarital करायचे आहे म्हणजे हे कायदेशीर करायचे का ?
एकनिष्ठता हा एक लग्नसंस्थेचा पॉईंट आहे हे खूप जण विसरलेले दिसतात .
बायकांना लाख हौस असेल affair करायची पण सगळे पुरुष हल्ली भयंकर busy असतात . सक्काळी जातात ते रात्री येतात आणि टूरला म्हणून जातात ते बरेच दिवस येतंच नाहीत . पुन्हा ते सतत परेशान असतात . चेहऱ्यावर सतत कुठलं तर बिल भरायचे आहे , टॅक्स भरायचा आहे , शेर मार्केट पडलंय , काहीतरी सापडत नाहीये . मला कुठलं तरी काम करायचे आहे पण कुठलं ते आठवत नाही असेच चेहरे असतात .
Extramarital करायचं म्हणजे थोडा तरी निवांतपणा हवा कि नको ?
परत त्यांना सारखं कुठंतरी जायचं असतं आणि काही नाही तर ते आधार कार्ड लिंक चालू झालं आहे .
मला वाटतं ही सरकारची आयडिया असेल . लोकांना हा फॉर्म भर , तो फॉर्म भर ह्यातच अडकवून ठेवायचं कि नाही नाही ते सुचायला वेळच मिळतI कामI नये .
नाही म्हणजे कधी कधी कोणाला पाहून दिल धडकतो किंवा आठवण आली कि अंदाज शायराना होतो पण पुढे काय ?
माझ्या एका मैत्रिणीने पण हे केलेच , पण पंचाईत अशी झाली कि तिचा नवरा आणि बॉयफ्रेंड मित्र झालेत . आता ती वैतागली आहे .
म्हणजे असे unforeseen complications होऊ शकतात .

त्यातून ज्यांना हौस असेल आणि झेपणार असेल they can go ahead !!
आपल्या कंट्री मध्ये आधीच एवढा गोंधळ आहे , बायका पक्क्या खुंटी सारख्या संसार पकडून आहेत . त्यांनी पण हे उद्योग सुरु केले तर कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहणार नाही .
************************************************************************************
नवरा म्हणतो " तू सगळ्या गोष्टी अश्या analytical नजरेने नको बघू , काही काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात !!

Monday, July 24, 2017

जे तिरुपतीला जातात ते येताना कोल्हापूरला महालक्ष्मी चे दर्शन घेतात , असा रिवाज आहे हे आजच कळले . ह्या मागे काही कथा आहे का ?
From the wall of Vaibhav Narayana Joshi:--
श्री तिरुपती बालाजी दक्षिणेच एक मोठ देवस्थान .
हे बालाजी अर्थात विष्णू . हे या पर्वतावर प्रकट झाले . त्यांना श्री पद्मावती आवडल्या आणी त्यांच्याशी विवाह करणे ठरले . पण श्री विष्णूंची पहिली पत्नी श्री लक्ष्मी मातेची परवानगी आवश्यक होती . ती प्रथमतः मिळाली नाही व देवी रुसून कोल्हापूर येथे येऊन राहिल्या . देवाने त...्यांना शोधले तर त्या घोडीच्या रुपात होत्या . मग देवानेही घोड्याचे रुप घेतले व त्यांचा रुसवा काढला आणि तुझा मान कायम राहिल सांगितले . तसेच विवाहा साठी कर्ज मागितले . देवीने कुबेरा आपल्या पुत्राला आज्ञा केली व हा विवाह पार पडला . म्हणून आजही बालाजीहून कोल्हापूर येथे दरवर्षी साडीचोळी व सौभाग्य साज पाठवतात यावेळी किरणोत्सवही असतो . नारायण लक्ष्मींना या दिवशी भेटतात . आणि देवांनी दिलेल्या आशीर्वादाने बालाजी यात्रा कोल्हापूर चे दर्शन घेतल्या शिवाय पूर्ण होत नाही !
*
*
बालाजी ने महालक्ष्मी शी अतिशय थाटामाटात लग्न केले, लग्नाच्या वेळी त्याने अफाट खर्च करण्यासाठी कुबेराकडुन कर्ज घेतले. व्यंकटेशाच्या कोणत्याही मंदिरात हुंडी असते, भाविक त्या हुंडी मध्ये दान टाकतात ते कुबेराचे कर्ज फेडण्यासाठी असते अशी अख्यायिका आहे.
*
*
नवरात्रीत तिरुपतीचा बालाजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साडी पण पाठवतो.
*
*
बालाजी च्या दोन पत्नी एक कोल्हापुर ची महालक्ष्मी आणि दुसरी पद्मावती जी की तिरुपति ला आहे. बालाजी तिरूमलाला आहे. महालक्ष्मी रूसुन कोल्हापुर येथे येवुन बसलीै. त्यामुळे तिरूमला, तिरुपति आणि कोल्हापुर अशी ती यात्रा पुर्ण होते. कोल्हापुर तिरुपति अशी एक एक्सप्रेस ट्रेन आहे तिचे नांव पण हरीप्रिया एक्सप्रेस असे आहे.
आपल्याकडे शाळेसाठी महाराष्ट्र बोर्ड , CBSC ,ICSC असे ३ options आहेत. दुसरे २ international schools आहेत . बरेच लोक हल्ली ह्या देशातून त्या देशात नोकरी बदलत ,मुलाबाळांसह हिंडत असतात . त्यांच्या मुलांसाठी ह्या International schools आहेत .
(पुढे International level चे jobs मिळवताना ह्या लोकांना preference असेल असे म्हणतात ). फी पण जबरदस्त असते . जो है ठीक है ।
पण ह्या शाळांची सुट्टी जुलै -ओगस्ट मध्ये असते . महाराष्ट्र बोर्डाची एप्रिल -मे .
...
माझी एक मैत्रीण आहे . तिचा मुलगा ,सून आणि २ नातवंड दुबईला असतात . मुलांना आता सुट्या लागल्या आहेत आणि त्याच्या कंपनीने सगळ्यांना विमानाचे तिकीट देऊन पाठवून दिले आहे .
तर हे चौघे २ महिन्यांसाठी भारतात आले आहेत .
त्या मैत्रिणीचे डोके फिरून गेले आहे , ४-४ पाहुणे (आपलाच मुलगा सून असले तरी ) ते पण पावसाळ्यात !
बाहेर पाऊस , कपडे व।ळत नाहीत ,क।मवले दांड्या मारतात. शेजाऱ्यांचा पोरांशी खेळायला जा म्हणावे तर ती मुले अभ्यासात busy .
पोरांची करमणूक नाही केली तर दिवसभर tv लावून बसतात. आणि मुलगा आणि सून प्रतिष्ठीत वागतात .जिम्मेदारी घेऊन घर चालवत नाहीत.
व्याप झालाय म्हणाली .
आधीच आपल्याकडे जात , धर्म , भाषा ,पंथ,veg-nonveg , हे असताना आता ह्या International शाळेचे आणि महाराष्ट्र बोर्डाचे अशी पण फुट पडेल .

मी '89 ला private practice सुरु केली . ४-५ महिनेच झाले होते एक पेशंट आली म्हणाली "तुमचं नाव ऐकून गोव्याहून आलोय "

म्हटलं माझं नाव एवढं गोव्या पर्यंत कधी गेलं ? practice पण तेंव्हा जेमतेमच होती .

नाही म्हटलं तरी मला मनातून खूप आनंद झाला .

...

घरी गेल्यावर नवऱ्याला सागितलं . तो म्हणाला "अगं ते GOA नाही काही , हे कल्याण जवळच एक गोवा नावाचे गाव आहे , तिथले पेशंट कल्याणलाच येतात "

ह्या फोटो मधली डावीकडची safety pin आहे ती नेहेमीची आहे पण उजवीकडची आहे ती वेगळी आहे .
एकाबाजूची तार थोडी लांब करून थोडा curve दिलेला आहे .
ह्यामुळे साडी pin -up करताना किंवा छोट्या मुलांच्या ड्रेसला रुमाल किंवा badge लावताना टोचत नाही आणि curve असल्यामुळे पटकन आणि नीट बसते .
...
ही काही फार मोठी idea नाही कि technology नाही पण मस्त आणि उपयोगी आहे .
ही पिन मला एका अमेरिका return family कडून गिफ्ट मिळाली होती , India मध्ये कुठे मिळते का माहित नाही . .